एकनाथ शिंदेंचे मुंबईत आगमन, आज सायंकाळी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार

 

एकनाथ शिंदेंचे मुंबईत आगमन, आज सायंकाळी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी,

फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार


लोकमानस प्रतिनिधी

मुंबई – राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आज सायंकाळी सात वाजता शपथ घेतील अशी माहिती सुत्रांनी दिली. शपथविधीची तयारी राजभवनवर सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांचे आज दुपारी मुंबईत आगमन झाले. त्यानंतर शिंदे हे फडणवीस यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर गेले व तिथे शिंदे यांनी फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली.

बंडानंतर गोव्यामार्गे मुंबईत आलेल्या एकनाथ शिंदे यांना मोठा पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. शिवसेना नेत्यांकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही