४ किलो ७०० ग्रॅम गांजासह आरोपीला अटक, मुंब्रा पोलिसांची कारवाई , मारहाण करुन चोरी करणाऱ्या दुकलीला मुंब्रा पोलिसांनी केली अटक

 


४ किलो ७०० ग्रॅम गांजासह आरोपीला अटक, मुंब्रा पोलिसांची कारवाई 

लोकमानस प्रतिनिधी 

मुंब्रा - मुंब्रा परिसरात चार किलो ७०० ग्रॅम गांजा विक्रीसाठी आलेल्या एका आरोपीला मुंब्रा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून गांजा व रोख रक्कम ४५० रुपये असा एकूण ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फैजल मोहम्मद अस्लम सलमानी ऊर्फ राजा (वय २३ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अमृतनगर येथील दर्गाह गल्ली येथून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात मुंब्रा पोलिस स्थानकात एन.डी.पी.एस. कलम ८(क), २०, २२, २९ अन्वये गुन्हा क्रमांक ७७६-२०२२ नोंदवण्यात आला आहे. 

पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त पंजाबराव उगले, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे, कळवा विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त विलास शिंदे, मुंब्रा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कडलग यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे मुंब्रा पोलिस स्थानकातील  गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कृपाली बोरसे, स.पो.नि. अजय कुंभार,  अंमलदार महाले, तडवी, शेळके, खैरनार, नवनाथ चव्हाण, जमदाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. याबाबत अधिक तपास स.पो.नि. अजय कुंभार करत आहेत. 

------------

मारहाण करुन चोरी करणाऱ्या दुकलीला मुंब्रा पोलिसांनी केली अटक

लोकमानस प्रतिनिधी 

मुंब्रा -मध्यरात्री कामावरुन घरी परतत असलेल्या इसमाला मारहाण करुन त्याच्याकडील १० हजार ५०० रुपयांची रक्कम चोरणाऱ्या दोन आरोपींना मुंब्रा पोलिसांनी नुकतीच अटक केली. फिर्यादी कामावरुन मध्यरात्री दीड वाजता आपल्या घरी जात असताना खालीद खान ऊर्फ बिडी व त्याच्या दोन साथीदारांनी फिर्यादीला मारहाण करुन  व त्याच्या डोक्यात धारदार चाकूने दुखापत केली व त्याच्याकडील १० हजार पाचशे रुपये व दोन मोबाईल फोन असा १२ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. फिर्यादीच्या तक्रारीवरुन मुंब्रा पोलिस स्थानकातील गुन्हे प्रकटीकरण विभागाने तपास करुन खालीद फिरोज खान ऊर्फ खालीद बिडी वय २१ वर्षे व आसिफ फिरोज शेख वय २२ वर्षे या दोन आरोपींना अटक केली. चोरी केलेला मोबाईल, गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकू, फिर्यादीचा रेल्वे पास, आधारकार्ड, दोन मोबाईलचे सीम कार्ड आरोपींकडून जप्त करण्यात आले. मुंब्रा पोलिस स्थानकातील  गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कृपाली बोरसे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही