मुंबईतील नदी-नाल्याची साफसफाईच्या नावाखाली झालेल्या रुपये 280 कोटीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी - नसीम खान यांची मागणी

मुंबईतील नदी-नाल्याची साफसफाईच्या नावाखाली झालेल्या रुपये 280 कोटीच्या  भ्रष्टाचाराची चौकशी करावी -  नसीम खान यांची मागणी
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई - 
 माजी मंत्री व कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे मनपा मार्फत मुंबईतील नदी नाल्याच्या नावाखाली होत असलेल्या भराष्ट्राचारची SIT मार्फत चौकशी करावी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी केली आहे. 
मागील १२ दिवसांपूर्वी पावसाळ्याच्या अगोदर मुंबईतील नदी नाल्याची साफसफाई झाली पाहिजे याची पाहणी करून माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री व मनपा आयुक्त यांना पावसाळा अगोदर मुंबईतील मिठी नदी व सर्व नाल्याची खालपर्यंत साफसफाई करण्यात यावी अशी ट्विटर द्वारे मागणी केली होती. त्यांच्या मागणीची तत्काळ दखल घेत  दिवसांनी राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे  यांनी संपूर्ण मुंबईचा दोन दिवसीय नदी नाल्याच्या साफसफाईचा पाहणी दौरा केला आणि मनपाला पावसाळा सुरू होण्यापूर्वी साफसफाई करण्याचे सक्त निर्देश दिले व तसे न केल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 
दोन दिवसापूर्वी मनपाने घोषणा करून सांगितले की, मुंबईतील नदी नाल्याची साफसफाई पूर्ण झाली आहे. 
मनपाच्या याच दाव्याची सत्यता पाहण्यासाठी आज माजी मंत्री नसीम खान यांनी  वांद्रे कुर्ला संकुल येथील टेलिफोन एक्सचेंज जवळील मिठी नदी ब्रिज, कपाडिया नगर सीएसटी रोड येथील ब्रिज खालील मिठी नदीचे पात्र, त्यानंतर कलिना एअरपोर्टला लागून असलेल्या मिठी नदी ब्रिज आणि साकीनाका येथील टिळक नगर, 90 फूट रोड येथील मोठा नाला व इतर विविध ठिकाणी पाहणी दौरा केला. नसीम खान यांनी पायात गम-बूट घालून आणि हातात मीटर गेज घेऊन नाल्यात उतरून मीडिया समोर मनपा मार्फत साफसफाईच्या नावाखाली होत असलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली आणि मनपाचा दावा खोटा असून मनपा अधिकारी व ठेकेदार यांनी हात मिळवणी करून नदी नाल्याच्या साफसफाईच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचाही आरोप केला.
 यावेळी नसीम खान यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले की राज्यातील शिंदे सरकारची वचक मनपा अधिकाऱ्यावर राहिलेली नाही, मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यानंतर सुद्धा मनपा अधिकाऱ्यांनी निष्काळजी करून भ्रष्टाचार केला आहे. नसीम खान यांनी शिंदे सरकारकडे मागणी केली आहे की, मनपा मध्ये होत असलेल्या नदी नाल्याच्या साफसफाईच्या नावाखाली, रस्ते बनविण्याच्या नावाखाली, रोड-गटर-शौचालय, आपला दवाखाना व मनपाच्या दवाखान्यात होत असलेल्या भ्रष्टाचार या सर्व बाबींची विशेष तपास पथका (SIT) मार्फत चौकशी करावी आणि भ्रष्ट अधिकार्याावर कारवाई करून त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी केली आहे. 
आजच्या पहाणी दौरा वेळी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते  भरत सिंह, मुंबई प्रदेश सरचिटणीस प्रभाकर जावकर जिल्हा उपाध्यक्ष गणेश चव्हाण, बिंदू पाठक, माजी नगरसेवक शरद पवार, ब्लॉक अध्यक्ष असलम खान आशिष मोरे, चांदिवली तालुकाध्यक्षा  माया खोत, उत्तर भारतीय सेलचे जिल्हाध्यक्ष भरत सिंह, देवेंद्र तिवारी, काँग्रेस सेवादल चे जिल्हाध्यक्ष विनोद गुप्ता सेवादल चे तालुका अध्यक्ष गुलाबचंद शुक्ला, शहजाद खान, मनोज तिवारी, मुर्तुजा अन्सारी, शहजादे शेख, दिनेश मधुकुंठा, अवधूत शेलार, रियाज मुल्ला, अशरफ खान, आफताब चौधरी यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व कॉँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. 

*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही