संकल्प प्रतिष्ठान द्वारा कणकवली येथे बांबू लागवड कार्यशाळेचे आयोजन

संकल्प प्रतिष्ठान द्वारा कणकवली येथे बांबू लागवड कार्यशाळेचे आयोजन
लोकमानस प्रतिनिधी
कणकवली - 
उद्योग व्यवसाय व कृषी या विषयावर मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमांचे गेली १२ वर्षे यशस्वीरित्या आयोजन करण्यात येणा-या संकल्प प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग) द्वारा कणकवली येथे बांबू लागवड कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.  रविवार दिनांक २८ मे, २०२३ रोजी सकाळी १० वाजता ही कार्यशाळा कणकवली येथे संपन्न होणार आहे.
कोकणात बांबू लागवड करण्यायोग्य जमिन मोठ्या प्रमाणावर असून वातावरण ही पोषक आहे. त्याशिवाय बांबू पिकाला सुरवातीला १ ते २ वर्षे पाणी पुरवठा केल्यास उत्तम. त्यामुळे कमी पाण्याचा पुरवठा असलेल्या ठिकाणीही बांबू लागवड करता येते. तसेच खत व किटकनाशके यांचाही खर्च खुप कमी असतो. या पिकाचा देखभाल करण्यासाठी ही जास्त खर्च किंवा कष्ट करावे लागत नाही. 

सर्वसाधारणपणे ३ ते ४ वर्षांनी उत्पादन मिळण्यास सुरवात होते व पुढे दरवर्षी नियमितपणे उत्पादन मिळते.  बांबूच्या अनेक जाती असून मागणीचा विचार करून व तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या जातीची निवड करता येते. सध्या बांबूला असलेली मागणी व मिळणारा दर यांचा विचार करता,  बांबू हे अत्यंत फायदेशीर पीक असल्याचे निदर्शनास येते. 
तसेच शासनाने ही बांबू लागवड करण्यासाठी कंबर कसली असून लागवडीसाठी शासनाच्या योजनेचा लाभही घेणे शक्य झाले आहे. 

या सर्व बाबींचा सारासार विचार करून बांबू लागवड बाबत शास्त्रोक्त माहिती उपलब्ध व्हावी, शासनाच्या योजनेची माहिती मिळावी, जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली यावी या व अशा अनेक दृष्टिकोनातून संकल्प प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग) द्वारा या माहितीपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण अशा बांबू लागवड कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत  मिलिंद पाटील यांचे बांबू लागवड बाबत परिपूर्ण मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच शासनाच्या योजनेची माहितीही पुरविण्यात येणार आहे.  त्याचबरोबर बांबू रोप, बांबू कंद मिळण्याची ठिकाणं यांची माहितीही दिली जाईल. 

या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे संकल्प प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग) संस्थेद्वारे आवाहन करण्यात आले आहे.  सदर कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक असून यासाठी इच्छुक व्यक्तींनी हा BMP01 कोड ९१४५४२८३३८ या नंबरवर व्हाट्सअप करावा.  पूर्ण माहिती व्हाट्सअप वर पाठविण्यात येईल किंवा संकल्प प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग), हायवे व्ह्यू रेस्टॉरंटच्या मागे, गडनदी पुलाजवळ, वागदे, कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही