मुंब्र्यात तंबाखूविरोधी दिनी अंमली पदार्थ विरोधी रॅली

मुंब्र्यात तंबाखूविरोधी दिनी अंमली पदार्थ विरोधी रॅली

अंमली पदार्थ माफियांना तडीपार करा- मर्जिया शानू पठाण 
रॅलीमध्ये शेकडो तरूणांचा सहभाग,मुंब्रा अंमलीपदार्थ मुक्त शहर करणार
लोकमानस प्रतिनिधी
ठाणे - मुंब्रा शहरात काही समाजकंटकांच्या मार्फत अंमली पदार्थांची विक्री करण्यात येत आहे. त्याविरोधात सुलताना वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून "अंमली पदार्थ विरोधी" रॅली काढण्यात आली.  या वेळी अनेक तरूण-तरूणींनी मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा, कौसा भागात अंमली पदार्थ विरोधी मोहीम आखण्याचा निर्धार व्यक्त केला. 
गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा, कौसा भागात अंमली पदार्थांची रेलचेल वाढली आहे. समाजकंटकांकडून तरूणांना अंमली पदार्थांचे व्यसन लावण्यात येत आहे. या प्रकारामुळे सामान्य घरातील तरूण गुन्हगारीकडे वळत आहेत. त्यांना या दिलदलितून बाहेर काढण्यासाठी मर्जिया पठाण या सक्रीय झाल्या आहेत. त्यांनी मुंब्र्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून तंबाखू विरोधी दिनाच्या अनुषंगाने त्यांनी बुधवारी ही रॅली काढली. 
अमृत नगर ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मुंब्रा पोलीस ठाणे अशी ही रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत लहान मुले, तरूण, तरूणी,महिला, पुरुष, डाॅक्टर्स, धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  तरूणांनी हातात," अंमली पदार्थ सेवन करणार नाही; करू देणार नाही; नशेखोरी बंद करो, " असा संदेश देणारे फलक घेतले होते. यावेळेस मर्जिया पठाण म्हणाल्या की, अंमली पदार्थांची विक्री करणार्या समाजकंटकांना ठाणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे. तसेच, ज्या दुकानातून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात आहे. त्या दुकानांवर कारवाई करण्यात यावी. यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे. पण, पालकांनीही आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवले पाहिजे. कारण, पालकांनी आपल्या मुलांना चांगली शिकवण दिली. तर नक्कीच चांगली आणि सुजाण पिढी घडविली जाईल. 

या प्रसंगी मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिसांना निवेदन देऊन अंमलीपदार्थ मुक्त मुंब्रा करण्याची विनंती केली. 

या रॅलीत ॠता आव्हाड, माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण,   शाकिर शेख, महेशर शेख, साकिब दाते, नाजिम खान बुबेरे , मौलाना तकी, मौलाना शाहनवाजू यांच्यासह अनेक मुल्ला-मौलवी  सहभागी झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही