चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचे निधन

चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर 
यांचे निधन 
लोकमानस प्रतिनिधी- 
चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचे दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले. ते 48 वर्षांचे होते. 
दिल्ली इथल्या वेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पित्ताशय  आणि स्वादुपिंडामध्ये इन्फेक्शन झाल्याने धानोरकर यांना नागपूर इथून एअर अॅम्ब्युलन्सने दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखरे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी एअर अॅम्ब्युलन्सने त्यांचं पार्थिव चंद्रपुरात आणण्यात येईल. तर उद्या वरोरा इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर यांनी ही माहिती दिली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब