बारावीचा निकाल जाहीर, ९१.२५ टक्के उत्तीर्ण, कोकण विभाग प्रथम क्रमांकावर

 बारावीचा निकाल जाहीर, ९१.२५ टक्के उत्तीर्ण, कोकण विभाग प्रथम क्रमांकावर 

लोकमानस प्रतिनिधी 

मुंबई - राज्यातील बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ९१.२५ टक्के निकाल लागला आहे. निकालात कोकण विभागाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोकण विभागाचा निकाल ९६.०१ टक्के लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल ८८.१३ टक्के लागला असून मुंबई विभागाला सगळ्यात शेवटचा क्रमांक मिळाला आहे. 

मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९३.७३ टक्के तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८९.१४ टक्के आहे. 

राज्यातील विभागांचे निकाल पुढीलप्रमाणे - 


कोकण : 96.01 %

पुणे : 93.34 %

कोल्हापूर : 93.28 %

अमरावती : 92.75 %

औरंगाबाद : 91.85 %

नाशिक : 91.66 % 

लातूर : 90.37 % 

नागपूर : 90.35 %

मुंबई : 88.13 %


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही