कामगार पगारवाढीची बोलणी कोणत्याही अटीशिवाय करा, कामगार महासंघाच्या नेत्यांची मागणी

कामगार पगारवाढीची  बोलणी कोणत्याही अटीशिवाय करा, कामगार महासंघाच्या नेत्यांची मागणी
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई - 
भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांच्या पगारवाढीसाठी द्विपक्षीय वेतन समितीची बैठक २३ ऑगस्ट  रोजी नवी दिल्लीत इंडियन पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजीव जलोटा यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय खेळीमेळीच्या चांगल्या वातावरणात झाली. आय.पी. ए.च्या वतीने के.जी.नाथ यांनी अहवाल सादर केला.  यावेळी वेतन करारासाठी लादलेल्या जाचक अटी मागे घेण्याची मागणी सर्वच फेडरेशनच्या नेत्यांनी केली.  वाटाघाटी कोणत्याही अटीशिवाय चालू झाल्या पाहिजेत. या जाचक अटी मागे घेण्याचे लेखी निवेदन महासंघाच्या नेत्यांनी अध्यक्षांना  दिले. बोनस योजना ताबडतोब मान्य करण्याची मागणी कामगार महासंघाच्या नेत्यांनी केली.आय.पी. ए.चे व्यवस्थापकीय संचालक यांनी प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मिटिंग घ्यावी. दरम्यान काही मागण्यांवर स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घेण्यात येतील, असे  राजीव जलोटा यांनी सांगितले.
  पुढील बैठक मुंबई येथे घेण्याचे ठरले असून, बैठकीची तारीख नंतर कळविली जाईल.या बैठकीसाठी  मोहम्मद हनीफ, सुधाकर अपराज, विद्याधर राणे, असीम सूत्रधार, पी.के.सामंतराय, नरेंद्र राव, केरसी पारेख, डी.के.शर्मा, सी.डी. नंदकुमार, सी.जे. मेंडोसा, जे. आर. पाटील, क्रूज त्यादी कामगार नेते उपस्थित होते, अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिध्दी प्रमुख
मारूती विश्वासराव यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही