अंगणवाडी सेविका मे महिन्यात देखील मार्च महिन्याच्या मानधनाच्या प्रतिक्षेत, या सरकारचं आता करायचं तरी काय?- अंगणवाडी कर्मचारी यांचा संतप्त सवाल

अंगणवाडी सेविका मे महिन्यात देखील मार्च महिन्याच्या मानधनाच्या प्रतिक्षेत,  
या सरकारचं आता करायचं तरी काय?
- अंगणवाडी कर्मचारी यांचा संतप्त सवाल

 लोकमानस प्रतिनिधी 
    सिंधुदूर्ग - 
  दरमहा ५ तारखेपूर्वी अंगणवाडी कर्मचारी यांना मानधन मिळालेच पाहीजे असा शासनाचा जी.आर.आहे ,मात्र त्याचे पालन सरकारडून होत नाही.  मार्च महिन्याचे मानधन आता हे महिना संपत आला तरी अजून मिळालेले नाही. खरे तर कमी मानधनात काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना महीन्याचा खर्च या महागाईत कसा भागवायचा हा यक्षप्रश्न त्यांना सतत भेडसावत असतोच आणि त्यातही पावसाची बेजमी,मुलांची वह्या पुस्तके,
किराणाची बीले भागवणे,लग्नकार्ये आदी गोष्टी मे महिन्यात त्यांची झोप उडवत असतात,अशा वेळी मार्च आणि एप्रिल ते मानधन न आल्यामुळे त्यांची काय अवस्था झाली असेल याची कल्पना करणेही कठीण झाले आहे.अनेक पत्रे पाठवल्यानंतर केंद्राचा हिस्सा ६० टक्के मार्चचे मानधन दोन दिवसांपूर्वी मिळाले. उरलेल्या राज्य सरकारचे वाट्याचे ४० टक्के मानधनाचा पत्ताच नाही. एप्रिलचे मानधन १५००रुपयांनी वाढून येणार होते ,त्याचाही पत्ता नाही, म्हणून सरकारचे डोके ठिकाणावर आहे की नाही असा सवाल अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नेत्या कमलताई परुळेकर यांनी सरकारला विचारला आहे.
      आहार बऱ्याच ठिकाणी अंगणवाडी
कर्मचारी शिजवून देतात,सीबीई कार्यक्रम दरमहा ५००रुपयाचे करावे लागतात,ऑफीसमधे मीटींग लावली की तालुक्याला जावे लागते,तो प्रवास खर्च,असे सर्व पैसे ३१मार्चला ऑफीसला मिळाले, तरी आळसावलेल्या ऑफीस कर्मचारी यांनी ती बीले खर्ची न टाकल्यामुळे काही तालूक्यांचे पैसे परत गेले,आता कधी परत पैसे मिळणार माहीत नाही.अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आता करावे तरी काय? असा प्रश्न परुळेकर यांनी उपस्थित केला
आयुक्त,मंत्री,मुख्यमंत्री कोणालाही
अंगणवाडी कर्मचारी यांची चिंता नाही.कारण ते ए सी.मध्ये बसतात,त्यांची डोकी कशाला तापतील?
अंगणवाडी कर्मचाऱ्यांची डोकी आता फुटणे फक्त बाकी आहे.सरकारच्या बाकी चैनी सुखेनैव चालू आहेत,अंगणवाडी कर्मचारी यांचे मानधन देतांना फक्त सरकारकडे पैसे नसतात का?असा सवाल कमलताईनी केला आहे.
       श्रीमंतांना सवलती आणि गरीबांना धत्तुरा ही नीती सरकार राबवीत आहे,या सरकारचा आम्ही धिक्कार करतो ,हे सरकार सुप्रीम कोर्टाच्या निकालाने तरी जाईल असे वाटत होते, कोर्टाने मारलेले ताशेरेही ज्यांना बोचत नाहीत,त्या सरकारने नैतिकता म्हणून राजीनामा द्यायला हवा होता,पण तेही सरकार करीत नाही,आता असंघटित कामगारांचा उद्रेकच या सरकारला धडा शिकवेल असेही कमलताई परुळेकर म्हणाल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही