शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोडणार, निर्णय मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव

 शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोडणार, निर्णय मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव 

लोकमानस प्रतिनिधी 

मुंबई - ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरुन निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेते व कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कार्यकर्ते पवारांना हा निर्णय मागे घेण्यासाठी 

दबाव टाकत आहेत. मात्र पवार यांनी आपण या निर्णयावर कायम असल्याचे स्पष्ट करत पक्षासाठी नेहमी उपलब्ध राहण्याची ग्वाही दिली आहे. 

लोक माझे सांगाती या पवारांच्या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी पवार यांनी ही घोषणा मुंबईत केली. राष्ट्रीय राजकारणात कार्यरत राहू मात्र अध्यक्षपदावरुन निवृत्ती घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या समितीने

नवीन अध्यक्षपदाबाबत निर्णय घ्यावा असे आवाहन पवार यांनी केले आहे. 

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील राजकारणात अनेक संभ्रम पसरवणाऱ्या बातम्या समोर येत आहेत. त्यामध्ये पवार यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताने नवीन राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही