कल्याण शहरात तिरंगा यात्रेला चांगला प्रतिसाद

कल्याण शहरात  तिरंगा  यात्रेला चांगला प्रतिसाद
लोकमानस प्रतिनिधी
कल्याण 
कल्याण शहरात  तिरंगा  यात्रेचे आयोजन अँड  प्रियेश सिंह यांच्यातर्फे करण्यात आले होते. यात्रेला 500 लोकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला , नागरिकांनी आनंदाने स्वातंत्र्यदिन 
साजरा केला.
स्वातंत्र्याचा 75 वा‌ अमृत महोत्सव व‌ देशाचा राष्ट्रध्वज देशाचे आदर्श, तत्त्वज्ञान, इतिहास संस्कृती,‌ महत्वाकांक्षेचे प्रतिनिधित्व करतो व त्याचा आम्हाला अभिमान आहे  व राष्ट्रसेवेसाठी आम्ही बांधील आहोत असे मत अँड  प्रियेश सिंह व‌ मोहन कोनकर, रागिनी सिंह, मीनाक्षी, अनुप सिंह, श्रीराम खाटू परिवार, श्रीराम हिंदू सेना यांनी व्यक्त केले.
  दोन किलोमीटर तिरंगा यात्रा कल्याण मधील शहाड शहरातील स्थानिकांच्या सहकार्यामुळे यशस्वी झाली.‌ कोकण वृत्ताचे अँड प्रशांत गायकवाड व खेलो इंडिया फोर पीस अँबेसिडर अँड राजाराम दळवी व‌ अँड खलील गिरकर यांनी शुभेच्छा दिल्या व  राष्ट्रसेवा या माध्यमाद्वारे शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवणे भारतीयाचे कर्तव्य आहे, असे मत व्यक्त केले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही