भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांना मोठे यश, इंडिगो एअरलाइन्सच्या एजाईल कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या व्यवस्थापनाद्वारे मान्य

भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांना मोठे यश,  इंडिगो एअरलाइन्सच्या एजाईल कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या व्यवस्थापनाद्वारे मान्य
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई - 
मुंबई विमानतळ येथील इंडिगो एअरलाइन्सला सेवा पुरवणाऱ्या एजाईल एअरपोर्ट सर्व्हिस प्रा. लि. कंपनीतील कामगारांनी  व्यवस्थापनाद्वारे होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासाच्या विरोधात दिनांक २५ मे २०२३ रोजी सकाळ पासून सुरू केलेल्या उत्स्फूर्त संपाला भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांमुळे मोठे यश प्राप्त झाले आहे. सदर विजय हा कामगारांच्या  एकजुटीचा विजय आहे.  व्यवस्थापनाने  कामगारांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. 
मंजूर करण्यात आलेल्या मागण्या 
 यापुढे कोणत्याही कामगाराला मानसिक व शारीरिक त्रास होणार नाही याची दखल घेण्यात येईल. 

 भारतीय कामगार सेनेला मान्यता प्राप्त युनियन म्हणून व्यवस्थापनाद्वारे मंजुरी व कामगारांचा पगारवाढीचा सामंजस्य करार देखील भारतीय कामगार सेने सोबत करणार

 कामाच्या पद्धती बाबत घ्यावयाचे निर्णय हे कर्मचारी व व्यवस्थापनाचे प्रतिनिधी असलेल्या संयुक्त समितीच्या मार्फत घेतले जाणार. 

आत्महत्या केलेला कामगार कै. विजय लक्ष्मण वाकचौरे यांच्या कुटुंबाला पूर्ण भरपाई देणार व त्यांच्या पत्नीला तिच्या शिक्षणाानुसार नोकरी देण्यात येणार. 

यावर्षी होणारी तात्पुरता पगारवाढ थकबाकीसह येत्या महिन्यात देणार. 

सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार  अरविंद सावंत, विभागप्रमुख, आमदार अॅड.अनिल परब  व कार्याध्यक्ष अजीत साळवी, संयुक्त सरचिटणीस संजय कदम व चिटणीस योगेश आवळे यांनी मोलाचे कार्य केले.

यावेळी भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव, चिटणीस संतोष कदम, सुर्यकांत पाटील, मनोहर धुमाळ, राजा ठाणगे, सहचिटणीस विजय शिर्के, मिलिंद तावडे, संजीव राऊत, विनायक शिर्के व एजाईल कंपनीतील बहुसंख्य कामगार सहभागी झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही