खाजगी क्षेत्रात आरक्षण आणि पदोन्नती मधील आरक्षणासह रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी च्या बैठकीत ठराव मंजूर


खाजगी क्षेत्रात आरक्षण आणि पदोन्नती मधील आरक्षणासह रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी च्या बैठकीत ठराव मंजूर
लोकमानस प्रतिनिधी 
शिर्डी  -रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक शिर्डी येथील हॉटेल पॅलेशियन मध्ये रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 
आठवले हे राज्यसभेचे खासदार असून त्यांची मुदत 2026 पर्यंत आहे. त्यामुळे जर त्यांना लोकसभा निवडणूक लढण्यासाठी शिर्डी मतदारसंघात भाजप ने मित्रपक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला जागा सोडुन संधी दिली तर त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करू. रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळण्यासाठी महाराष्ट्रात लोकसभेच्या दोन जागा जिंकणे आवश्यक आहे. त्यासाठी भाजप ने मित्रपक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या दहा जागा सोडाव्यात अशी मागणी करणारा ठराव आजच्या बैठकीत मंजूर झाल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली. 
या बैठकीमध्ये  पदोन्नतीमधील आरक्षण आणि खाजगी क्षेत्रांतील आरक्षणासह अनेक महत्वपूर्ण विषयावरचे ठराव संमत झाले.

 या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला पक्षाचे नागालँड चे  नवनिर्वाचित आमदार इम्ति चोबा; लिमा चँग;  राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे; सीमा आठवले; राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; विनोद निकाळजे; आंध्र प्रदेश चे नागेश्वर राव गौड; तेलंगणा चे रवी पसूला; छत्तीसगड च्या उषा ;  शिला गांगुर्डे; ऍड.बी के बर्वे; सुरेश बारशिंग;एम एस नंदा; गुजरात प्रभारी जतीन भुट्टा उपस्थित होते.

या बैठकीचे नियोजन स्थानिक जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात; संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव; विजय वाकचौरे; बाळासाहेब गायकवाड; पप्पू बनसोडे;आदी अनेकांनी  केले.

राष्ट्रीय कार्यकारिणीत मंजूर करण्यात आलेले
ठराव पुढीलप्रमाणे
1. आगामी 2024 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका रिपब्लिकन पक्ष भाजपशी युती करुन आणि एनडीएचा घटक पक्ष म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात निवडणुकांना सामोरे जाईल असा ठराव झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व जगात प्रथम क्रमांकाचे असुन ते विश्वनेता ठरले आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात म्हणजेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशाला जी-20 या आंतरराष्ट्रीय संघटनेचे अध्यक्षपद प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात लाभले. ही देशासाठी गौरवाची बाब असुन जी-20 अध्यक्षपदाचा बहुमान यशस्वीरित्या पार पाडीत असल्याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे अभिनंदन करणारा ठराव या बैठकीत मंजुर करण्यात आला. 

2. पदोन्नतीमध्ये (प्रमोशनमध्ये) रिझर्वेशनचा कायदा संसदेमध्ये केला पाहिजे आणि सुप्रिम कोर्टाने निर्देश दिल्याप्रमाणे प्रमोशनमध्ये रिझर्वेशन सर्व राज्यसरकारांनी अंमलबजावणी केली पाहिजे. तसेच एस.टी, एस.सी. ओ.बी.सी. अधिकारी कर्मचा-यांना पदोन्नती मिळाली पाहिजे.  असाही ठराव मंजुर करण्यात आला.

3. देशात अनेक सरकारी यंत्रणाचे खाजगीकरण होत आहे त्यामुळे खाजगी क्षेत्रात आरक्षण लागु करण्यात यावे.  

4. दलित आदिवासी गरीब भूमिहीनांना 5 एकर जमीन देण्याचा कार्यक्रम शासनाने राज्यात राबवावा. असाही ठराव मंजुर करण्यात आला

5. ओबीसी आणि सर्व जाती समूहांची जातीनिहाय जनगणना व्हावी.

6. भटक्या विमुक्तांसाठी ओबीसी मध्ये वर्गवारी करून भटक्या विमुक्तांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे.

7. सफाई कामगार अनेक वर्षे कंत्राटी कामगार म्हणून काम करतात मात्र त्याचा  त्यांना काही लाभ होत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जे  नित्याचे आहे ते काम कंत्राटी तत्वावर करू नये त्यात कायमस्वरूपी कामगार असावेत. त्यामुळे सफाईकाम नित्याचेच असल्याने सफाईकामातील कंत्राटी पद्धत बंद करून कायमस्वरूपी सफाईकामगार नेमावेत. सफाई कामगारांना अनेक वर्षे कंत्राटी ठेवण्यात येते त्यात बदल करून त्यांना कायम करावे. ज्या कंत्राटी सफाईकामगारांना सध्या 5 वर्षे झाली आहेत त्यांना तातडीने कायमस्वरूपी तत्वावर सफाई कामगार पदाची नोकरी देण्यात यावी. असाही ठराव मंजुर करण्यात आला.

8. तसेच महिलांना विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये 33 टवके देण्यात आले पाहिजे आणि त्याबाबतचा कायदा संसदेत झाला पाहिजे. असाही ठराव आजच्या बैठकीत संमत करण्यात आला. 

9.  अमेरिकेत न्यूयॉर्क मधील युनोच्या मुख्यालयात (संयुक्त राष्ट्र महासंघ मुख्यालयात) महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात आला पाहिजे. तसेच अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि पश्चिम बंगालचा उपसागर हे तिन समुद्र ज्या  कन्याकुमारीच्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात यावा असाही ठराव मंजुर करण्यात आला. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही