वक्फ बोर्डाचे सीईओ अनिस शेख यांना कार्यमुक्त करण्याचे निर्देश



क्फ बोर्डाचे सीईओ अनिस शेख यांना कार्यमुक्त करण्याचे निर्देश,

वक्फ बोर्डाची जमीन विक्री व शेख यांच्या चौकशीचे निर्देश

चौकशी करुन गुन्हा नोंदवण्याची हाजी अरफात शेख यांची मागणी  

लोकमानस प्रतिनिधी 
– मुंबई  

महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांच्या कार्यकाळात  वक्फ बोर्डाच्या अनेक जमिनींची अवैध विक्री झाल्याप्रकरणी त्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे व त्यांची व जमीन विक्रीची चौकशी करावी, असे निर्देश अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी अल्पसंख्याक विभागाच्या अपर मुख्य सचिवांना दिले आहेत. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी याबाबत आव्हाड यांच्याकडे याबाबत मागणी केली होती.

वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची व इतर भ्रष्ट्र अधिकाऱ्यांची तत्काळ चौकशी करावी, त्यांना निलंबित करावे व त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी हाजी अरफात शेख यांनी केली होती.

याबाबत आव्हाड यांनी दिलेल्या निर्देशामध्ये, वक्फ बोर्डाच्या जमिनी सार्वजनिक वापरासाठी राखीव असतानाही शेख यांनी त्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही त्यामुळे त्या जमिनीचे अनधिकृत व्यवहार झाले असे ताशेरे ओढण्यात आले आहेत. महसूल विभागाच्या शासन निर्णयानुसार सातबाऱ्यावर वक्फ जमिनीची प्रतिबंधित सत्ता प्रकार अशी नोंद असणे गरजेचे आहे. मात्र, वक्फच्या जमिनींची नोंद तशा प्रकारे नसल्याने त्या जमिनीची नोंद इतर नावाने झाली. त्या जमिनीचा आढावा घेऊन प्रतिबिंधित सत्ता प्रकार अशी नोंद करण्याचे निर्देश वारंवार दिल्यानंतरही अनिस शेख यांनी त्याबाबत कोणतीही ठोस कारवाई केली नाही, ही गंभीर बाब आहे, असे आव्हाड या पत्रात म्हणाले आहेत. त्यामुळे या सर्व जमीन व्यवहारांची व शेख यांची चौकशी करावी, असे निर्देश आव्हाड यांनी दिले आहेत.
वक्फ बोर्डाचे सदस्य अँड खालीद कुरैशी यांनी देखील वक्फ बोर्डाच्या कामकाजाबाबत आक्षेप नोंदवले असून अनिस शेख यांच्या चौकशीची मागणी केली आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही