एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ,देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री पदी

एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ,
देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री पदी
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी   राजभवनात शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा करताना फडणवीस यांनी ते मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे सांगितले होेते. मात्र त्यानंतर भाजप नेतृत्वाने फडणवीस यांना उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचे निर्देश दिले. 
भाजपच्या या धक्कातंत्राने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

शिंदे यांच्या रुपाने ठाणे जिल्ह्याला मुख्यमंत्री पदाचा प्रथमच सन्मान लाभला आहे. तर, मुख्यमंत्री पदी पाच वर्षे काम केल्यानंतर उप मुख्यमंत्री होणारे पहिले राजकारणी म्हणून फडणवीस यांची राज्यात नवी ओळख तयार झाली आहे.
राज्यात आतापर्यंत ज्यांनी उप मुख्यमंत्री पद भूषवले आहे त्यांना त्यांच्या पुढील राजकीय आयुष्यात मुख्यमंत्री पद मिळालेले नाही, असा महाराष्ट्राचा आजपर्यंतचा राजकीय इतिहास आहे. त्यामुळे पुढील काळात फडणवीस मुख्यमंत्री होणार  का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही