पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मतदार ओळखपत्रांशी आधार संलग्न करण्याचे मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

  मतदार ओळखपत्रांशी आधार संलग्न करण्याचे मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन   लोकमानस प्रतिनिधी  मुंबई  : मतदार याद्यांचे प्रमाणीकरण व शुद्धीकरण यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याची विशेष मोहीम 1 ऑगस्ट 2022 पासून राज्यभर सुरू झाली आहे. यासाठी मतदार नोंदणी अधिकारी आणि बुथ लेव्हल अधिकारी यांच्यामार्फत गरुडा ॲपवरून ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे National Voter Service Portal या संकेतस्थळावर आणि Voter Helpline APP यावरही ऑनलाइन पद्धतीने आधार कार्ड संलग्न करता येईल. याकामी राजकीय पक्षांनी बूथ लेव्हल असिस्टंट नियुक्त करून ही मोहीम मोठ्या प्रमाणात यशस्वी करायला मदत करावी, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी केले. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत अपर जिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्याण पांढरे, तहसिलदार अर्चना मुळे, तहसीलदार प्रशांत सावंत, नायब तहसिलदार ज्योती खामकर तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. आधार का

गणेशोत्सवासाठी टोलनाक्यांवर वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका करण्याच्या मुख्यमंत्र्यांचे निर्देशमहामार्गांवरील वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांकडून दखल

 गणेशोत्सवासाठी टोलनाक्यांवर वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका करण्याच्या मुख्यमंत्र्यांचे निर्देश महामार्गांवरील वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांकडून दखल लोकमानस प्रतिनिधी मुंबई : गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांसाठी मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील टोलनाक्यांवर स्वतंत्र मार्गिका करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. खालापुर टोलनाक्याला भेट दिल्यानंतर याठिकाणी अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी ह्या सुचना दिल्या. सण-उत्सव,सुट्ट्यांच्या काळात या द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि पथकर नाक्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ वाढवावे. सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम  करण्याबरोबरच अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी  दिले. साताऱ्याहून मुंबईकडे परतताना दुपारी पुण्यातील चांदणी चौक परिसराला भेट दिल्यानंतर त्यांनी मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली (खालापूर) टोलनाक्याला भेट दिली. याभागात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा  मुख्यमंत्र्यानी आढावा घेतला. महामार्गांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीची मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी गांभीर्याने दखल घे

१ कोटी पाच लाख ९२ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मिरज येथे कारवाई

  १ कोटी पाच लाख ९२ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मिरज येथे कारवाई  लोकमानस प्रतिनिधी  मुंबई- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सांगली जिल्ह्यातील मिरज कार्यालयाने १ कोटी पाच लाख ९२ हजार रुपये किंमतीचा १०५९ किलो गांजा जप्त केला आहे. मिरज तालुक्यातील शिपूर येथील नंदकुमार बाबर या आरोपीने त्याच्या मालकीच्या उसाच्या पिकामध्ये गांज्याच्या झाडांची लागवड केल्याचे समोर आल्यानंतर विभागाने कारवाई केली. या प्रकरणी बाबर याच्याविरोधात एन.डी.पी.एस. कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.    --------------------------------------

उत्पादन शुल्क विभागाला तीन महिन्यात ६१६९ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त

उत्पादन शुल्क विभागाला तीन महिन्यात ६१६९ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाला १ एप्रिल ते ३१ जुलै या तीन महिन्याच्या कालावधीत ६१६९ कोटी ३१ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. गतवर्षी पूर्ण वर्षभरात उत्पादन शुल्क विभागाला १७ हजार २२८ कोटी ८४ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. सरकारला महसूल मिळवून देणाऱ्या प्रमुख विभागामध्ये उत्पादन शुल्क विभागाचा समावेश होतो.   विभागाने एप्रिल २०२१ ते  मार्च २०२२ या कालावधीत ४७ हजार ७४९ गुन्हे नोंदवले होते त्यामध्ये ३५ हजार ५४ आरोपींना अटक केली होती व १४४ कोटी ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. एप्रिल ते जुलै या तीन महिन्यात विभागाने १५ हजार ८८१ गुन्हे नोंदवले त्यामध्ये १२ हजार ८६ आरोपींना अटक केली व ५२ कोटी ५७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.  सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागातर्फे संबंधित कार्यक्षेत्राच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे कलम ९३ अंतर्गत प्रस्ताव पाठवून बंधपत्र घेण्याची कारवाई केली जाते. एप्रिल २०२१ ते  मार्च २०२२ या कालावधीत अशा प्रकारे २१

बेपत्ता झालेल्या भटक्या कुत्र्याला शोधणाऱ्या नागरिकाचा पारितोषिक आणि मानपत्र देऊन सन्मान

इमेज
 बेपत्ता झालेल्या भटक्या कुत्र्याला शोधणाऱ्या नागरिकाचा पारितोषिक आणि मानपत्र देऊन सन्मान लोकमानस प्रतिनिधी  मुंबई : भायंदर येथील नाकोडा रुग्णालय जवळ असलेल्या  रत्ना श्री सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापक समितीच्या सदस्यांनी 7 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे 04 : 00 ते 04 : 30 च्या दरम्यान निकू या भटक्या कुत्र्याला क्रूरतेने पकडून एका रिक्षावाल्याच्या मदतीने मानखुर्द, गोवंडी इथे सोडून दिले. अम्मा केअर फाऊंडेशन (एसीएफ) आणि प्लांट अँन्ड अनिमल्स वेलफेयर सोसायटी - मुंबई (पीएडब्ल्यूएस - मुंबई) तसेच  आंतरराष्ट्रीय प्राणी संरक्षण संस्था (ओआयपीए) प्रोटेक्शन या संस्थांनी स्थानिक प्राणी प्रेमी लोकांच्या मदतीने मुंबई आणि नवी मुंबईत अनेक भागांत निकूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या साठी एक पोस्टर बनवून समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आले.  18 ऑगस्ट 2022, बुधवारी हेल्पलाईन वर एक सजग नागरिक मोहम्मद अल्ताफ हनीफ शेख यांचा पहाटे 02 : 20 च्या सुमारास फोन आला. त्यांनी सांगितले की पोस्टवरच्या फोटोशी मिळता जुळता कुत्रा रस्ता क्रमांक 4, नूर रुग्णालय, शिवाजी नगर, गोवंडी इथे एका एटीएममध्ये बसला आहे. ह

४ किलो ७०० ग्रॅम गांजासह आरोपीला अटक, मुंब्रा पोलिसांची कारवाई , मारहाण करुन चोरी करणाऱ्या दुकलीला मुंब्रा पोलिसांनी केली अटक

  ४ किलो ७०० ग्रॅम गांजासह आरोपीला अटक, मुंब्रा पोलिसांची कारवाई  लोकमानस प्रतिनिधी  मुंब्रा - मुंब्रा परिसरात चार किलो ७०० ग्रॅम गांजा विक्रीसाठी आलेल्या एका आरोपीला मुंब्रा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून गांजा व रोख रक्कम ४५० रुपये असा एकूण ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फैजल मोहम्मद अस्लम सलमानी ऊर्फ राजा (वय २३ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अमृतनगर येथील दर्गाह गल्ली येथून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात मुंब्रा पोलिस स्थानकात एन.डी.पी.एस. कलम ८(क), २०, २२, २९ अन्वये गुन्हा क्रमांक ७७६-२०२२ नोंदवण्यात आला आहे.  पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त पंजाबराव उगले, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे, कळवा विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त विलास शिंदे, मुंब्रा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कडलग यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे मुंब्रा पोलिस स्थानकातील  गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कृपाली बोरसे, स.पो.नि. अजय कुंभार,  अंमलदार महाले, तडवी, शेळके, खैरनार, नवनाथ चव्हाण, जमदाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. याबाबत

गुलाम नबी आझाद कॉंग्रेसपासून 'आझाद'

गुलाम नबी आझाद कॉंग्रेसपासून 'आझाद' लोकमानस प्रतिनिधी  कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री , जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या सर्व पदांचा व प्राथमिक सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला. राजीनामा पत्रात त्यांनी कॉग्रेसच्या पक्षनेतृत्वावर सडकून टीका केली आहे. राज्यसभेत मुदतवाढ नाकारल्यानंतर आझाद गेल्या काही काळापासून पक्षावर नाराज होते.  राहुल गांधी यांनी जे घाबरले ते आझाद झाले अशी त्यांचावर टीका केली आहे.

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास,सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार लाभ- मुख्यमंत्री

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास, सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार लाभ- मुख्यमंत्री  लोकमानस प्रतिनिधी मुंबई : देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजनेचा लाभ सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना होणार असून एसटीच्या शिवनेरीसह सर्व सेवांसाठी ही मोफत प्रवास  योजना लागू असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विधीमंडळाच्या समिती कक्षात ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेसाठी ज्येष्ठांना प्रमाणपत्रांचे वितरण आणि योजनेचा शुभारंभ आज मुख्यमंत्री  शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आमदार भरत गोगावले, प्रताप सरनाईक, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंग, महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, महाव्यवस्थापक शिवाजी जगताप, अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.  राज्य परिवहन महा

राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकप्राप्त क्रीडापटूंच्या बक्षिस रकमेत मोठी वाढ - क्रीडा मंत्री गिरीश महाजन

राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकप्राप्त क्रीडापटूंच्या बक्षिस रकमेत मोठी वाढ     - क्रीडा मंत्री गिरीश महाजन लोकमानस प्रतिनिधी           मुंबई : राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रोत्साहन मिळावे, जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, युवकांनी खेळाकडे आकर्षित व्हावे याकरीता राज्य शासनाने राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मधील पदक विजेत्या क्रीडापटूंच्या बक्षिस रकमेत मोठी वाढ केली असल्याचे  क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.             मंत्रालयातील मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. महाजन म्हणाले, देशातील पंजाब, हरियाणा राज्यात खेळाडूंना प्रोत्साहनासाठी देण्यात येणाऱ्या बक्षिस रकमेच्या तुलनेत राज्याची रक्कम कमी होती. ती जवळपास 5 पट वाढविण्यात आली आहे. पूर्वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना 10 लाख रुपये देण्यात येत होते. आता ती रक्कम 50 लाख रुपये करण्यात आली आहे. रौप्यपदक विजेत्या खेळाडूंसाठी 7.50 लाख रुपये ऐवजी 30 लाख रुपये करण्यात आली आहे. तर कांस्यपदक विजेत्या खेळाडूंना 5 लाख रुपये ऐवज

भाऊसाहेब सामान्य माणसांशी नाळ जुळलेले लोकनेते -मुख्यमंत्रीपांडुरंग फुंडकर यांच्यावरील 'भूमिपुत्र' स्मृतिग्रंथाचे प्रकाशन

भाऊसाहेब सामान्य माणसांशी नाळ जुळलेले लोकनेते -मुख्यमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यावरील 'भूमिपुत्र' स्मृतिग्रंथाचे प्रकाशन लोकमानस प्रतिनिधी            मुंबई : शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत लढणारे आणि शेतकरी बांधवांच्याप्रती आस्था असणारे दिवंगत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर राज्यातील शेतकरी कुटुंबांचे ‘भूमिपुत्र’ होते. शेतमालाला चांगला भाव मिळावा, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी, सावकारी कर्जाला आळा बसावा, ग्रामीण भागात सहकार चळवळीचे जाळे उभे रहावे या विषयांवर कार्य करुन विधिमंडळात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. माती आणि सामान्य जनतेशी ज्यांची नाळ जोडली जाते तोच खरा ‘भूमिपुत्र’ असतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.           राज्याचे दिवंगत माजी कृषीमंत्री भाऊसाहेब तथा पांडुरंग फुंडकर यांचे जीवनकार्य, त्यांच्या विधिमंडळ व संसदीय कामकाजाच्या योगदानावर आधारित 'भूमिपुत्र' या ग्रंथाचे प्रकाशन विधिमंडळातील मध्यवर्ती सभागृहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.           यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री

गणेशोत्सवासाठी भाविकांना टोल माफी, 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर पर्यंत सवलत

गणेशोत्सवासाठी भाविकांना टोल माफी,  27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर पर्यंत सवलत लोकमानस प्रतिनिधी मुंबई, दि. २६ : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी शनिवार  २७ ऑगस्टपासून करण्यात येत आहे. मुंबई - बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत  ११ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते, त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जाहीर केला आहे.  २७ ऑगस्ट ते  ११ सप्टेंबर या कालावधीत मुंबई - बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग (राम-४८), मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (रा. म. ६६) यावरील व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यावर कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलत

गणेशभक्तांसाठी शिवसेना ठाणे जिल्ह्याच्यावतीने 400 एस.टीच्या बसेस सोडणार

गणेशभक्तांसाठी शिवसेना ठाणे जिल्ह्याच्यावतीने 400 एस.टीच्या बसेस सोडणार सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी चाकरमान्यांनी मोफत एस.टी सेवेचा लाभ घ्यावा : नरेश म्हस्के लोकमानस प्रतिनिधी ठाणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने शिवसेना ठाणे जिल्हा शाखेतर्फे ठाणे शहरातून एकूण 400 एस.टी.च्या बसेस मोफत सोडण्यात येणार आल्याची माहिती शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी दिली.             गणेशोत्सव हा हिंदू लोकांच्या जिव्हाळ्याचा सण असून दरवर्षी गणेशभक्त आवर्जुन आपापल्या गावी जात असतात. गणेशोत्सवासाठी कोकण आणि घाटमाथ्यावर जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेचे आरक्षण सहा महिने अगोदरच झाल्यामुळे तिकिट मिळविणे जिकिरीचे होते. तसेच उत्सवादरम्यान खाजगी बसेसचे भाडे सुद्धा परवडणारे नसते. तसेच अनेकदा एस.टी.चे आरक्षण मिळत नाही यासाठी चाकरमान्यांना दिलासा मिळावा व त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी शिवसेनेच्यावतीने विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने एस.टी. बसेस सोडण्यात येणार आहे. कोविडच्या कालावधीतही ठाणे शहरातून गणेशोत

रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी राजाभाऊ सरवदे यांची निवड

इमेज
रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी राजाभाऊ सरवदे यांची  निवड  लोकमानस  प्रतिनिधी मुंबई  - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या महाराष्ट्र् राज्य कार्यकारीणीची निवडणूक राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली  पुणे येथे झाली.  यावेळी पक्षाच्या राज्य कार्यकरिणी च्या अध्यक्ष पदी राजभाऊ सरवदे ( सोलापूर ) यांची निवड करण्यात आली.  पक्षाचा राज्य अध्यक्षपदी राजाभाऊ सरवदे; राज्य कार्याध्यक्षपदी बाबुराव कदम ( औरंगाबाद)  राज्य सरचिटणीस पदी गौतम  सोनवणे ( मुंबई), राज्य संघटन सचिव पदी परशुराम वाडेकर(पुणे), राज्य संघटक पदी सुधाकर तायडे ( अकोला ), राज्य उपाध्यक्ष पदी अण्णासाहेब रोकडे (कल्याण )  या 6 जणांची निवड करण्यात आली अशी  घोषणा रामदास आठवले यांनी केली.  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी काम पाहिले.यावेळी माजी आमदार सुमंत राव गायकवाड उपस्थित होते. पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या रिपाइं च्या राज्य कार्यकारिणीच्या निवडणूकीला राज्य भरातून  सर्व जिल्हा प्रतिन

रात्रशाळेबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करणार - शिक्षणमंत्री दीपक केसरकर

रात्रशाळेबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करणार  - शिक्षणमंत्री दीपक केसरकर लोकमानस प्रतिनिधी मुंबई : राज्यातील रात्रशाळांबाबत सर्वसमावेशक धोरण दोन महिन्यामध्ये तयार करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली. राज्यातील रात्रशाळांकरिता सर्वांकष धोरण निश्चित करण्याबाबत सदस्य नागोराव गाणार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री केसरकर बोलत होते. शालेय शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले की, शिक्षकांच्या प्रश्नांबाबत सर्वसमावेशक असे धोरण ठरवून, शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी अभ्यासक्रमात बदल करण्याच्या दृष्टीने विचारविनिमय करण्यात येईल. तसेच या शाळांचे प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्वसमावेशक धोरणात विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून त्याप्रमाणे धोरण आखण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या प्रश्नाच्या वेळी सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर ,कपिल पाटील यांनी सहभाग घेतला.

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी, फडणवीस यांच्या घोषणेचे, भाजपा मुख्य प्रवक्ते उपाध्ये यांच्याकडून स्वागतलोकमानस प्रतिनिधी

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी, फडणवीस यांच्या घोषणेचे, भाजपा मुख्य प्रवक्ते उपाध्ये यांच्याकडून स्वागत लोकमानस प्रतिनिधी मुंबई -  मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याबद्दल विधानसभेत आमदारांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन कालबद्ध चौकशीचा निर्णय घेतल्याबद्दल प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका पत्रकाद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. गेल्या अडीच वर्षापासून महापालिकेतील मनमानीला चाप लावून गैरसोयी दूर करण्याची ग्वाही सरकारने दिल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे, असे  उपाध्ये यांनी म्हटले आहे. मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटर घोटाळे, रस्त्यांची गुणवत्ता, सफाई कामगारांना घरे देण्याच्या आश्रय योजनेतील भ्रष्टाचार, कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कंपन्या सुरू करून महापालिकेची कंत्राटे लाटत केलेली लूट अशा अनेक मुद्द्यांवर बुधवारी विधानसभेत आमदारांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन कालबद्ध चौकशीचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्याबरोबरच, विविध भ्रष्टाचारांच्या आरोपांसंदर्भात नियंत्रक व महालेखा परीक्षकांतर्फे (क

शेतकरी आत्महत्यांप्रश्नी शिंदे-फडणवीस सरकार गंभीर नाही - नाना पटोले

शेतकरी आत्महत्यांप्रश्नी शिंदे-फडणवीस सरकार गंभीर नाही - नाना पटोले ओला दुष्काळ जाहीर करा; शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करून दोषींना शिक्षा देण्याची मागणी  लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -  राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी विरोध पक्ष सातत्याने लावून धरत आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली तुटपुंजी मदतसुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत परंतु शिंदे-फडणवीस सरकार मात्र शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात चर्चाही करत नाही, शेतकरी आत्महत्येविषयी हे सरकार गंभीर नाही, असा घणाघाती हल्ला  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, आम्ही विधिमंडळात शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरले पण शिंदे-फडणवीस सरकार या विषयावर चर्चा करण्यासही तयार नाही. शेतकरी, कामगार, बेरोजगारांसह सामान्य माणसांच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष नाही. राज्यातील ईडी सरकार कोणत्याच प्रश्नावर गंभीर दिसत नाही. विधीमंडळात मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरांवरून हे सरकार मस्तीत वागत असल्याचे दिसल

शाळकरी मुलीशी वाहकाचा दुर्व्यवहार, शमीम खान यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर चौकशी समिती गठीत

इमेज
शाळकरी मुलीशी वाहकाचा दुर्व्यवहार, शमीम खान यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर चौकशी समिती गठीत लोकमानस प्रतिनिधी ठाणे - भास्कर नगर येथून शाळकरी मुलींसाठी सुरू केलेल्या टीएमटी बसगाडीतील पुरूष वाहकाने एका मुलीशी दुर्व्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, परिवहन प्रशासनाने केवळ बदली करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्याने परिवहन सदस्य शमीम खान यांनी आक्रमण पवित्रा धारण केला. अखेरीस परिवहन सभापती विलास जोशी यांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. या समितीच्या अहवालानंतर या वाहकावर कारवाई करण्यात येईल.  गेल्या आठवड्यात एका हायस्कूलमधील एका विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न टीएमटी वाहकाने केला होता. या प्रकरणाबद्दल  परिवहन समितीच्या बैठकीत शमीम खान यांनी प्रशासनाला धारेवर धरले.  या संदर्भात शमीम खान यांनी सांगितले की, परिवहन सभापती विलास जोशी यांचे आपण नेहमीच आभारी आहोत. कारण, त्यांच्यासमोर आम्ही जेव्हा जेव्हा कळवा, मुंब्रा भागातील परिवहन सेवेसंदर्भात त्रुटी मांडल्या तेव्हा तेव्हा त्यांनी त्या सोडविल्या आहेत. मात्र, अंजुमन खेरूल गर्ल हायस्कूल साठी कळवा पू

वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना आता २० लाख रुपये अर्थसहाय्य मिळणारवनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा महत्‍वपूर्ण निर्णय

इमेज
वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना आता २० लाख रुपये अर्थसहाय्य मिळणार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा महत्‍वपूर्ण निर्णय लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -  वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना देण्‍यात येणाऱ्या १५ लाख रुपये अर्थसहाय्याच्‍या रक्‍कमेत वाढ करत ही रक्‍कम २० लाख रुपये इतकी करण्‍याचा निर्णय वनमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत जाहीर केला. याबाबतचा शासन निर्णय 23 ऑगस्ट रोजी निर्गमित करण्यात आला आहे. राज्‍याच्‍या वनविभागाच्‍या माध्‍यमातुन उत्‍तम पध्‍दतीने वनसंवर्धनाचे कार्य सुरू असल्‍याने वन्‍यप्राण्‍यांच्‍या संख्‍येत मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. मानव–वन्‍यजीव संघर्ष कमी करण्‍याच्‍या दृष्‍टीने वनालगतच्‍या गावांमध्‍ये राहणा-या नागरिकांना वनविभागामार्फत प्रबोधन करण्‍यात येत असून डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेमार्फत स्‍थानिक जनतेचे वनावरील अवलंबीत्‍व कमी करण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात येत आहे. वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामध्‍ये सन २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या तीन वर्षात अनुक्

वनविभागाने मानक कार्यप्रणाली संबंधी इतर विभागांना प्रशिक्षित करावे: सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचना

वनविभागाने मानक कार्यप्रणाली संबंधी इतर विभागांना प्रशिक्षित करावे: सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचना आमदारांच्या सूचनांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे निर्देश लोकमानस प्रतिनिधी मुंबई- वनविभागाच्या कार्यप्रणाली बाबत विविध विभागांच्या अनेक अधिकाऱ्यांनाच नीट कल्पना नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वन विभागाने विविध विभागातील अधिकाऱ्यांचे मानक कार्यप्रणाली (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) बाबत प्रशिक्षित करावे असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. विधान भवनात आयोजित वन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. वन विभागाच्या मानक कार्यप्रणालीची एक पुस्तिका बनवून ती सर्व आमदार, सर्व जिल्हाधिकारी, सर्व विभागांचे अधिकारी व प्रमुख शासकीय कार्यालये यांना ती वितरित करावी अशा सूचनाही मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या. वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वृक्ष संवर्धनासंदर्भात एक सहा तासांचे प्रशिक्षण आयोजित करण्याचे निर्देशही यावेळी मुनगंटीवार यांनी दिले. आमदारांच्या सूचनांसाठी स्वतंत्र ईमेल सुरू करण्याचे निर्देश  वनविभाग संदर्भात आमदारांच्या तक्रारी व सूचना प्राप्त करण्यासाठी स्वतंत्र ईमेल

रेल्वेची मुजोरी – डॉ.जितेंद्र आव्हाड यांचा लेख

इमेज
    रेल्वेची मुजोरी – डॉ.जितेंद्र आव्हाड   गेले 2-3 दिवस कळवा आणि मुंब्र्याच्या रेल्वे प्रवाशांची अस्वस्थता आणि जे काही समोर येत आहे ते अतिशय धक्कादायक आहे. पहिली गोष्ट म्हणजे मेल एक्सप्रेस ज्याला ट्रॅकवरून धावत असते त्या ट्रॅकवरुन त्या धावतच नाहीत. त्यामुळे डेसिबल हे 175 च्या वरती जाते. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे रात्रौ 10 वाजल्यानंतर डेसिबलवरती मर्यादा आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रेल्वेला लागू नाही का ? कळवा आणि मुंब्रामध्ये दोन प्लॅटफॉर्म वाढवले. पण , ज्या Frequency नुसार ट्रेन थांबायच्या त्या आता कळवा , मुंब्र्यात थांबतच नाहीत. त्याच्यात एसी लोकलची भर पडली आहे. मी आधीच सांगितले होते की , एसी लोकलचे तिकिट हे सर्वसामान्य माणसांना परवडूच शकत नाही. पण , लोकल ट्रेन रद्द करुन त्याजागेवर एसी ट्रेन आणणं हे म्हणजे गरीबांनी श्रीमंत व्हा असा संदेश रेल्वे देत आहे. ठाण्याकडे जाणा-या सकाळच्या दोन साध्या गाड्या रद्द करण्यात आल्या. ज्या कारशेडवरुन सुरु होत होत्या. व त्याच्या जागी एसी ट्रेन सुरु करण्यात आली.     काल मंगळवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी मी रेल्वेच्या संबंधित अ

कामगार पगारवाढीची बोलणी कोणत्याही अटीशिवाय करा, कामगार महासंघाच्या नेत्यांची मागणी

इमेज
कामगार पगारवाढीची  बोलणी कोणत्याही अटीशिवाय करा, कामगार महासंघाच्या नेत्यांची मागणी लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -  भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांच्या पगारवाढीसाठी द्विपक्षीय वेतन समितीची बैठक २३ ऑगस्ट  रोजी नवी दिल्लीत इंडियन पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजीव जलोटा यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय खेळीमेळीच्या चांगल्या वातावरणात झाली. आय.पी. ए.च्या वतीने के.जी.नाथ यांनी अहवाल सादर केला.  यावेळी वेतन करारासाठी लादलेल्या जाचक अटी मागे घेण्याची मागणी सर्वच फेडरेशनच्या नेत्यांनी केली.  वाटाघाटी कोणत्याही अटीशिवाय चालू झाल्या पाहिजेत. या जाचक अटी मागे घेण्याचे लेखी निवेदन महासंघाच्या नेत्यांनी अध्यक्षांना  दिले. बोनस योजना ताबडतोब मान्य करण्याची मागणी कामगार महासंघाच्या नेत्यांनी केली.आय.पी. ए.चे व्यवस्थापकीय संचालक यांनी प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मिटिंग घ्यावी. दरम्यान काही मागण्यांवर स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घेण्यात येतील, असे  राजीव जलोटा यांनी सांगितले.   पुढील बैठक मुंबई येथे घेण्याचे ठरले असून, बैठकीची तारीख नंतर कळविली जाईल.या बैठकीसाठी  मोहम्मद हन

सामूहिक बलात्काराच्या आरोपींना तुरुंगवासाची मुदत पूर्ण केल्याशिवाय सोडण्याचा अधिकार नाही: न्या. अभय ठिपसे

इमेज
सामूहिक बलात्काराच्या आरोपींना तुरुंगवासाची मुदत पूर्ण केल्याशिवाय सोडण्याचा अधिकार नाही: न्या. अभय ठिपसे लोकमानस प्रतिनिधी मुंबई -  यूनाइटेड अगेंस्ट इंजस्टिस एंड डिस्क्रिमिनेशन ने मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषदेत बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील 11 दोषींच्या सुटकेचा तीव्र निषेध केला. यावेेळी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे (मुख्य संयोजक यूनाइटेड अगेंस्ट इंजस्टिस एंड डिस्क्रिमिनेशन) म्हणाले की, सामूहिक बलात्कारासारख्या जघन्य गुन्ह्यातील दोषींना कोणत्याही प्रकारे सोडले जाऊ नये. गुन्हेगारांना ज्या पद्धतीने स्वीकारण्यात आले ते अत्यंत चुकीचे आहे. सामूहिक बलात्काराच्या आरोपींना तुरुंगवासाची मुदत पूर्ण केल्याशिवाय सोडण्याचा अधिकार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. हा खटला न्या. उमेश साळवी (माजी अध्यक्ष राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण) यांच्यासमोर चालवण्यात आला व त्यांनी दोषींना शिक्षा सुनावली होती, ते म्हणाले, आज अशी पक्षपाती वृत्ती खेदजनक आहे. जे या गुन्हेगारांना ब्राह्मण सुसंस्कृत म्हणत आहेत, ते ब्राह्मण आणि संस्कारी या दोघांच्या नावाने अपमानास्पद खेळ

राज्यातील सत्तासंघर्ष पाच सदस्यीय घटनापीठाकडे, गुरुवारी सुनावणी

 राज्यातील सत्तासंघर्ष पाच सदस्यीय घटनापीठाकडे, गुरुवारी सुनावणी  लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील याचिकेची सुनावणी गुरुवारी होईल. आज झालेल्या सुनावणीत हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.  सरन्यायाधीश एन. वी. रमण्णा, न्या. हिमा कोहली व कृष्ण मुरारी यांच्या विशेष खंडपीठाने हा निर्णय घेतला.  २५ ऑगस्ट रोजी घटनापीठाकडे या प्रकरणाशी  संबंधित सर्व ५ याचिकांवर सुनावणी होईल. घटनापीठ याबाबत काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

25 ऑगस्टपूर्वी कोकणातून जाणाऱ्या रस्त्यांचे काम पूर्ण करा- सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश

25 ऑगस्टपूर्वी कोकणातून जाणाऱ्या रस्त्यांचे काम पूर्ण करा- सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश लोकमानस प्रतिनिधी             मुंबई : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा रस्तेमार्ग प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी कोकणातील रस्त्यांची दुरुस्तीची कामे 25 ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण करण्यात यावीत. सध्या या महामार्गावर खड्डे भरणे आणि दुरुस्तीची कामे कंत्राटदारांकडून सुरू आहेत. ही कामे अधिक जलद गतीने होण्यासाठी आवश्यकतेनुसार जास्तीत जास्त कंत्राटदारांकडून करून घ्या, आणि पूर्ण ताकदीने आणि युद्धपातळीवर काम करा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आजच्या बैठकीत दिल्या.             मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीत शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर, खासदार  सुनील तटकरे, विनायक राऊत आमदार प्रविण दरेकर, भरत गोगवले, नितेश राणे, वैभव नाईक, राजन तेली, योगेश कदम, रविशेट पाटील, शेखर निकम, किरण पावसकर, राजन साळवी, अनिकेत तटकरे, आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे

जनतेच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी सांस्कृतिक विभागाने प्रयत्न करावेत: सुधीर मुनगंटीवारसांस्कृतिक विभागाला जनसंपर्कावर भर देण्याच्या सूचना

जनतेच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी सांस्कृतिक विभागाने प्रयत्न करावेत:  सुधीर मुनगंटीवार सांस्कृतिक विभागाला जनसंपर्कावर भर देण्याच्या सूचना लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - जगातील सर्वात मूल्यवान प्रसाधन म्हणजे हास्य, ते जनतेच्या चेहऱ्यावर फुलविण्यासाठी सांस्कृतिक विभागाने कार्यरत राहावे असे उद्गार आज सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे काढले. विधान भवन येथे सांस्कृतिक कार्य विभागाची स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमांसंदर्भात तपशीलवार आढावा बैठक आज सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली, तेव्हा ते बोलत होते. या बैठकीस सांस्कृतिक कार्य सचिव, सह सचिव आणि या विभागाचे विविध वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा संदर्भात विविध कार्यक्रमांचे तपशीलवार नियोजन शासनाच्या विविध विभागांनी करणे अपेक्षित असून त्याचा पाठपुरावा सांस्कृतिक कार्य विभागाने करायचा आहे. त्यासंदर्भात  मुनगंटीवार यांनी विविध सूचना अधिकाऱ्यांना आज केल्या. सांस्कृतिक कार्य विभागाने जनसंपर्कावर भर दिला पाहिजे, या विभागाचे कार्य जनतेच्या दृष्टीने महत्वाचे आहे, असेही ते यावे

महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर ईडी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने

पन्नास खोके-माजलेत बोके, पन्नास खोके-एकदम ओके, ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी   महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर  ईडी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने लोकमानस  प्रतिनिधी मुंबई - ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा,  पन्नास खोके माजलेत बोके पन्नास खोके, एकदम ओके, ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी, स्थगिती सरकार हाय हाय, गद्दारांचं सरकार हाय हाय, आले रे आले गद्दार आले, अशा गगनभेदी घोषणा देत आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस असून महाविकास आघाडीमधील सर्व आमदारांनी ईडी सरकारला धारेवर धरण्याचे काम सुरू केले असून हे आंदोलनातून दाखवून दिले आहे.

कल्याण शहरात तिरंगा यात्रेला चांगला प्रतिसाद

इमेज
कल्याण शहरात  तिरंगा  यात्रेला चांगला प्रतिसाद लोकमानस प्रतिनिधी कल्याण  कल्याण शहरात  तिरंगा  यात्रेचे आयोजन अँड  प्रियेश सिंह यांच्यातर्फे करण्यात आले होते. यात्रेला 500 लोकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला , नागरिकांनी आनंदाने स्वातंत्र्यदिन  साजरा केला. स्वातंत्र्याचा 75 वा‌ अमृत महोत्सव व‌ देशाचा राष्ट्रध्वज देशाचे आदर्श, तत्त्वज्ञान, इतिहास संस्कृती,‌ महत्वाकांक्षेचे प्रतिनिधित्व करतो व त्याचा आम्हाला अभिमान आहे  व राष्ट्रसेवेसाठी आम्ही बांधील आहोत असे मत अँड  प्रियेश सिंह व‌ मोहन कोनकर, रागिनी सिंह, मीनाक्षी, अनुप सिंह, श्रीराम खाटू परिवार, श्रीराम हिंदू सेना यांनी व्यक्त केले.   दोन किलोमीटर तिरंगा यात्रा कल्याण मधील शहाड शहरातील स्थानिकांच्या सहकार्यामुळे यशस्वी झाली.‌ कोकण वृत्ताचे अँड प्रशांत गायकवाड व खेलो इंडिया फोर पीस अँबेसिडर अँड राजाराम दळवी व‌ अँड खलील गिरकर यांनी शुभेच्छा दिल्या व  राष्ट्रसेवा या माध्यमाद्वारे शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवणे भारतीयाचे कर्तव्य आहे, असे मत व्यक्त केले. 

ओबीसी नेते हरिभाऊ राठोड व माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांचा " आप" मध्ये प्रवेश

इमेज
ओबीसी नेते हरिभाऊ राठोड व माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांचा " आप" मध्ये प्रवेश लोकमानस प्रतिनिधी  नवी दिल्ली   राष्ट्रीय ओबीसी नेते तथा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यासह निवृत्त ए.सि.पी.धनराज वंजारी तसेच यवतमाळचे  अमान भाई यांचा जाहीर प्रवेश रविवारी 21 ऑगस्ट रोजी  दिल्ली येथे आम आदमी पार्टीचे प्रमुख दिल्लीचे मुख्यमंत्री माननीय अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रभारी दिपक सिंगल,मुंबई प्रभारी अंकूश नारंग, मुंबई प्रदेश अध्यक्षा प्रीती मेनन, महाराष्ट्र प्रदेश सचिव धनजय शिंदे,महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री विजय कुंभार पुणे ओबीसी मुस्लिम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी, ऑल इंडिया बंजारा संघाचे उत्तर भारताचे अध्यक्ष एस पी सिंग लबाना तसेच हरियाणा प्रदेशचे आम आदमी पार्टीचे नेते मखनसिंग लबाना या उपस्थित होते . अनेक नेत्यासह शेकडो कार्यकर्ते यांनी जाहीर प्रवेश केला. राज्यातील जनता वाढती महागाई, भ्रष्टाचार, सीबीआय, ई डी, या केंद्रीय गुप्तचर यंत्रणांचा गैरवापर, प्रस्थापितांच्या फोडा फोडीचे राजकारण या सर्व बाबींना कंटाळली अ

टोल कर्मचाऱ्याची मुजोरी,पोलिस अधीक्षकांसोबत अरेरावी, गुन्हा दाखल

टोल कर्मचाऱ्याची मुजोरी,पोलिस अधीक्षकांसोबत अरेरावी,  गुन्हा दाखल लोकमानस प्रतिनिधी नाशिक नाशिक पिंपळगाव टोलनाक्यावर नाशिकचे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासोबत अरेरावी करणाऱ्या मुजोर टोल कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दस्तुरखुद्द जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयीन वाहनाला टोल नाक्यावरुन जाताना रस्ता मोकळा करुन देण्याऐवजी त्यांची गाडी रोखून त्यांच्यासोबत मुजोरीचे वर्तन करुन अरेरावी करणाऱ्या टोल कर्मचाऱ्या विरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील मालेगाव येथून शासकीय कामकाज आटोपून नाशिकच्या दिशेने जात असताना टोल नाक्याजवळ हा प्रकार घडला. पोलीस अधीक्षकांची गाडी टोल नाक्यावरुन सोडण्यास जाणिवपूर्वक विलंब करुन याबाबत विचारणा केल्यावर थेट पोलिस अधीक्षकांसोबत बाचाबाची करणाऱ्या या टोल कर्मचाऱ्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

दहिहंडीच्या प्रो-गोविंदा स्पर्धांना मान्यता; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा,विजेत्यांना शासकीय नोकरी मिळणार

    दहिहंडीच्या प्रो-गोविंदा स्पर्धांना मान्यता ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची   घोषणा , विजेत्यांना शासकीय नोकरी मिळणार लोकमानस प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राची   सांस्कृतिक ओळख आणि परंपरा असलेल्या दहिहंडीच्या (गोविंदा) "प्रो गोविंदा" स्पर्धा घेण्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. स्पर्धेसाठी बक्षीसाची रक्कम शासनातर्फे देण्यात येईल. त्याचबरोबर खेळाडू संवर्गातून विजेत्यांना शासकीय नोकरी देण्यात येईल , असेही मुख्यमंत्री म्हणाले. विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री   शिंदे म्हणाले , राज्य शासनाने दहिहंडी (गोविंदा) या उत्सवाचा क्रीडा प्रकारात समावेश करून "प्रो गोविंदा"   स्पर्धा राबवाव्यात , अशी मागणी दहीहंडी उत्सव आयोजकांकडून करण्यात येत होती. त्यानुसार राज्यात प्रो गोविंदा स्पर्धा आयोजित केल्या जातील आणि त्याच्या बक्षिसाची रक्कम शासनामार्फत दिली जाईल. त्याचबरोबर   खेळाडू संवर्गातून शासकीय नोकरी देण्यात ये