टोल कर्मचाऱ्याची मुजोरी,पोलिस अधीक्षकांसोबत अरेरावी, गुन्हा दाखल


टोल कर्मचाऱ्याची मुजोरी,पोलिस अधीक्षकांसोबत अरेरावी,  गुन्हा दाखल
लोकमानस प्रतिनिधी
नाशिक
नाशिक पिंपळगाव टोलनाक्यावर नाशिकचे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासोबत अरेरावी करणाऱ्या मुजोर टोल कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दस्तुरखुद्द जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयीन वाहनाला टोल नाक्यावरुन जाताना रस्ता मोकळा करुन देण्याऐवजी त्यांची गाडी रोखून त्यांच्यासोबत मुजोरीचे वर्तन करुन अरेरावी करणाऱ्या टोल कर्मचाऱ्या विरोधात
पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील मालेगाव येथून शासकीय कामकाज आटोपून नाशिकच्या दिशेने जात असताना टोल नाक्याजवळ हा प्रकार घडला. पोलीस अधीक्षकांची गाडी टोल नाक्यावरुन सोडण्यास जाणिवपूर्वक विलंब करुन याबाबत विचारणा केल्यावर थेट पोलिस अधीक्षकांसोबत बाचाबाची करणाऱ्या या टोल कर्मचाऱ्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब