राष्ट्रीय लोक अदालत मध्ये तब्बल 402 कोटींची 9979 प्रकरणे तडजोडीने निकाली

राष्ट्रीय लोक अदालत मध्ये तब्बल 402 कोटींची 9979 प्रकरणे   तडजोडीने निकाली
प्रतिनिधी 
मुंबई - 
मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे  30 एप्रिल रोजी मुंबई शहरामध्ये राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एकूण 402 कोटींची  9979 प्रकरणे तडजोडीने निकाली लागली. लोकन्यायालयाचे उदघाटन हे वृक्षाला पक्षकार, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी व मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष  अनिल सुब्रम्हण्यम, सरकारी वकील जयसिंग देसाई यांचे हस्ते जल अर्पण करून करण्यात आले.
राष्ट्रीय लोक अदालतीसाठी संपूर्ण शहरामध्ये 86 पॅनलची स्थापना करण्यात आली होती. दिवाणी, फौजदारी, मोटर अपघात , बँकेची वाद पूर्व प्रकरणे, महावितरण, बेस्ट व अदानी,  आयडिया व्होडाफोनची प्रकरणे ठेवण्यात आली होती.

 लोक अदालत मध्ये 45 हजार 331 प्रलंबित व 80 हजार 791 दाखल पूर्व अशी एकूण  1 लाख 26 हजार 122 प्रकरणे ठेवण्यात आली होती.  त्यापैकी 8 हजार 345 प्रलंबित व 1 हजार 634 दाखल पूर्व अशी एकूण 9 हजार 979  प्रकरणे तडजोडीने निकाली लागली. लोक अदालतच्या पार्श्वाभूमीवर मुख्यमहानगर दंडाधिकारी व महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयात विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये 24/4/2023 ते 29/4/2023 या पाच दिवसात 10 हजार 318 प्रकरणे निकाली काढण्यात आली अशी माहिती प्राधिकरणाचे सचिव अनंत देशमुख यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही