2000 च्या नोटा वितरणातून रद्द, 30 सप्टेंबर पर्यंत बदलून घेता येणार

2000 च्या नोटा वितरणातून रद्द, 30 सप्टेंबर पर्यंत बदलून घेता येणार 
लोकमानस प्रतिनिधी 
रिझर्व्ह बँकेने 2 हजाराच्या नोटा वितरणातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यामुळे आता दोन हजाराच्या नोटा व्यवहारात वापरता येणार नाहीत.  23 मे ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत नागरिक त्यांच्याकडील 2 हजाराच्या नोटा बँकांमधून बदलून घेऊ शकतील.मात्र एका वेळी कमाल 10 नोटा बदलून मिळतील.  नागरिकांना त्यांच्याकडील 2 हजाराच्या नोटा बँकांमध्ये खात्यात जमा करता येतील.  

इतर मूल्यांच्या नोटा बाजारात पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत, असे कारण देत आरबीआयने २ हजारांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
2016 मध्ये नोटबंदीनंतर 2000 ची नोट बाजारात आणण्यात आली होती. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब