सरकार वाचवण्यासाठी उध्दव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांचा फोन, खोडसाळ वृत्त, चुकीच्या बातम्या पसरवू नका- शिवसेनेचा खुलासा

 

सरकार वाचवण्यासाठी उध्दव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांचा फोन,

खोडसाळ वृत्त, चुकीच्या बातम्या पसरवू नका- शिवसेनेचा खुलासा

लोकमानस प्रतिनिधी

मुंबई – राज्यातील महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनी करुन संवाद साधल्याचे वृत्त खोडसाळ व चुकीचे असल्याचा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयातून करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून मदत मागितल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केले आहे. मात्र प्रत्यक्षात असे काहीही घडलेले नाही, असा खुलासा शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख  हर्षल प्रधान यांनी केला आहे.

अशा प्रकारच्या बातम्या या निव्वळ भूलथापा आहेत, उध्दव ठाकरे जे काही बोलायचे ते खुलेआम बोलतात, त्यामुळे कोणीही त्यांच्याबाबत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करु नये व कोणीही गैरसमज करुन घेऊ  नये, असे आवाहन हर्षल प्रधान यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब