शून्य किंवा कमी वापर दर्शविणाऱ्या मीटरची टोरेंट पॉवर द्वारे विशेष तपास मोहीम

शून्य किंवा कमी वापर दर्शविणाऱ्या मीटरची टोरेंट पॉवर द्वारे विशेष तपास मोहीम
मुंब्रा - 
शिळ-मुंब्रा-कळवा परिसरातील 30 हजार हून अधिक वीज मीटर सतत अनपेक्षितपणे कमी वापरासाठी टोरेंट पॉवर लिमिटेड च्या तपास यादीत आलेले आहेत.

यापैकी 20 हजार मीटरचा वापर शून्य असल्याने टीपीएलचे अधिकारी संशयग्रस्त झाले आहेत. उर्वरित 10 हजार मीटरचा वापर 0-30 च्या श्रेणीत आहे जो देखील एक विसंगती मानला जातो. या संशयास्पद मीटरच्या वस्तुस्थितीची पडताळणी करण्यासाठी विशेष तपासणी मोहिमेचे आदेश देण्यात आले आहेत. अपवादात्मकपणे कमी वापर असलेल्या ग्राहकांसाठी घरोघरी भेटी देऊन, ग्राहकांनी मीटरमध्ये गैरप्रकार केले असल्यास, ते ओळखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापैकी काही खरी प्रकरणे असू शकतात ज्यात ग्राहकांकडून विजेचा खप वास्तविक कमी आहे.  शून्य किंवा कमी वापर दर्शविणाऱ्या मीटरची सध्याची संख्या खूप जास्त आहे आणि मीटर बायपास, मीटरमध्ये छेडछाड, थेट/अनधिकृत वापर इत्यादीसारख्या गैरप्रकारांमध्ये काही ग्राहक गुंतलेले असतील याची शक्यता नाकारता येत नाही, वा काही दोषी आढळ्यास टोरेंट द्वारे दोषींविरुद्ध विद्युत कायदा 2003 च्या संबंधित मार्गदर्शक तत्त्वांनुसार लागू कारवाई केली जाईल.

वीजचोरी हा फौजदारी गुन्हा आहे वा वीजचोरी आढळल्यास गुन्हेगाराला तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, याची ग्राहकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टोरेंट ने ग्राहकांना विद्युत उपकरणांमध्ये हस्तक्षेप करून विजेचा अनधिकृत वापर न करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे असुरक्षित विजेचे जाळे निर्माण होते आणि त्यामुळे विद्युत अपघात होऊन जीवितहानी देखील होऊ शकते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही