उत्पादन शुल्क विभागाला तीन महिन्यात ६१६९ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त



उत्पादन शुल्क विभागाला तीन महिन्यात ६१६९ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त

लोकमानस प्रतिनिधी 

मुंबई - महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाला १ एप्रिल ते ३१ जुलै या तीन महिन्याच्या कालावधीत ६१६९ कोटी ३१ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. गतवर्षी पूर्ण वर्षभरात उत्पादन शुल्क विभागाला १७ हजार २२८ कोटी ८४ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. सरकारला महसूल मिळवून देणाऱ्या प्रमुख विभागामध्ये उत्पादन शुल्क विभागाचा समावेश होतो. 

 विभागाने एप्रिल २०२१ ते  मार्च २०२२ या कालावधीत ४७ हजार ७४९ गुन्हे नोंदवले होते त्यामध्ये ३५ हजार ५४ आरोपींना अटक केली होती व १४४ कोटी ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. एप्रिल ते जुलै या तीन महिन्यात विभागाने १५ हजार ८८१ गुन्हे नोंदवले त्यामध्ये १२ हजार ८६ आरोपींना अटक केली व ५२ कोटी ५७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागातर्फे संबंधित कार्यक्षेत्राच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे कलम ९३ अंतर्गत प्रस्ताव पाठवून बंधपत्र घेण्याची कारवाई केली जाते. एप्रिल २०२१ ते  मार्च २०२२ या कालावधीत अशा प्रकारे २१७१ प्रस्ताव पाठवण्यात आले होते त्यापैकी ८८६ जणांना बंधपत्र मिळाले त्याद्वारे २ कोटी ८७ लाख रुपये जमा करण्यात आले. तर, एप्रिल ते जुलै या कालावधीत २०२ प्रस्ताव पाठवण्यात आले त्यापैकी ९३ जणांना बंधपत्र मिळाले व त्याद्वारे ५० लाख ८४ हजार रुपये जमा करण्यात आले.  

गणेशउत्सव कालावधीत विषारी मद्यसेवनामुळे दुर्घटना घडू नयेत व अवैध मद्यविक्रीमुळे शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याबाबत सर्व विभागीय उपायुक्त व अधीक्षक यांना सूचना देण्यात आल्या आहेत. 

अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री बाबत तक्रार करण्यासाठी २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत आहे. पुढील क्रमांकावर संपर्क साधता येऊ शकेल. टोल फ्री क्रमांक- १८००२३३९९९९, दूरध्वनी क्रमांक- ०२२-२२६६०१५२, व्हॉटस अप क्रमांक- ८४२२००११३३, मेल आयडी - stateexcise.controlroom@gmail.com

माहिती मिळावी यासाठी विभागातर्फे माहिती देणाऱ्यांना बक्षीस दिले जाते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही