हाॅटेल आयटीसी मराठाच्या कामगारांना भरघोस पगारवाढ



हाॅटेल आयटीसी मराठाच्या कामगारांना भरघोस पगारवाढ
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई- 
भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथील हॉटेल आयटीसी मराठा मधील कामगारांची ऐतिहासिक पगारवाढ करण्यात आली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना नेते, माजी केंद्रीय मंत्री, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, खासदार अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी यांच्या सुचनेनुसार व संयुक्त सरचिटणीस  संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली ही पगारवाढ करण्यात आली. 

१ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२६ या चार वर्षांकरिता किमान ₹ ५,०००/- आणि कमाल ₹ २१,०००/- इतकी पगारवाढ मिळणार आहे. वाढीव पगारातील ४० टक्के रक्कम बेसिक तर ६० टक्के रक्कम इतर भत्त्यांमध्ये जमा होणार आहे. त्याचबरोबर कामगारांना पुढील लाभही मिळणार आहेत.

१)२३ कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी      करण्यात येणार
२)१५ एफ टी सी कामगारांना कायमस्वरूपी करण्यात येणार.
३)निवृतीचे वय ५८ वरून ६० वर्ष केले
४)ट्रॅव्हलिंग अलाऊन्स ३५००/-, ५७५०/- व ९०००/- हे अविवाहित, विवाहित व कुटुंबाला अनुक्रमे मिळणार आहे
५)कामगारांच्या विद्यार्थ्यांना साडेचार लाख रुपये प्रति वर्षी स्कॉलरशिप मिळणार आहे
६)सेवेच्या कालावधीनुसार कामगारांना पारितोषिक
७)१२ ते २० टक्क्यांपर्यंत पर्यंत वार्षिक बोनस
८)हक्काच्या सुट्टयांमध्ये वाढ
९)लिव्ह बँक पॉलिसी
१०)निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे
११)निवृत्तीनंतर कामगारांना सर्व कामगार व व्यवस्थापना तर्फे आर्थिक सहकार्य मिळणार आहे. 

सदर करारावर व्यवस्थापनातर्फे अतुल भल्ला (महाव्यवस्थापक), सुभाष सिंग (एच.आर. हेड), उत्तम अगरवाल (फायनान्स कंट्रोलर), अनुराग मिश्रा (एच.आर. मॅनेजर), अभय माथुर (रूम डिव्हिजन मॅनेजर), सिद्धार्थ बॅनर्जी (फायनान्स), रामसिंग बिश्त (एच.आर.) तसेच युनियनच्यावतीने अध्यक्ष श्री.अरविंद सावंतसाहेब,कार्याध्यक्ष श्री.अजित साळवी.संयुक्त सरचिटणीस संजय कदम, युनिट कमिटीचे विजय तावडे (भा.का.से. सहचिटणीस), संजय जाधव (भा.का.से. कार्यकारीणी सदस्य), मुमताज खान, क्लिटस कॅस्टोलिनो, सुरेश खरात, ऍड्रेन कॉर्नर, रुपेश कहाणे, किरण वझे, उमेश शिंदे, प्रवीण आमरे, अजय पुरेबिया यांनी सह्या केल्या.

यावेळी भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संतोष कदम, सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, सहचिटणीस जगदीश निकम, विजय शिर्के, मिलिंद तावडे, संजीव राऊत, निलेश ठाणगे आणि हाॅटेल आयटीसी मराठा मधील कामगार उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही