रेल्वेची मुजोरी – डॉ.जितेंद्र आव्हाड यांचा लेख

 

 रेल्वेची मुजोरी – डॉ.जितेंद्र आव्हाड



 गेले 2-3 दिवस कळवा आणि मुंब्र्याच्या रेल्वे प्रवाशांची अस्वस्थता आणि जे काही समोर येत आहे ते अतिशय धक्कादायक आहे. पहिली गोष्ट म्हणजे मेल एक्सप्रेस ज्याला ट्रॅकवरून धावत असते त्या ट्रॅकवरुन त्या धावतच नाहीत. त्यामुळे डेसिबल हे 175 च्या वरती जाते. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे रात्रौ 10 वाजल्यानंतर डेसिबलवरती मर्यादा आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रेल्वेला लागू नाही का? कळवा आणि मुंब्रामध्ये दोन प्लॅटफॉर्म वाढवले. पण, ज्या Frequency नुसार ट्रेन थांबायच्या त्या आता कळवा, मुंब्र्यात थांबतच नाहीत. त्याच्यात एसी लोकलची भर पडली आहे. मी आधीच सांगितले होते की, एसी लोकलचे तिकिट हे सर्वसामान्य माणसांना परवडूच शकत नाही. पण, लोकल ट्रेन रद्द करुन त्याजागेवर एसी ट्रेन आणणं हे म्हणजे गरीबांनी श्रीमंत व्हा असा संदेश रेल्वे देत आहे. ठाण्याकडे जाणा-या सकाळच्या दोन साध्या गाड्या रद्द करण्यात आल्या. ज्या कारशेडवरुन सुरु होत होत्या. व त्याच्या जागी एसी ट्रेन सुरु करण्यात आली. 

 

काल मंगळवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी मी रेल्वेच्या संबंधित अधिका-यांसोबत दोन तास चर्चा केली. त्यामध्ये त्यांचे त्यांनाच समजत नव्हते की ते काय बोलत आहेत. त्यांनी मला सांगितले की 10 ट्रेनमध्ये 5700 प्रवासी प्रवास करतात. म्हणजे एका ट्रेनमध्ये 570 लोक असतात. हे 570 लोक कुठे आणि एका ट्रेनमध्ये बसलेले 5000 लोक कुठे. ज्याला दोन ट्रेन ठाणे रेल्वे स्टेशन येथून सुटत होत्या त्या रद्द झाल्या याचा अर्थ फक्त 1200 लोक एसी ट्रेनमधून जाऊ शकले. सर्वसामान्यांचे हाल कसे वाढवायचे हे एसी केबिनमध्ये बसून अधिकारी ठरवत आहेत. एसी लोकलचा त्रास हा फक्त ठाणेकरांना झालातर नाहीज्याविषयी ते माझ्याशी बोलत होते ते म्हणजे बदलापूर रेल्वे स्टेशनवरच एसी ट्रेनविरुद्ध आंदोलन झाले. आणि ही एसी ट्रेनची बोंबाबोंब संपूर्ण मुंबईत आहे. पण, याला कोणी वाचा फोडत नव्हतं.

 

तुम्ही सर्वसामान्य प्रवाशांसाठी साधी लोकल जेव्हा चालवत होतात. ती रद्द करुन त्याच्या जागी एसी ट्रेन आणली. हे कुठल्या भूमिकेतून. तुम्ही नवीन एसी ट्रेन सुरु केल्या असत्या. लोकल ट्रेन तश्याच सुरु ठेवल्या असत्या. तर आम्ही समजू शकलो. पण, सर्वसामान्य लोकल सुरु करायची आणि त्याचा पर्याय म्हणून एसी ट्रेन द्यायची याचा अर्थ काय तो मला समजला नाही. एकंदरीतच सर्वसामान्य रेल्वेच्या फे-या कमी झाल्या आहेत. कळवा, मुंब्रा आणि दिवा हे तर रेल्वेच्या गिनतीतच नाही. या विभागात काय माणसे राहत नाहीत की का? आजचा माझा त्यांच्याबरोबर झालेला संवाद आणि संभाषण हे धक्कादायक होते.

 

ठाण्याच्या प्रवासी संघटनेने जानेवारी महिन्यामध्ये पत्र दिले होते की तुम्ही एसी ट्रेन सुरु करु नका. ते विचारात न घेता 8 दिवसांपूर्वी ठाण्यातून लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या व एसी ट्रेन सुरु करण्यात आल्या. त्यामुळे लोकल ट्रेनवर प्रचंड बोजा आला. अर्धेअधिक प्रवासी तर ट्रेनमध्ये चढूच शकत नाहीत. आणि जे चढतात त्याच्यातले कमीत-कमीत 3 ते 4 जण ट्रेनमधून पडून मृत्यूमुखी पावतात. मागिल काही महिन्यांमध्ये ट्रेनमधून पडून मृत्यूमुखी पावलेल्यांचे प्रमाण वाढले आहे. याला जबाबदार कोण? जर रेल्वेचा हा अट्टाहास असेल की आम्ही सर्वसामान्य लोकल रद्द करु आणि एसीच ट्रेन चालवू. तर ह्यांच्या एसी केबिनमध्ये जाऊन धिंगाणा घालू हे आज मी त्यांना सांगून आलो. जे श्रीमंत आहेत त्यांच्यासाठी एसी ट्रेन चालवा, सुपर डिलक्स चालवा त्याच्याशी आम्हांला काहीएक घेणंदेणं नाही. पण, सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा लोकलचा प्रवास हा तसाच राहीला पाहीजे. हा त्या सर्वसामान्य प्रवासी जे रेल्वेला पैसे देऊन पास काढतात आणि प्रवास करतात त्यांचा हक्क आहे. त्या अधिकारावरती जर गदा आणण्याचा रेल्वे प्रयत्न करत असेल तर तो उधळून लावू. 

 

आज मी  मध्य रेल्वेच्या डीआरएम यांना भेटायला गेलो होतो तर त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर जवळ-जवळ 100 अधिक पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आणि त्यांच्या हातामध्ये मोठ-मोठ्या बंदूका दिसत होत्या. रेल्वेची प्रवासी संघटना म्हणजे कोणी अतिरेकी संघटना येणार होते की काय रेल्वेच्या अधिका-यांना भेटायला. लोकशाही राज्यामध्ये लोकांचा आवाज जर अधिका-यांपर्यंत 

 

त्यामुळे एसी ट्रेन हे रेल्वेचे नाटक आहे. हे जरा सर्वसामान्यांनी समजून घ्यावं. कळवेकरांनी आवाज उठवला आहे. मुंब्र्यातून आवाज उठतोय. ठाण्यातून आवाज उठलाय. बदलापूर वरुन आवाज उठलाय. आता मात्र रेल्वे प्रवाशांना आपल्या हक्कासाठी मत नोंदवायलाच लागेल. आणि ते मत नोंदवताना रेल्वे अधिका-यांना आपल्या अधिकाराची जाणीव करुन द्यावी लागेल. त्यासाठी एकत्र या. तरच एसी लोकल बाबत रेल्वेला निर्णय घेणं भाग पडेल. अन्यथा तुम्हांलाही उद्या दोनशे रुपयांचा पास तीन हजार रुपयांना विकत घ्यावा लागेल.

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही