पोस्ट्स

मे, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मीरा जोशी पुन्हा कोरिओग्राफीत, बाजीराव मस्तानीनंतर पुन्हा करणार कोरिओग्राफी

  मीरा जोशी पुन्हा कोरिओग्राफीत,  बाजीराव मस्तानीनंतर पुन्हा करणार कोरिओग्राफी लोकमानस प्रतिनिधी  मुंबई  असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून काम करणारी मीरा जोशी आता आठ वर्षांच्या दीर्घ काळानंतर कोरिओग्राफर म्हणून पुन्हा ‘कमबॅक’ करत आहे. सुमन एन्टरटेन्मेंट प्रस्तुत केदार जोशी आणि पूर्वा जोशी यांची निर्मिती असलेल्या ‘पौर्णिमेचा शुभ्र चंद्र’ या गाण्याची मीराने कोरिओग्राफी केली आहे. विशेष म्हणजे, हे गाणे एका रात्रीत कोरिओग्राफ करण्यात आले आहे. याविषयी मीराने सांगितले , सुनिता मुलकलवार यांनी लिहिलेल्या ‘पौर्णिमेचा शुभ्र चंद्र’ या गीताला अभिजित जोशी यांनी संगीत दिले आहे. तर, सुरेश वाडकर यांनी गायलेले हे गीत दुर्गेश हरवडे यांनी दिग्दर्शित केले आहे. हे गाणे ज्यावेळी पहिल्यांदा ऐकल तेव्हाच या गाण्याने माझ्या मनात घर केले. आणि या गाण्यात आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारे या गाण्याशी जोडले जाण्याचा विचार करू लागले. कास्टिंगमध्ये मला या गाण्यासाठी घेण्यात आले नाही. परंतु, त्याचवेळी, या गाण्याची कोरिओग्राफी करशील का अशी विचारणा होताच क्षणाचाही विचार न करता मी लगेचच होकार दिला. असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून तुष

मुंब्र्यात तंबाखूविरोधी दिनी अंमली पदार्थ विरोधी रॅली

इमेज
मुंब्र्यात तंबाखूविरोधी दिनी अंमली पदार्थ विरोधी रॅली अंमली पदार्थ माफियांना तडीपार करा- मर्जिया शानू पठाण  रॅलीमध्ये शेकडो तरूणांचा सहभाग,मुंब्रा अंमलीपदार्थ मुक्त शहर करणार लोकमानस प्रतिनिधी ठाणे - मुंब्रा शहरात काही समाजकंटकांच्या मार्फत अंमली पदार्थांची विक्री करण्यात येत आहे. त्याविरोधात सुलताना वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून "अंमली पदार्थ विरोधी" रॅली काढण्यात आली.  या वेळी अनेक तरूण-तरूणींनी मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा, कौसा भागात अंमली पदार्थ विरोधी मोहीम आखण्याचा निर्धार व्यक्त केला.  गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा, कौसा भागात अंमली पदार्थांची रेलचेल वाढली आहे. समाजकंटकांकडून तरूणांना अंमली पदार्थांचे व्यसन लावण्यात येत आहे. या प्रकारामुळे सामान्य घरातील तरूण गुन्हगारीकडे वळत आहेत. त्यांना या दिलदलितून बाहेर काढण्यासाठी मर्जिया पठाण या सक्रीय झाल्या आहेत. त्यांनी मुंब्र्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून तंबाखू विरोधी दिनाच्या अनुषंगाने

चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचे निधन

चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर  यांचे निधन   लोकमानस प्रतिनिधी-  चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचे दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले. ते 48 वर्षांचे होते.  दिल्ली इथल्या वेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पित्ताशय  आणि स्वादुपिंडामध्ये इन्फेक्शन झाल्याने धानोरकर यांना नागपूर इथून एअर अॅम्ब्युलन्सने दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखरे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी एअर अॅम्ब्युलन्सने त्यांचं पार्थिव चंद्रपुरात आणण्यात येईल. तर उद्या वरोरा इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर यांनी ही माहिती दिली

नागालँडमध्ये रिपब्लिकन पक्षाचे आमदार निवडून येतात मग महाराष्ट्रात का नाही याचा विचार करून कार्यकर्त्यांनी निवडून येण्यासाठी काम करावे - रामदास आठवले

इमेज
नागालँडमध्ये रिपब्लिकन पक्षाचे आमदार निवडून येतात मग महाराष्ट्रात का नाही याचा विचार करून कार्यकर्त्यांनी निवडून येण्यासाठी काम करावे -  रामदास आठवले मुंबई  - महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा तळागाळातील अन्यायग्रस्त अनुयायांना न्याय मिळवुन देणारा एकमेव पक्ष म्हणजे रिपब्लिकन पक्ष. आम्ही ज्यांच्या सोबत उभे राहिलो तो पक्ष सत्तेत येतोच मग तो काँग्रेस असो वा राष्ट्रवादी, रिपाइं फक्त सत्ते बरोबर जाणारा पक्ष नसुन तर सत्ता हस्तगत करणारा पक्ष आहे. ही किमया फक्त आणि फक्त रिपाइं पक्षातच आहे. सद्याच्या भाजप सरकारमध्येही रिपाइंची महत्वाची भुमिका आहे.नागालँड मध्ये रिपब्लिकन पक्षाचे 2 आमदार स्वबळावर निवडून आले.मग महाराष्ट्रात आर पी आय चे आमदार का निवडुन येऊ शकत नाहीत.कार्यकर्त्यांनी आपले आमदार निवडून येण्यासाठी शिस्तबद्ध काम करावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.  शिर्डी येथे आयोजित रिपाइंच्या राष्ट्रीय अधिवेशनाप्रसंगी आठवले बोलत होते. विचारमंचावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते. रिपा

वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे - वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे- वर्सोवा सागरी सेतू’ असे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. केंद्र सरकारच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या  १४० व्या जयंतीनिमित्त राज्यात 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' साजरा केला जात आहे. याचे औचित्य साधून दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात सावरकर यांच्या जीवनावर आधारित 'शतजन्म शोधिताना' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  यावेळी मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, सावरकर स्मारक चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आदी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विक

मुंबईतील नदी-नाल्याची साफसफाईच्या नावाखाली झालेल्या रुपये 280 कोटीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी - नसीम खान यांची मागणी

इमेज
मुंबईतील नदी-नाल्याची साफसफाईच्या नावाखाली झालेल्या रुपये 280 कोटीच्या  भ्रष्टाचाराची चौकशी करावी -  नसीम खान यांची मागणी लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -   माजी मंत्री व कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे मनपा मार्फत मुंबईतील नदी नाल्याच्या नावाखाली होत असलेल्या भराष्ट्राचारची SIT मार्फत चौकशी करावी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी केली आहे.  मागील १२ दिवसांपूर्वी पावसाळ्याच्या अगोदर मुंबईतील नदी नाल्याची साफसफाई झाली पाहिजे याची पाहणी करून माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री व मनपा आयुक्त यांना पावसाळा अगोदर मुंबईतील मिठी नदी व सर्व नाल्याची खालपर्यंत साफसफाई करण्यात यावी अशी ट्विटर द्वारे मागणी केली होती. त्यांच्या मागणीची तत्काळ दखल घेत  दिवसांनी राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे  यांनी संपूर्ण मुंबईचा दोन दिवसीय नदी नाल्याच्या साफसफाईचा पाहणी दौरा केला आणि मनपाला पावसाळा सुरू होण्यापूर्वी साफसफाई करण्याचे सक्त निर्देश दिले व तसे न क

न्या. रमेश धानुका यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

इमेज
न्या. रमेश धानुका यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ लोकमानस प्रतिनिधी मुंबई -  मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. रमेश देवकीनंदन धानुका यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे रविवारी (दि. २८) झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी न्या. धानुका यांना पदाची शपथ दिली.  शपथविधी सोहळ्याला विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. कमल किशोर तातेड, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश तसेच सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश, राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, माजी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, पोलीस महासंचालक रजनीश सेठ तसेच इतर निमंत्रित उपस्थित होते.  सुरुवातीला राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर पाटणकर यांनी न्या. धानुका यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींची अधिसूचना वाचून दाखवली. राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात व सांगता झाली.     ३१ मे १९६१ रोजी न्या. रमेश धानुका यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्

पंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण

पंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण “नवीन संसद भवन हे 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे” लोकमानस प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेची नवी इमारत देशाला अर्पण केली. दिवसाच्या सुरुवातीलाच, पंतप्रधानांनी नव्या संसद भवनामध्ये नंदीचे शिल्प असलेल्या सेंगोल अर्थात राजदंडाची पूर्व-पश्चिम दिशेकडे  स्थापना केली. त्यांनी याप्रसंगी दीपप्रज्वलन देखील केले आणि राजदंडाला पुष्पे अर्पण केली. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की प्रत्येक देशाच्या इतिहासात असे काही क्षण असतात जे अमर होऊन राहतात. काही तारखा काळाच्या प्रवाहात अमरत्वाचा आशीर्वाद प्राप्त करतात आणि 28 मे 2023 ही अशीच एक तारीख आहे असे ते म्हणाले. “भारताच्या जनतेने अमृत महोत्सवानिमित्त स्वतःलाच दिलेला ही  भेट  आहे,”त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी या वैभवशाली प्रसंगी देशातील प्रत्येल व्यक्तीचे अभिनंदन केले.  पंतप्रधान मोदी म्हणाले की नवीन संसद भवन ही केवळ एक इमारत नाही तर ते 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे ते प्रतिबिंब आहे. “हे आपल्या लोकशाहीचे मंदिर असून ते भा

वीज चोरांना आता बसणार झटका , टोरंट पॉवरकडून वीजचोरांवर एफआयआर दाखल

वीज चोरांना आता बसणार झटका , टोरंट पॉवरकडून वीजचोरांवर एफआयआर दाखल  प्रतिनिधी टोरंट पॉवरने कळवा-मुंब्रा-शीळ भागात वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. वीज जोडणी नियमित करण्यासाठी विविध माध्यमांतून अनेकदा आवाहन करूनही लोक नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करण्यासाठी पुढे येत नाहीत. या भागातील 15 हजारांहून अधिक घरे पीडी थकबाकीच्या नावाखाली बेकायदेशीर वीज वापरत आहेत. अशा ग्राहकांनी त्यांची प्रलंबित पीडी ( PD) देय रक्कम भरून कायदेशीररित्या वीज मीटर मिळवावेत असे आवाहन टोरंट पॉवर कंपनीने केले आहे.  मात्र कायदेशीर कनेक्शनसाठी लोक पुढे येत नाहीत. आजही सुमारे 21 हजार 500 कनेक्शन्स 0 किंवा खूप कमी युनिट वापर दर्शवतात. यातील अनेकांचे मीटर सदोष असल्याचा किंवा मीटरमध्ये छेडछाड केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अशा लोकांचे मीटर त्वरित बदलणे आवश्यक आहे. अशा वीजचोरांमुळे नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा अनेकदा खंडित होत आहे. त्यांना लाइन ट्रिपिंग आणि नेटवर्क बिघाडाचा सामना करावा लागतो. टॉरंट कंपनीने नुकतीच मीटरमध्ये छेडछाड आणि वीजचोरीविरोधात कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या क

खाजगी क्षेत्रात आरक्षण आणि पदोन्नती मधील आरक्षणासह रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी च्या बैठकीत ठराव मंजूर

इमेज
खाजगी क्षेत्रात आरक्षण आणि पदोन्नती मधील आरक्षणासह रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी च्या बैठकीत ठराव मंजूर लोकमानस प्रतिनिधी  शिर्डी  -रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक शिर्डी येथील हॉटेल पॅलेशियन मध्ये रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.  आठवले हे राज्यसभेचे खासदार असून त्यांची मुदत 2026 पर्यंत आहे. त्यामुळे जर त्यांना लोकसभा निवडणूक लढण्यासाठी शिर्डी मतदारसंघात भाजप ने मित्रपक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला जागा सोडुन संधी दिली तर त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करू. रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळण्यासाठी महाराष्ट्रात लोकसभेच्या दोन जागा जिंकणे आवश्यक आहे. त्यासाठी भाजप ने मित्रपक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या दहा जागा सोडाव्यात अशी मागणी करणारा ठराव आजच्या बैठकीत मंजूर झाल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.  या बैठकीमध्ये  पदोन्नतीमधील आरक्षण आणि खाजगी क्षेत्रांतील आरक्षणासह अनेक महत्वपूर्ण विषयावरचे ठराव संमत झाले.  या राष

आरपीआयचे शिर्डीमध्ये राज्यव्यापी अधिवेशन, मुख्यमंत्री शिंदेसह, फडणवीस उपस्थित राहणार

आरपीआयचे शिर्डीमध्ये राज्यव्यापी अधिवेशन, मुख्यमंत्री शिंदेसह, फडणवीस उपस्थित राहणार   लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र राज्य महाअधिवेशन शिर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे. रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे राज्यव्यापी अधिवेशन (Statewide convention) येत्या 28 मे रोजी शिर्डी (Shirdi) येथे आयोजित करण्यात आले असून राज्यव्यापी अधिवेशन यशस्वी करण्यासाठी मुंबईतील कार्यकर्त्यांनी सर्व ताकदीने प्रयत्न करावेत असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र राज्य महाअधिवेशन येत्या 28 मे रोजी शिर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे. शिर्डी येथील शिर्डी राहता रोडवरील कांदा मार्केट समोरील मैदानावर हे अधिवेशन पार पडणार आहे.  रिपाइंच्या या महाअधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास

भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांना मोठे यश, इंडिगो एअरलाइन्सच्या एजाईल कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या व्यवस्थापनाद्वारे मान्य

इमेज
भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांना मोठे यश,  इंडिगो एअरलाइन्सच्या एजाईल कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या व्यवस्थापनाद्वारे मान्य लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -  मुंबई विमानतळ येथील इंडिगो एअरलाइन्सला सेवा पुरवणाऱ्या एजाईल एअरपोर्ट सर्व्हिस प्रा. लि. कंपनीतील कामगारांनी  व्यवस्थापनाद्वारे होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासाच्या विरोधात दिनांक २५ मे २०२३ रोजी सकाळ पासून सुरू केलेल्या उत्स्फूर्त संपाला भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांमुळे मोठे यश प्राप्त झाले आहे. सदर विजय हा कामगारांच्या  एकजुटीचा विजय आहे.  व्यवस्थापनाने  कामगारांच्या मागण्या मान्य केल्या आहेत.  मंजूर करण्यात आलेल्या मागण्या    यापुढे कोणत्याही कामगाराला मानसिक व शारीरिक त्रास होणार नाही याची दखल घेण्यात येईल.   भारतीय कामगार सेनेला मान्यता प्राप्त युनियन म्हणून व्यवस्थापनाद्वारे मंजुरी व कामगारांचा पगारवाढीचा सामंजस्य करार देखील भारतीय कामगार सेने सोबत करणार  कामाच्या पद्धती बाबत घ्यावयाचे निर्णय हे कर्मचारी व व्यवस्थापनाचे प्रतिनिधी असलेल्या संयुक्त समितीच्या मार्फत घेतले जाणार.  आत्महत्या केलेला कामगार कै.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची 27 मे रोजी शिर्डी मध्ये महत्वपूर्ण बैठक

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची 27 मे रोजी शिर्डी मध्ये महत्वपूर्ण बैठक लोकमानस प्रतिनिधी  मुंबई  - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी ची महत्वपूर्ण बैठक येत्या 27 मे रोजी सकाळी 11.30 वाजता शिर्डी येथे आयोजित करण्यात आली आहे. या राष्ट्रीय कार्यकारिणी च्या  बैठकीचे अध्यक्षस्थान रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले भूषविणार आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या  शिर्डी मधील राष्ट्रीय  कार्यकारिणीच्या या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे  नागालँड मधील नव निर्वाचित दोन्ही आमदार उपस्थित राहणार आहेत.   शिर्डी मधील हॉटेल पॅलेस  मधील सभागृहात आयोजित रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी ची बैठकीला देशभरातील 30 राज्यांचे रिपाइं चे प्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. रिपब्लिकन पक्षाचे संघटन काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सर्व राज्यांमध्ये  स्थापन करण्यात पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांना यश आलेले असून देशभरातील सर्व राज्यांचे रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी या राष्ट्रीय कार्यकारिणी च्या बैठकीला उ

बारावीचा निकाल जाहीर, ९१.२५ टक्के उत्तीर्ण, कोकण विभाग प्रथम क्रमांकावर

  बारावीचा निकाल जाहीर, ९१.२५ टक्के उत्तीर्ण, कोकण विभाग प्रथम क्रमांकावर  लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - राज्यातील बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ९१.२५ टक्के निकाल लागला आहे. निकालात कोकण विभागाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोकण विभागाचा निकाल ९६.०१ टक्के लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल ८८.१३ टक्के लागला असून मुंबई विभागाला सगळ्यात शेवटचा क्रमांक मिळाला आहे.  मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९३.७३ टक्के तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८९.१४ टक्के आहे.  राज्यातील विभागांचे निकाल पुढीलप्रमाणे -  कोकण : 96.01 % पुणे : 93.34 % कोल्हापूर : 93.28 % अमरावती : 92.75 % औरंगाबाद : 91.85 % नाशिक : 91.66 %  लातूर : 90.37 %  नागपूर : 90.35 % मुंबई : 88.13 %

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेत राज्यातील 70 हून अधिक उमेदवार यशस्वी

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेत  राज्या तील  70 हून अधिक उमेदवार यशस्वी प्रतिनिधी  नवी दिल्‍ली   : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशातील एकूण 933 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 70 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. राज्यातून डॉ. कश्मिरा संखे प्रथम तर देशात तिने 25 वा क्रमांक पटकाविला आहे.              केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष 2022 च्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील 7 पेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश आहे.  (25) कश्मिरा संखे, (28) अंकिता पुवार, (54) रूचा कुलकर्णी, (57) आदिती वषर्णे, (58) दिक्षिता जोशी, (60) श्री मालिये, (76) वसंत दाभोळकर, (112) प्रतिक जरड, (127) जान्हवी साठे, (146) गौरव कायंडे पाटील, (183) ऋषिकेश शिंदे, (214) अर्पिता ठुबे, (218) सोहम मनधरे, (265) दिव्या गुंडे, (266) तेजस अग्निहोत्री, (277) अमर राऊत, (278) अभिषेक दुधाळ, (281) श्रुतिषा पाताडे, (287) स्वप्निल पवार, (310) हर्ष मंडलिक, (348) हिमांषु सामंत, (349) अनिकेत हिरडे, (370) संकेत गरूड, (38

संकल्प प्रतिष्ठान द्वारा कणकवली येथे बांबू लागवड कार्यशाळेचे आयोजन

इमेज
संकल्प प्रतिष्ठान द्वारा कणकवली येथे बांबू लागवड कार्यशाळेचे आयोजन लोकमानस प्रतिनिधी कणकवली -  उद्योग व्यवसाय व कृषी या विषयावर मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमांचे गेली १२ वर्षे यशस्वीरित्या आयोजन करण्यात येणा-या संकल्प प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग) द्वारा कणकवली येथे बांबू लागवड कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.  रविवार दिनांक २८ मे, २०२३ रोजी सकाळी १० वाजता ही कार्यशाळा कणकवली येथे संपन्न होणार आहे. कोकणात बांबू लागवड करण्यायोग्य जमिन मोठ्या प्रमाणावर असून वातावरण ही पोषक आहे. त्याशिवाय बांबू पिकाला सुरवातीला १ ते २ वर्षे पाणी पुरवठा केल्यास उत्तम. त्यामुळे कमी पाण्याचा पुरवठा असलेल्या ठिकाणीही बांबू लागवड करता येते. तसेच खत व किटकनाशके यांचाही खर्च खुप कमी असतो. या पिकाचा देखभाल करण्यासाठी ही जास्त खर्च किंवा कष्ट करावे लागत नाही.  सर्वसाधारणपणे ३ ते ४ वर्षांनी उत्पादन मिळण्यास सुरवात होते व पुढे दरवर्षी नियमितपणे उत्पादन मिळते.  बांबूच्या अनेक जाती असून मागणीचा विचार करून व तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या जातीची निवड करता येते. सध्या बांबूला असलेली मागणी व

2000 च्या नोटा वितरणातून रद्द, 30 सप्टेंबर पर्यंत बदलून घेता येणार

2000 च्या नोटा वितरणातून रद्द, 30 सप्टेंबर पर्यंत बदलून घेता येणार   लोकमानस प्रतिनिधी  रिझर्व्ह बँकेने 2 हजाराच्या नोटा वितरणातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यामुळे आता दोन हजाराच्या नोटा व्यवहारात वापरता येणार नाहीत.  23 मे ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत नागरिक त्यांच्याकडील 2 हजाराच्या नोटा बँकांमधून बदलून घेऊ शकतील.मात्र एका वेळी कमाल 10 नोटा बदलून मिळतील.  नागरिकांना त्यांच्याकडील 2 हजाराच्या नोटा बँकांमध्ये खात्यात जमा करता येतील.   इतर मूल्यांच्या नोटा बाजारात पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत, असे कारण देत आरबीआयने २ हजारांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 2016 मध्ये नोटबंदीनंतर 2000 ची नोट बाजारात आणण्यात आली होती. 

अंगणवाडी सेविका मे महिन्यात देखील मार्च महिन्याच्या मानधनाच्या प्रतिक्षेत, या सरकारचं आता करायचं तरी काय?- अंगणवाडी कर्मचारी यांचा संतप्त सवाल

अंगणवाडी सेविका मे महिन्यात देखील मार्च महिन्याच्या मानधनाच्या प्रतिक्षेत,   या सरकारचं आता करायचं तरी काय? - अंगणवाडी कर्मचारी यांचा संतप्त सवाल  लोकमानस प्रतिनिधी      सिंधुदूर्ग -    दरमहा ५ तारखेपूर्वी अंगणवाडी कर्मचारी यांना मानधन मिळालेच पाहीजे असा शासनाचा जी.आर.आहे ,मात्र त्याचे पालन सरकारडून होत नाही.  मार्च महिन्याचे मानधन आता हे महिना संपत आला तरी अजून मिळालेले नाही. खरे तर कमी मानधनात काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना महीन्याचा खर्च या महागाईत कसा भागवायचा हा यक्षप्रश्न त्यांना सतत भेडसावत असतोच आणि त्यातही पावसाची बेजमी,मुलांची वह्या पुस्तके, किराणाची बीले भागवणे,लग्नकार्ये आदी गोष्टी मे महिन्यात त्यांची झोप उडवत असतात,अशा वेळी मार्च आणि एप्रिल ते मानधन न आल्यामुळे त्यांची काय अवस्था झाली असेल याची कल्पना करणेही कठीण झाले आहे.अनेक पत्रे पाठवल्यानंतर केंद्राचा हिस्सा ६० टक्के मार्चचे मानधन दोन दिवसांपूर्वी मिळाले. उरलेल्या राज्य सरकारचे वाट्याचे ४० टक्के मानधनाचा पत्ताच नाही. एप्रिलचे मानधन १५००रुपयांनी वाढून येणार होते ,त्याचाही पत्ता नाही, म्हणून सरकारचे डोके ठिकाणावर आह

कर्नाटकात कमळ कोमेजले,सत्तारुढ भाजप पिछाडीवर, कॉंग्रेस आघाडीवर

कर्नाटकात कमळ कोमेजले,सत्तारुढ भाजप पिछाडीवर,  कॉंग्रेस आघाडीवर कॉंग्रेस -135, भाजप -66, जनता दल सेक्युलर - 19,  अपक्ष -2, इतर पक्ष- 2  लोकमानस प्रतिनिधी  मुंबई संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसची दमदार विजयाकडे वाटचाल होत असून सत्ताधारी भाजपची पराभवाच्या दिशेने मार्गक्रमणा होत आहे.  दुपारी दोन वाजता निवडणूक आयोगाच्या अधिकृत निकालानुसार एकूण 224 सदस्य संख्येच्या विधानसभेत कॉंग्रेस 134 जागांवर आघाडीवर आहे तर भाजप 64 जागांवर व जनता दल सेक्युलर 22 जागांवर आघाडीवर आहे. निकाल जाहीर झालेल्या 12 जागांपैकी 8 जागांवर कॉंग्रेस तर 4 जागांवर भाजप विजयी झाले.   कर्नाटकातील विजयामुळे भाजपच्या गोटात शांतता आहे तर कॉंग्रेस कार्यकर्ते जल्लोष करत आहेत.  अंतिम निकाल  कॉंग्रेस -135, भाजप -66, जनता दल सेक्युलर - 19,  अपक्ष -2, इतर पक्ष- 2 

हज यात्रेकरुंचा कोटा व प्रवासखर्च पुर्ववत करा: नसीम खान

हज यात्रेकरुंचा कोटा व प्रवासखर्च पुर्ववत करा: नसीम खान लोकमानस प्रतिनिधी मुंबई हज यात्रेला जाण्याची इच्छा असणाऱ्या सर्वसामान्य मुस्लीम व्यक्तीचे हे स्वप्नही आता धुसर झाले आहे. केंद्र सरकार हज यात्रेकरुंसाठी सवलत देत होते परंतु केंद्रातील भाजपा सरकारने हज यात्रेकरुंचा कोटा कमी करुन यात्रेसाठी लागणाऱ्या खर्चातही वाढ केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून हजयात्रेकरुंचा कोटा पूर्ववत करावा व वाढवलेला खर्चही कमी करुन मुस्लीम बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी राज्याचे माजी मंत्री व प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात नसीम खान म्हणतात की, केंद्रीय हज कमिटीच्या माध्यमातून हज यात्रेला जाणारे लोक गरिब व आर्थिकदृष्ट्या कमी उत्पन्न असलेल्या गटातील असतात. २०१९ पर्यंत केंद्रीय हज कमिटीमार्फत दरवर्षी २ लाख लोकांना हज यात्रेसाठी पाठवले जात होते व त्यांच्यासाठी लागणारा खर्च २.९ लाख रुपयांपेक्षा कमी होता, यात कुर्बानीसाठी लागणाऱ्या खर्चाचाही समावेश होता तसेच या रकमेतून हज यात्रेकरुला २१०० सोदी रियाल

कोकण बँकेच्या अध्यक्षपदी आसिफ दादन, उपाध्यक्षपदी असगर डबीर

इमेज
कोकण बँकेच्या अध्यक्षपदी आसिफ दादन, उपाध्यक्षपदी असगर डबीर लोकमानस प्रतिनिधी  मुंबई  कोकण बँकेच्या अध्यक्षपदी आसिफ दादन तर उपाध्यक्षपदी असगर डबीर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक काही दिवसांपूर्वीच बिनविरोध झाली होती.  बँकेंचे मावळते अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी नवनियुक्त अध्यक्ष आसिफ दादन व उपाध्यक्ष असगर डबीर यांचे अभिनंदन केले. नवीन संचालक मंडळ व अध्यक्ष,  उपाध्यक्ष 2023 ते 2028 या कालावधीसाठी निवडण्यात आले आहेत.  

राष्ट्रीय लोक अदालत मध्ये तब्बल 402 कोटींची 9979 प्रकरणे तडजोडीने निकाली

राष्ट्रीय लोक अदालत मध्ये तब्बल 402 कोटींची 9979 प्रकरणे   तडजोडीने निकाली प्रतिनिधी  मुंबई -  मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे  30 एप्रिल रोजी मुंबई शहरामध्ये राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एकूण 402 कोटींची  9979 प्रकरणे तडजोडीने निकाली लागली. लोकन्यायालयाचे उदघाटन हे वृक्षाला पक्षकार, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी व मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष  अनिल सुब्रम्हण्यम, सरकारी वकील जयसिंग देसाई यांचे हस्ते जल अर्पण करून करण्यात आले. राष्ट्रीय लोक अदालतीसाठी संपूर्ण शहरामध्ये 86 पॅनलची स्थापना करण्यात आली होती. दिवाणी, फौजदारी, मोटर अपघात , बँकेची वाद पूर्व प्रकरणे, महावितरण, बेस्ट व अदानी,  आयडिया व्होडाफोनची प्रकरणे ठेवण्यात आली होती.  लोक अदालत मध्ये 45 हजार 331 प्रलंबित व 80 हजार 791 दाखल पूर्व अशी एकूण  1 लाख 26 हजार 122 प्रकरणे ठेवण्यात आली होती.  त्यापैकी 8 हजार 345 प्रलंबित व 1 हजार 634 दाखल पूर्व अशी एकूण 9 हजार 979  प्रकरणे तडजोडीने निकाली लागली. लोक अदालतच्या पार्श्वाभूमीवर मुख्यमहानगर दंडाधिकारी व महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालया

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन

इमेज
मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचेे मध्यरात्री ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले.  ते 63 वर्षांचे होते. 2017 ते 2019 दरम्यान महाडेश्वर मुंबईच्या महापौरपदी कार्यरत होते.  गेल्या काही दिवसांपूर्वीच ते कणकवली येथून मुंबईला परतले होते.   उध्दव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात.  2019 मध्ये त्यांनी ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाचा समावेश असलेल्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेतर्फे विधानसभा निवडणूक लढवली होती.  मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता.  सांताक्रुझ पूर्व येथील राजे संभाजी विद्यालयात त्यांचे पार्थिव दुपारी दोन वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल व त्यांनंतर दुपारी ४ वा.अंत्ययात्रा टीचर्स कॉलोनी येथील स्मशान भूमीच्या दिशेने निघेल. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे महाडेश्वर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतील व अंत्ययात्रेत सहभागी होतील.                

मुंबई बंदरातील शतकपूर्ती कामगार संघटनेचा वर्धापन दिन साजरा

इमेज
मुंबई बंदरातील शतकपूर्ती कामगार संघटनेचा वर्धापन दिन साजरा लोकमानस प्रतिनिधी मुंबई - भारतातील बंदर व गोदी  उद्योगातील  ३ मे १९२० रोजी मुंबई बंदरात स्थापन झालेल्या  मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचा  १०४ वा  वर्धापन दिन  माझगाव येथील कामगार सदन सभागृहात  ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न झाला. याप्रसंगी ॲड.एस.के.शेट्ये यांनी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की. संघटनेच्या चांगल्या कार्यामुळे आपली सभासद संख्या वाढत चालली आहे. हे श्रेय सर्व कामगार कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे आहे. कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी ८ ऑगस्ट 2023 रोजी स्व. डॉ.  शांती पटेल यांच्या जयंतीनिमित्त गोदी कामगारांचा कौटुंबिक मेळावा घेण्यात येईल. आज  कामगार चळवळी समोर अनेक आव्हाने असून, त्याचा सामना करण्यासाठी सर्व कामगारांनी एकजुटीने राहण्याची गरज आहे.  युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, गोदी कामगारांना चांगली पगार वाढ, पेन्शन, आरोग्य सुविधा, कॅन्टीन सुविधा, कामगारांना प्रबोधन करण्यासाठी पोर्ट

बार कॉन्सिलची ई-फाईलिंग सुविधा उपयुक्त; राज्यातील न्यायालयांचे कामकाज मराठीतून व्हावे – मुख्यमंत्री, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या ई-फाईलिंग आणि सुविधा केंद्रांचे उद्घाटन

इमेज
बार कॉन्सिलची ई-फाईलिंग सुविधा उपयुक्त; राज्यातील न्यायालयांचे कामकाज मराठीतून व्हावे – मुख्यमंत्री, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या ई-फाईलिंग आणि सुविधा केंद्रांचे उद्घाटन लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -  आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ई-फाईलिंग सुविधा निर्माण करण्याचे बार कौन्सिलचे कार्य अभिनंदनीय आहे. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे मार्गी लावणे तसेच सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ई-फाईलिंग सुविधा उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच राज्यातील न्यायालयाचे कामकाज मराठीतून करण्याबाबत केंद्र सरकारने विचार करावा, अशी अपेक्षादेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. दादरमधील स्वामी नारायण मंदिर सभागृहात आयोजित मुंबई महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या ई-फाईलिंग  आणि सुविधा केंद्रांच्या वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय विधि व न्याय मंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे यांच्यासह राज्याचे महाधिवक्ता, राष्ट

हाॅटेल आयटीसी मराठाच्या कामगारांना भरघोस पगारवाढ

इमेज
हाॅटेल आयटीसी मराठाच्या कामगारांना भरघोस पगारवाढ लोकमानस प्रतिनिधी  मुंबई-  भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथील हॉटेल आयटीसी मराठा मधील कामगारांची ऐतिहासिक पगारवाढ करण्यात आली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना नेते, माजी केंद्रीय मंत्री, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, खासदार अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी यांच्या सुचनेनुसार व संयुक्त सरचिटणीस  संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली ही पगारवाढ करण्यात आली.  १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२६ या चार वर्षांकरिता किमान ₹ ५,०००/- आणि कमाल ₹ २१,०००/- इतकी पगारवाढ मिळणार आहे. वाढीव पगारातील ४० टक्के रक्कम बेसिक तर ६० टक्के रक्कम इतर भत्त्यांमध्ये जमा होणार आहे. त्याचबरोबर कामगारांना पुढील लाभही मिळणार आहेत. १)२३ कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी      करण्यात येणार २)१५ एफ टी सी कामगारांना कायमस्वरूपी करण्यात येणार. ३)निवृतीचे वय ५८ वरून ६० वर्ष केले ४)ट्रॅव्हलिंग अलाऊन्स ३५००/-, ५७५०/- व ९०००/- हे अव

जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा, राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हा कार्यकारिणीचा देखील राजीनामा

जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा, राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हा कार्यकारिणीचा देखील राजीनामा लोकमानस प्रतिनिधी  मुंबई- शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षदाचा दिलेला राजीनामा मागे घ्यावा या मागणीसाठी माजी मंत्री, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. आव्हाड यांच्यासहित  शहराध्यक्ष तथा ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे, महिलाध्यक्षा सुजाता घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर,  युवती अध्यक्षा पल्लवी जगताप यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविले आहेत. पत्रकार परिषदेत आव्हाड यांनी ही घोषणा केली.    आव्हाड म्हणाले,  शरद पवार ही महाराष्ट्राची गरज आहे. शरद पवार हे सक्रीय राजकारणातून बाजूला होणे म्हणजे महाराष्ट्राचे मोठे नुकसान आहे.  हे नुकसान थांबविण्यासाठी शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते , मा. मंत्री डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली.  सध्या राज्यात वादळ घोंघावत आहे. या घोंघावणाऱ्या वादळाशी लढण्यासाठी शरद पवा

शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोडणार, निर्णय मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव

  शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोडणार, निर्णय मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव  लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरुन निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेते व कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कार्यकर्ते पवारांना हा निर्णय मागे घेण्यासाठी  दबाव टाकत आहेत. मात्र पवार यांनी आपण या निर्णयावर कायम असल्याचे स्पष्ट करत पक्षासाठी नेहमी उपलब्ध राहण्याची ग्वाही दिली आहे.  लोक माझे सांगाती या पवारांच्या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी पवार यांनी ही घोषणा मुंबईत केली. राष्ट्रीय राजकारणात कार्यरत राहू मात्र अध्यक्षपदावरुन निवृत्ती घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या समितीने नवीन अध्यक्षपदाबाबत निर्णय घ्यावा असे आवाहन पवार यांनी केले आहे.  गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील राजकारणात अनेक संभ्रम पसरवणाऱ्या बातम्या समोर येत आहेत. त्यामध्ये पवार यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताने नवीन राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता नाकारता ये

सर्वांनी एकत्र येऊन बलशाली महाराष्ट्र घडवूया - राज्यपालांचे आवाहन

इमेज
सर्वांनी एकत्र येऊन बलशाली महाराष्ट्र घडवूया महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल रमेश बैस यांचे आवाहन लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकास घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन बलशाली महाराष्ट्र घडवूया, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात बोलताना केले. राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला तसेच यावेळी राष्ट्रगीत आणि राज्यगीत गाऊन ध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी झालेल्या पथसंचलानाचे राज्यपालांनी निरीक्षण केले. राज्यपाल  बैस यांनी यावेळी आपल्या भाषणात जगभरातील मराठी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. त्याचप्रमाणे कामगारांच्या आणि श्रमिकांच्या घामातून हा महाराष्ट्र घडल्याचा उल्लेख करून आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाबरोबरच महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फु

मुख्य सचिवपदाचा पदभार मनोज सौनिक यांनी स्वीकारला

  मुख्य सचिवपदाचा पदभार मनोज सौनिक यांनी स्वीकारला         लोकमानस प्रतिनिधी      मुंबई :- महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी मावळते मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्याकडून मंत्रालयात पदभार स्वीकारला.             यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल व वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे,  वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी,  सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे,  कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद सिंघल, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, सहकार विभागाचे सचिव रणजित सिंह देओल, माहिती व जनसंपर्क विभागाच्या महासंचालक जयश्री भोज, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक अमित सैनी, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी मुख्य स