औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धाराशीव , मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धाराशीव , मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय 
लोकमानस प्रतिनिधी
मुंबई- विधानसभेच्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर व उस्मानाबादचे नामांतर धाराशीव करण्याचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर बहुमत चाचणी अवलंबून असल्याने उध्दव ठाकरे यांनी नामांतराची प्रलंबित मागणी पूर्ण केली. अडीच वर्षांपासून सत्तेत असलेल्या ठाकरे यांनी नामांतराच्या मागणीची पूर्तता त्यांचे सरकार अस्थिर झाल्यावर केली, हे विशेष. 
शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भर दिल्याने व इतक्या मोठ्या संख्येने शिवसेनेचे आमदार फुटल्याने ठाकरे यांना महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत शिवसेनेची सौम्य झालेली  हिंदुत्ववादी ओळख गडद करण्यासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही