मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई - मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचेे मध्यरात्री ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले.  ते 63 वर्षांचे होते. 2017 ते 2019 दरम्यान महाडेश्वर मुंबईच्या महापौरपदी कार्यरत होते. 
गेल्या काही दिवसांपूर्वीच ते कणकवली येथून मुंबईला परतले होते.  
उध्दव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात.  2019 मध्ये त्यांनी ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाचा समावेश असलेल्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेतर्फे विधानसभा निवडणूक लढवली होती.  मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. 

सांताक्रुझ पूर्व येथील राजे संभाजी विद्यालयात त्यांचे पार्थिव दुपारी दोन वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल व त्यांनंतर दुपारी ४ वा.अंत्ययात्रा टीचर्स कॉलोनी येथील स्मशान भूमीच्या दिशेने निघेल. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे महाडेश्वर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतील व अंत्ययात्रेत सहभागी होतील.  

 

           

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही