ओबीसी नेते हरिभाऊ राठोड व माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांचा " आप" मध्ये प्रवेश

ओबीसी नेते हरिभाऊ राठोड व माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांचा " आप" मध्ये प्रवेश
लोकमानस प्रतिनिधी 
नवी दिल्ली 
 राष्ट्रीय ओबीसी नेते तथा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यासह निवृत्त ए.सि.पी.धनराज वंजारी तसेच यवतमाळचे  अमान भाई यांचा जाहीर प्रवेश रविवारी 21 ऑगस्ट रोजी  दिल्ली येथे आम आदमी पार्टीचे प्रमुख दिल्लीचे मुख्यमंत्री माननीय अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत झाला.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रभारी दिपक सिंगल,मुंबई प्रभारी अंकूश नारंग, मुंबई प्रदेश अध्यक्षा प्रीती मेनन, महाराष्ट्र प्रदेश सचिव धनजय शिंदे,महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री विजय कुंभार पुणे ओबीसी मुस्लिम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी, ऑल इंडिया बंजारा संघाचे उत्तर भारताचे अध्यक्ष एस पी सिंग लबाना तसेच हरियाणा प्रदेशचे आम आदमी पार्टीचे नेते मखनसिंग लबाना या उपस्थित होते . अनेक नेत्यासह शेकडो कार्यकर्ते यांनी जाहीर प्रवेश केला.
राज्यातील जनता वाढती महागाई, भ्रष्टाचार, सीबीआय, ई डी, या केंद्रीय गुप्तचर यंत्रणांचा गैरवापर, प्रस्थापितांच्या फोडा फोडीचे राजकारण या सर्व बाबींना कंटाळली असुन सक्षम राजकीय पर्याय म्हणून राज्यातील जनता आम पार्टी कडे बघत आहे. जनतेचे अनेक महत्वाचे प्रश्न प्रलंबित असताना प्रस्थापित पक्ष मात्र एकमेकावर चिखलफेक करण्यात व्यस्त आहेत.  महाराष्ट्रात मराठा, ओबीसी,मागासवर्गीयांचे बढती मधील आरक्षणा सारखे विषय मार्गी लावण्यात सरकार असफल ठरले आहे. 

माजी खासदार हरिभाऊ राठोड म्हणाले, प्रस्थापित पक्षाबद्दल लोकांमध्ये राग असून जनतेला सक्षम राजकीय पक्षाचा पर्याय देण्याकरिता येणाऱ्या काळात राज्यातील अनेक बहुजन तसेच ओबीसी नेते ,कार्यकर्ते आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याची सुरुवात

"आप" चे दिल्ली व पंजाब मॉडेल जनतेचा चर्चेचा विषय बनला आहे. दिल्ली सरकारचा शिक्षणाचा दर्जा, आरोग्य, मोफत वीज, महिलांची पेन्शन योजना, सुशिक्षित बेरोजगारांना दर महा भत्ता, या योजना बाबत सर्व देशभर चर्चा व कौतुक होत आहे येणाऱ्या काळात पंचायत समिती ,जिल्हा परिषद ,नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पक्ष सर्व ताकतीने लढविणार आहे. 
 आम आदमी पार्टीचे ध्येय धोरण तळगळातील शेवटच्या घटका पर्यंत पोहचिण्यासाठी आम्ही प्रयत्न करु,२०२४ मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वखाली या देशाला नवीन सक्षम पर्याय मिळणार असुन नवीन क्रांती घडणार असल्याचा विश्वास  राठोड यांनी यावेळेस व्यक्त केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही