बेपत्ता झालेल्या भटक्या कुत्र्याला शोधणाऱ्या नागरिकाचा पारितोषिक आणि मानपत्र देऊन सन्मान

 बेपत्ता झालेल्या भटक्या कुत्र्याला शोधणाऱ्या नागरिकाचा पारितोषिक आणि मानपत्र देऊन सन्मान

लोकमानस प्रतिनिधी 

मुंबई : भायंदर येथील नाकोडा रुग्णालय जवळ असलेल्या  रत्ना श्री सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापक समितीच्या सदस्यांनी 7 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे 04 : 00 ते 04 : 30 च्या दरम्यान निकू या भटक्या कुत्र्याला क्रूरतेने पकडून एका रिक्षावाल्याच्या मदतीने मानखुर्द, गोवंडी इथे सोडून दिले. अम्मा केअर फाऊंडेशन (एसीएफ) आणि प्लांट अँन्ड अनिमल्स वेलफेयर सोसायटी - मुंबई (पीएडब्ल्यूएस - मुंबई) तसेच  आंतरराष्ट्रीय प्राणी संरक्षण संस्था (ओआयपीए) प्रोटेक्शन या संस्थांनी स्थानिक प्राणी प्रेमी लोकांच्या मदतीने मुंबई आणि नवी मुंबईत अनेक भागांत निकूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या साठी एक पोस्टर बनवून समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आले. 


18 ऑगस्ट 2022, बुधवारी हेल्पलाईन वर एक सजग नागरिक मोहम्मद अल्ताफ हनीफ शेख यांचा पहाटे 02 : 20 च्या सुमारास फोन आला. त्यांनी सांगितले की पोस्टवरच्या फोटोशी मिळता जुळता कुत्रा रस्ता क्रमांक 4, नूर रुग्णालय, शिवाजी नगर, गोवंडी इथे एका एटीएममध्ये बसला आहे. हा फोन आल्यानंतर निकूला शोधण्यासाठी तयार करण्यात आलेला चमू त्या ठिकाणी पोचली आणि त्याची ओळख पटवली. त्याला निकू या नावाने हाक मारली तेव्हा त्याने प्रतिसाद दिला. या चमूला स्थानिक नागरिक शमसुद्दीन शेख अहमद खान आणि ऐश शेख यांनी मदत केली.

 

निकूला शोधून देणाऱ्यास 10,000 रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्या प्रमाणे, एसीएफ, पीएडब्ल्यूएस - मुंबई तसेच एसीएफ यांनी संयुक्तपणे मोहम्मद अल्ताफ हनीफ शेख यांचा सत्कार केला आणि त्यांना १० हजार रुपयांचा धनादेश आणि मानपत्र तसेच शमसुद्दीन शेख अहमद खान आणि ऐश शेख यांना प्रत्येकी अडीच हजार रुपये बक्षीस देण्यात आले. या सर्वांचा सत्कार पशुसंवर्धन विभागाचे उपयुक्त आणि जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीचे सदस्य सचिव डॉ शैलेश पेठे आणि मानद पशु कल्याण अधिकारी तसेच एसीएफ व पीएडब्ल्यूएस - मुंबई चे संस्थापक सुनिष सुब्रमण्यन याच्या हस्ते करण्यात आल्याची माहिती ओआयपीएच्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी (महाराष्ट्र राज्य) निशा कुंजु यांनी दिली.

 

निकू स्थलांतर प्रकरणात गुन्हा दाखल - या प्रकरणी या सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष हिरल’ जैन, सचिव निपेश पटेल, खजिनदार प्रकाश शाह, तसेच त्यांनी नियुक्त केलेल्या असगर अली अब्बास अली शेख यांच्या विरुद्ध प्राणी क्रूरता निर्मुलन कायदा, 1960 च्या कलम 11(1)D, 11(1)(e), 11(1) (f), 11(1)(i) अंतर्गत भायंदर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशा कुंजु यांनी सांगितले की त्यांच्या संस्थेच्या प्रतिनिधी मंडळाने मीरा भायंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते याची भेट घेऊन या गुन्ह्यात वापरलेले वाहन एमएच ४३ बीएफ ४४७३, जप्त करण्यात यावे आणि गुन्ह्यात वाहन चालक मुश्रफ फैय्याझ मन्सुरी याच्या विरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 428, 429, 120B आणि 363 आणि भटके कुत्रे व्यवस्थापन नियम, 2001 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

 

या सहकारी गृहनिर्माण संस्थेने कुत्रा दुसरीकडे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला अकरा हजार रुपयाचा धनादेश दिला आहे, हे बेकायदेशीर कृत्य असून, याविषयी आम्ही उपनिबंधक, सहकारी संस्था, भायंदर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात तपास करावा, कारण संस्थेद्वारे निधीचा आणि अधिकाराचा गैरवापर करून प्राणी मित्रांना आणि संस्थेच्या आवारातील भटक्या कुत्र्या-मांजरांना त्रास देत आहेत, जे भारताच्या राज्यघटनेने कलम 51 अंतर्गत दिलेल्या मुलभूत अधिकारांचे हनन आहे. तसेच प्राणी क्रूरता निर्मुलन कायदा, 1960, भारतीय दंड विधान, 1860 आणि भटके कुत्रे व्यवस्थापन नियम, 2001 च्या विविध कलमांअंतर्गत गुह्ना आहे,” सुनिष सुब्रमण्यन म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही