वनविभागाने मानक कार्यप्रणाली संबंधी इतर विभागांना प्रशिक्षित करावे: सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचना

वनविभागाने मानक कार्यप्रणाली संबंधी इतर विभागांना प्रशिक्षित करावे: सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचना

आमदारांच्या सूचनांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे निर्देश
लोकमानस प्रतिनिधी
मुंबई-

वनविभागाच्या कार्यप्रणाली बाबत विविध विभागांच्या अनेक अधिकाऱ्यांनाच नीट कल्पना नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वन विभागाने विविध विभागातील अधिकाऱ्यांचे मानक कार्यप्रणाली (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) बाबत प्रशिक्षित करावे असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. विधान भवनात आयोजित वन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

वन विभागाच्या मानक कार्यप्रणालीची एक पुस्तिका बनवून ती सर्व आमदार, सर्व जिल्हाधिकारी, सर्व विभागांचे अधिकारी व प्रमुख शासकीय कार्यालये यांना ती वितरित करावी अशा सूचनाही मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या. वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वृक्ष संवर्धनासंदर्भात एक सहा तासांचे प्रशिक्षण आयोजित करण्याचे निर्देशही यावेळी मुनगंटीवार यांनी दिले.

आमदारांच्या सूचनांसाठी स्वतंत्र ईमेल सुरू करण्याचे निर्देश 

वनविभाग संदर्भात आमदारांच्या तक्रारी व सूचना प्राप्त करण्यासाठी स्वतंत्र ईमेल आयडी सुरू करण्याचे निर्देश त्यांनी यांनी दिले. उद्यापासून हा ईमेल कार्यरत होईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही