राज्याबाहेर असलेल्या मंत्री, आमदारांना जबाबदारी पार पाडण्यासाठी राज्यात परतण्याचे आदेश द्या, उच्च न्यायालयात याचिका

 

राज्याबाहेर असलेल्या मंत्री, आमदारांना जबाबदारी पार पाडण्यासाठी राज्यात परतण्याचे आदेश द्या, उच्च न्यायालयात याचिका

लोकमानस प्रतिनिधी

मुंबई –

गेल्या आठवड्याभरापासून राज्याबाहेर असलेले शिवसेनेचे बंडखोर मंत्री व आमदार आपल्या कर्तव्यापासून दूर असल्याने त्यांना त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी राज्यात परतण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

 

याचिकेत एकनाथ शिंदे यांच्यासहित महाराष्ट्र राज्य सरकार आणि महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष या  तिन्ही पक्षांना प्रतिवादी करण्यात आले आहे. या याचिकेवर प्राथमिक सुनावणी झाली असून संबंधितांना उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. एड. असीम सरोदे यांनी ही याचिका दाखल केली आहे.

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब