मुंबई पोलिस आयुक्त पदी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती

मुंबई पोलिस आयुक्त पदी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती


लोकमानस प्रतिनिधी
मुंबई-  मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान पोलिस आयुक्त संजय पांडे हे गुरुवारी ३० जून रोजी निवृत्त होत असल्याने त्यांच्या रिक्त होत असलेल्या पदावर फणसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फणसाळकर यांनी यापूर्वी ठाण्याचे पोलिस आयुक्त म्हणून काम केले आहे. ते सध्या महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार अर्चना त्यांगी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. फणसाळकर हे गुरुवारी आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारतील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही