वीज चोरांना आता बसणार झटका , टोरंट पॉवरकडून वीजचोरांवर एफआयआर दाखल

वीज चोरांना आता बसणार झटका , टोरंट पॉवरकडून वीजचोरांवर एफआयआर दाखल 

प्रतिनिधी

टोरंट पॉवरने कळवा-मुंब्रा-शीळ भागात वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. वीज जोडणी नियमित करण्यासाठी विविध माध्यमांतून अनेकदा आवाहन करूनही लोक नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करण्यासाठी पुढे येत नाहीत.

या भागातील 15 हजारांहून अधिक घरे पीडी थकबाकीच्या नावाखाली बेकायदेशीर वीज वापरत आहेत. अशा ग्राहकांनी त्यांची प्रलंबित पीडी ( PD) देय रक्कम भरून कायदेशीररित्या वीज मीटर मिळवावेत असे आवाहन टोरंट पॉवर कंपनीने केले आहे.  मात्र कायदेशीर कनेक्शनसाठी लोक पुढे येत नाहीत.

आजही सुमारे 21 हजार 500 कनेक्शन्स 0 किंवा खूप कमी युनिट वापर दर्शवतात. यातील अनेकांचे मीटर सदोष असल्याचा किंवा मीटरमध्ये छेडछाड केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अशा लोकांचे मीटर त्वरित बदलणे आवश्यक आहे.

अशा वीजचोरांमुळे नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा अनेकदा खंडित होत आहे. त्यांना लाइन ट्रिपिंग आणि नेटवर्क बिघाडाचा सामना करावा लागतो. टॉरंट कंपनीने नुकतीच मीटरमध्ये छेडछाड आणि वीजचोरीविरोधात कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांत वीजचोरीचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.

वीजचोरी हा कायदेशीर गुन्हा असून वीजचोरी करणाऱ्यांवर कंपनी कडक कायदेशीर कारवाई करत असल्याचे कंपनीचे जनसंपर्क अधिकारी म्हणाले की, मीटरशिवाय वीज वापरणे म्हणजे वीजचोरी असून कमी वीज बिलासाठी वीज मीटरमध्ये छेडछाड करणे हीदेखील वीजचोरी आहे. विद्युत कायदा, 2003 नुसार, वीज चोरी हा कायदेशीर गुन्हा आहे, ज्यासाठी तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड होऊ शकतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही