मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा जनतेशी संवाद , शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करु नका

 मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा जनतेशी संवाद

शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मुख्यमंत्री पद सोडण्यास तयार, शिवसेना पक्ष प्रमुख पद सोडण्यास तयार

कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ,

शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करु नका

लोकमानस प्रतिनिधी

मुंबई- 

माझी कोविड टेस्ट पाॅझिटीव्ह. बोलण्यासारखे बरेच. कोविड काळात लढाई लढलो. कठिण काळात कोणीही तोंड दिले नाही अशा परिस्थितीत मला जे करायचे ते  प्रमाणिक पणे केले. तेव्हा देशातील पहिल्या पाच मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून निवड झाली.


माध्यमात अनेक अफवा. मी भेटत नव्हतो हे काहा दिवस शक्य नव्हते. कारण शस्त्रक्रिया. आता सुरुवात केली. पहिली कॅबिनेट रूग्णालयात. शिवसेना हिंदुत्वापासून दूर होऊ शकत नाही म्हणूनच आदित्य , एकनाथ शिंदे अयोध्येला. हिंदुत्वावर बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री.


ही बाळासाहेबांची शिवसेना नाही अशी बातमी पसरवण्यात आली. २०१४ मध्ये एकट्याच्या ताकदीवर ६३ आमदार शिवसेनेचे आमदार निवडून आले ती पण हिंदुत्वावर. शिवसेना कुणाची बाळासाहेबांची पण मध्ल्या काळात जे मिळाले ते याच शिवसेनेने.


आमदार गायब. काही आमदारांचे फोन येतात. काल परवा निवडणुक झाली. हाॅटेल मध्ये गेलो तेव्हा बोललो ही कुठली लोकशाही. शंका ठिक पण लघु शंकेला गेला तरी शंका. मी इच्छेपेक्षा जिद्दीने पूर्ण करणारा. कुठलाही अनुभव नव्हता. नाईलाजाने वेगळा मार्ग घ्यावा लागला. विशेषतः पवार साहेबांनी सांगितले जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे. पुढे चालणार नाही. पवारांचा सोनियाजींचा आग्रह म्हणून जिद्द केली .नुसता स्वार्थ नव्हता. वळणदार राजकारण कुणाचेच उपयोगाचे नाही. प्रशासनाची खूप मदत.


धक्का हो धक्का. सत्तेसाठी एकत्र आलो. सकाळी कमलनाथ, पवारांचा विश्वास. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे? मी त्यांना आपले मानतो त्यांचे माहिती नाही. तुम्ही पळता कशाला? त्यांच्यापैकी कुणीही सांगितले की मी मुख्यमंत्री नको तर मी सोडायला तयार. आज मी वर्षावर मुक्काम हलवतोय. पण हे समोर येऊन बोला. 


कुऱ्हाडीची गोष्ट. ज्याने घाव घातल्या जाताहेत त्याच्या वेदना अधिक. शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करु नका. मला कोविड झालाय मी राजीनामा देतो तुम्ही येऊन घेऊन जा. हे काय मोठे आव्हान आहे. शिवसैनिक सोबत तोवर मी कुठल्याही आव्हानाला समोर जाईन. शिवसैनिकांना असे वाटत असेल तर मी पक्ष प्रमुख पद सोडायला तयार आहे. संकटाला सामोरा जाणारा शिवसैनिक. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर माझी तयारी. 


एकदा ठरवू या समोर या सांगा आम्हाला संकोच वाटतोय हे स्पष्ट सांगा. मी सोडायला तयार. आयुष्याची कमाई पद नाहीत. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो. कुटुंब प्रमुख म्हणून मला अनेकांनी सांगितले. ही माझी कमाई. माझे हे नाटक नाही. माझ्यासाठी संख्या विषय गौण. संख्या कशी जमवता हे नगण्य. मी आपला मानतो त्यांनी मला सांगाव मी मुख्यमंत्री पद सोडतो. एकच सांगतो तुमचे प्रेम असे ठेवा.


जय हिंद जय महाराष्ट्र

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही