महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर ईडी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने

पन्नास खोके-माजलेत बोके, पन्नास खोके-एकदम ओके, ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी

 महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर  ईडी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने
लोकमानस  प्रतिनिधी
मुंबई - ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा,  पन्नास खोके माजलेत बोके पन्नास खोके, एकदम ओके, ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी, स्थगिती सरकार हाय हाय, गद्दारांचं सरकार हाय हाय, आले रे आले गद्दार आले, अशा गगनभेदी घोषणा देत आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.


विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.


अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस असून महाविकास आघाडीमधील सर्व आमदारांनी ईडी सरकारला धारेवर धरण्याचे काम सुरू केले असून हे आंदोलनातून दाखवून दिले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही