कुर्ला इमारत दुर्घटनेत १४ जणांचा बळी, मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून पाच लाख रुपयांची मदत

 

कुर्ला इमारत दुर्घटनेत १४ जणांचा बळी

लोकमानस प्रतिनिधी

मुंबई - कुर्ला येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १४ जणांचे निधन झाले. कुर्ला बस स्थानकाजवळील शिवसृष्टी रोडे येथील नाईक नगर सोसायटी इमारत ही तीन मजली इमारत  रात्री बारा वाजण्याच्या सुमारास कोसळली.

अग्निशमन  दल, एनडीआरएफ जवानांनी तत्काळ पोचून मदतकार्य सुरु केले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत २७ जखमींना बाहेर काढण्यात आले त्यापैकी १४ जणांचा मृत्यू झाला. जखमींवर राजावाडी रुग्णालय, शीव रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  

कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून पाच लाख रुपयांची मदत

मृतांबाबत मुख्यमंत्र्यांची सहवेदना, जखमींच्या उपचारांबाबतही दिले निर्देश

 मुंबईतील कुर्ला पूर्व परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांबाबत आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. दूर्घटनेतील मृताच्या वारसाला मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात यावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 

मुख्यमंत्र्यांनी बचाव पथकांचे  काम आणि अनुषंगिक सुविधांबाबतही यंत्रणांना सूचना केल्या आहेत. विशेषतः जखमींना तातडीचे उपचार मिळावेत, जखमी तसेच मृतांच्या कुटुंबियांना आवश्यक अशा सुविधा तातडीने मिळाव्यात असे निर्देशही दिले आहेत. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही