शिवसेना गटनेतेपदी अजय चौधरींची नियुक्ती वैध, विधानसभा उपाध्यक्षांच्या निर्णयाविरोधात एकनाथ शिंदे न्यायालयात दाद मागणार

 

शिवसेना गटनेतेपदी अजय चौधरींची नियुक्ती वैध,

विधानसभा उपाध्यक्षांच्या निर्णयाविरोधात एकनाथ शिंदे न्यायालयात दाद मागणार  

लोकमानस प्रतिनिधी

मुंबई –

शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यास विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे  शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी अजय चौधरी यांची नियुक्ती वैध ठरली आहे. शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन हटवून त्या पदावर शिवसेनेचे निष्ठावान आमदार अजय चौधरी यांना नियुक्त करण्याबाबत पत्र विधानसभेच्या उपाध्यक्षांना देण्यात आले होते. त्यावर उपाध्यक्षांनी घेतलेला निर्णय विधिमंडळ सचिवालयातर्फे अवर सचिव (समिती) यांनी कळवला आहे.

एकनाथ शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

विधानसभेच्या उपाध्यक्षांच्या या निर्णयाविरोधात एकनाथ शिंदे उच्च न्यायालयात दाद मागतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे हा वाद आता न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही