पोस्ट्स

ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रा. वामन केंद्रे यांच्या मॅजिक ॲाफ ॲक्टींग'-निशुल्क कार्यशाळेचे आयोजन

प्रा. वामन केंद्रे यांच्या  मॅजिक ॲाफ ॲक्टींग'-निशुल्क कार्यशाळेचे आयोजन    लोकमानस प्रतिनिधी मुंबई -             रंगपीठ थिएटर-मुंबई ने ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंदिर ट्रस्ट- मुंबई'च्या सहकार्याने ; तीन दिवस चालणार्या कार्यशाळेचे आयोजन, 'श्री शिवाजी मंदिर' नाट्यगृह इमारतीतील 'राजर्षी शाहू सभागृह' येथे केले आहे. या तीनही दिवशी आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त व भारतातील एक सर्वोत्तम नाट्य दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक, एन. एस. डी. चे माजी संचालक व बहुप्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार 'पद्मश्री' ने सन्मानित प्रा.वामन केंद्रे यांचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना मिळेल.  प्रा. वामन केंद्रे यांच्या ह्या "मॅजिक ॲाफ ॲक्टींग कार्यशाळा"चे अर्थात "अभिनयाची जादू" या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन 'राजर्षी शाहू सभागृह-दादर' येथे  ८ व ९ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६.३० ते ९.३० आणि रविवार १० सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा १६ ते ६० वर्ष या वयोगटातील कलांवत- प्रशिक्षणार्थींसाठी असणार आहे.       ह्या कार्

कोकणकर सामाजिक संस्थेतर्फे कोकण बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष आसिफ दादन यांच्यासहित इतरांचा सत्कार, नजीब मुल्ला यांनी डागली विरोधकांवर तोफ

इमेज
कोकणकर सामाजिक संस्थेतर्फे कोकण बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष आसिफ दादन यांच्यासहित इतरांचा सत्कार,  नजीब मुल्ला यांनी डागली विरोधकांवर तोफ मुंब्रा -  कोकणकर सामाजिक संस्थेतर्फे कोकण बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष आसिफ दादन, उपाध्यक्ष अकबर डबीर, संचालक अल्ताफ काझी यांच्यासहित मुंब्रा कौसा परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कोकण बँकेचे माजी अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी भाषणात  विरोधकांवर विविध आरोप करुन तोफ डागली.     यावेळी राज्य किमान वेतन सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष सय्यद अली अश्रफ, माजी महापौर नईम खान, अंजुमन इस्लामचे उपाध्यक्ष मुश्ताक अंतुले, अब्दुल अजीज महाते उपस्थित होते.   कोकणकर संस्थेचे अध्यक्ष दाऊद चौगुले,  गुलाम  चरफरे, आशिक गारदी, मन्सूर डोंगरे एजाज मापारी आदींनी इतर संस्थांच्या सहयोगाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.   सत्काराला उत्तर देताना आसिफ दादन म्हणाले,   सत्कारामुळे जबाबदारीत वाढ झाली आहे. घरच्या माणसांनी केलेला हा सत्कार भावस्पर्शी आहे. कोकण बँकेच्या इतिहासात माजी अध्यक्षांनी विद्यमान अध्यक्षांचा पहिल्यांद

चांद्रयान-3 चंद्रावर उतरले, भारताची मोहिम यशस्वी

चांद्रयान-3 चंद्रावर उतरले, भारताची मोहिम यशस्वी लोकमानस प्रतिनिधी - चंद्रावर चांद्रयान उतरवण्यात भारताला यश आले आहे. भारताचे चांद्रयान-3 आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरले. विक्रम लँडरने चंद्रावर सॉप्ट लँडिंग केले. या यशाबाबत भारतात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. यापूर्वीच्या चांद्रयान -2 मोहिमेला अपयश आल्याने यावेळी भारतीयांच्या मनात या मोहिमेच्या यशस्वीततेबाबत धाकधूक होती. मात्र इस्त्रोने यावेळी यशस्वी होण्याचा विश्वास व्यक्त केला होता. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान पोचवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. पंतप्रधानांसहित देशातील राजकीय नेत्यांनी याबाबत आनंद व्यक्त करुन मोहिम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्यांचे कौतुक केले आहे.

मुंबईतील अतिरिक्त ऊर्दू शिक्षकांचे समायोजन ठाणे महापालिकेच्या ऊर्दू शाळांमध्ये करा, सय्यद अली अश्रफ यांची मागणी

मुंबईतील अतिरिक्त ऊर्दू  शिक्षकांचे समायोजन ठाणे महापालिकेच्या ऊर्दू शाळांमध्ये करा,  सय्यद अली अश्रफ यांची मागणी  लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -  मुंबई महापालिकेच्या ऊर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षक जास्त व विद्यार्थी कमी अशी परिस्थिती आहे तर ठाणे महापालिकेच्या ऊर्दू शाळांमध्ये शिक्षक कमी व विद्यार्थी जास्त अशी उलट परिस्थिती आहे. त्यामुळे या दोन्ही मुद्द्यांचा विचार करुन मुंबई मधील अतिरिक्त शिक्षकांचे ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये समाजोयन करुन  शिक्षक व विद्यार्थी दोन्ही घटकांना न्याय द्यावा, अशी मागणी राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सय्यद अली अश्रफ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी शिक्षण विभागाच्या उपसंचालकांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.  सय्यद अली अश्रफ यांनी पत्रात लिहिले आहे की, ठाणे महापालिकेच्या ऊर्दू शाळांना भेट दिल्यानंतर या शाळांमध्ये कमी शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी मुंबईतील ऊर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. त्यामुळे या दोन्ही बाबींचा

चांद्रयान-३ मोहिमेवरील गीतांचे प्रकाशन

इमेज
चांद्रयान-३ मोहिमेवरील गीतांचे प्रकाशन लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -  भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार अतुल शाह यांनी चांद्रयान-३ मोहिमेवर बनविलेल्या मराठी व हिंदी गीतांचे प्रकाशन मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आ. आशीष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक , प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन , प्रदेश प्रवक्त्या राणी द्विवेदी आदी उपस्थित होते.   चांद्रयान-३ अभियानाविषयी समस्त भारतीय जनतेच्या मनात असलेल्या अभिमानाच्या भावना या गीतांमधून व्यक्त झाल्या आहेत ,  असे श्री. शेलार यांनी यावेळी सांगितले.  शेलार यांच्या हस्ते या गीताचे मराठी गीतकार मोहन सामंत , हिंदी गीतकार मयांक वैद्य ,  संगीतकार दत्ता थिटे ,  गायक आशीष देशमुख ,  राहुल जोशी आदींचा सत्कार करण्यात आला.

सिंधुदुर्ग येथील नौसेना दिवस शिवछत्रपतींच्या लौकिकाला साजेसा, भव्य-दिव्य व्हावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सिंधुदुर्ग येथील नौसेना दिवस शिवछत्रपतींच्या लौकिकाला साजेसा, भव्य-दिव्य व्हावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  लोकमानस प्रतिनिधी,  मुंबई  :- भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून यावर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर) सिंधुदुर्ग किल्ला येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लौकिकाला साजेसा आणि भव्यदिव्य अशा स्वरूपात व्हावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महाराष्ट्र नौसेना क्षेत्राचे ध्वज अधिकारी रियल ॲडमिरल ए.एन.प्रमोद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर- पाटणकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी उपस्थित होते. आतापर्यंत नौसेना दिवस नवी दिल्ली आणि मुंबई येथे साजरा होत असे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी

नव्या सहकार धोरणात सामाजिक-आर्थिक आयाम बदलण्याची क्षमता : सुरेश प्रभू

इमेज
नव्या सहकार धोरणात सामाजिक-आर्थिक आयाम बदलण्याची क्षमता : सुरेश प्रभू प्रतिनिधी  कोलकाता :-  केंद्रीय मंत्रिमंडळाने सहकार मंत्रालय तयार केल्यानंतर आता राष्ट्रीय सहकार धोरणही तयार झालं आहे. या धोरणाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांनी या धोरणाची काय खासियत आहे हे सांगितले आहे. विशेष म्हणजे देशाच्या जीडीपीवर याचा कसा चांगला परिणाम होईल हे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. नव्या सहकार धोरणात भारताच्या सामाजिक-आर्थिक आयाम बदलण्याची क्षमता आहे असे ते म्हणाले .       नवे राष्ट्रीय सहकर धोरण जवळपास तयार झाले असून सुरेश प्रभूंच्या अध्यक्षतेखालील ४७ सदस्यांच्या समितीकडून या धोरणाचा मसुदा सुपूर्द केला जाणार आहे. प्रभू यांनी कोलकात्यात मर्चंट्स चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजच्यावतीनं आयोजित एका कार्यक्रमात या धोरणाची माहिती दिली. केंद्रीय मंत्री आणि सहकर मंत्री अमित शहा यांनी गेल्यावर्षी घोषणा केली होती. देशात सहकार आंदोलन अधिक मजबूत करण्यासाठी लवकरच एक समर्पित धोरण तयार केलं जाईल. तसेच सुरेश प्रभू या राष्ट्रीय स्तरावरील समितीचे नेतृत्व करतील. या समितीच्या सदस्यांमध्ये तज्ज्ञ आणि

माजी आमदार रमेश कदम यांची जामीनावर सुटका, कार्यकर्त्यांनी जल्लोषात केले स्वागत

इमेज
माजी आमदार रमेश कदम यांची जामीनावर सुटका,  कार्यकर्त्यांनी जल्लोषात केले स्वागत लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांची जामीनावर सुटका झाली आहे.  गेल्या आठ वर्षांपासून ते तुरुंगात होते.  कदम यांच्या सोलापूर,  मुंबईतील कार्यकर्त्यांनी ठाणे मध्यवर्ती कारागृहाबाहेर त्यांचे जल्लोषात स्वागत केले.   अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता तेव्हापासून ते तुरुंगात होते.  सुरुवातीला ते ऑर्थर रोड तुरुंगात होते व नंतर त्यांना ठाणे कारागृहात ठेवण्यात आले होते.  2014 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघातून ते राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आमदार म्हणून निवडून आले होते.  2019 मध्ये त्यांनी मोहोळमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता.  रमेश कदम यांच्या आगामी राजकीय वाटचालीकडे आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

सीजीएसटी बेलापूर आयुक्तालयाने 817 कोटी रुपयांच्या बनावट जीएसटी इनव्हॉईस टोळीचा लावला छडा

मुंबई विभागातील सीजीएसटी बेलापूर आयुक्तालयाने  817 कोटी रुपयांच्या बनावट जीएसटी इनव्हॉईस टोळीचा  लावला छडा, एकाला अटक लोकमानस प्रतिनिधी, मुंबई -   मुंबई विभागातील सीजीएसटी बेलापूर आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी बनावट जीएसटी इनव्हॉईस टोळीचा  छडा लावला  आहे.  सुमारे 147 कोटी रुपयांचे बनावट जीएसटी  इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी ) मिळवण्यासाठी या 817 कोटी रुपयांच्या बनावट  पावत्या  वापरण्यात आल्या. मेसर्स ध्रुविका केमिकल्स ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स निकोलासा ट्रेडिंग प्रा. लि., मेसर्स जे बी डायकेम प्रा. लिमिटेड चा  संचालक आणि याच्या  सूत्रधाराला अटक केली आहे. या  समूहाच्या  विरोधात,  वस्तूंची प्रत्यक्ष खरेदी आणि विक्री/पुरवठा न करता, केवळ पावत्या प्राप्त करण्यात आणि जारी करण्यात गुंतलेले असणे,त्याद्वारे उलाढाल वाढवण्याच्या आणि बँक कर्जाचा लाभ घेण्यासाठी तयार केलेल्या बनावट कंपन्यांमध्ये अपात्र इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणे आणि मंजूर  करणे यासंदर्भात चौकशी सुरु करण्यात आली आहे. शोध घेतल्यानंतर  असे आढळून आले की ,या  केलेल्या कंपन्या संबंधित परिसरात कार्यरत नाहीत किंवा अस्तित्वात नाहीत. या

महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना प्रदान

महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना प्रदान,  टाटा म्हणजेच ट्रस्ट..विश्वास – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकमानस प्रतिनिधी  मुंबई : - उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला 'उद्योगरत्न' पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. ‘टाटा म्हणजे ट्रस्ट. टाटा म्हणजे विश्वास अशी जगभर ख्याती असलेल्या उद्योग समूहाचे रतन टाटा यांना हा पुरस्कार देण्याने पुरस्काराचा सन्मान वाढला आहे,’असे मुख्यमंत्री शिंदे यांनी पुरस्कार प्रदान केल्यानंतर बोलताना सांगितले.  टाटा यांना त्यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मान्यवरांनी २५ लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह व मानपत्र या स्वरुपात पुरस्कार प्रदान केला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कां

महाराष्ट्रातील ७६ पोलिसांना स्वातंत्र्यदिनानिमित्त पदके जाहीर

इमेज
महाराष्ट्रातील ७६ पोलिसांना स्वातंत्र्यदिनानिमित्त पदके जाहीर नवी दिल्ली : पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला  केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदके जाहीर केली जातात.  राज्यातील प्रवीण साळुंके, विनयकुमार चौबे आणि जयंत नाईकनवरे या पोलिस अधिकाऱ्यांना  विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ आज जाहीर करण्यात आले.  यासह राज्यातील 33 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’, तर 40 पोलिसांना गुणवत्तापूर्ण  सेवेसाठी ‘पोलीस पदक’, असे राज्यातील एकूण 76 पोलिसांना पदके जाहीर कण्यात आली आहे. ‘राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक’ आणि ‘पोलीस शौर्य पदक’, जीवन आणि मालमत्ता यांचे संरक्षण, गुन्हेगारीला पायबंद आणि गुन्हेगारांना अटक करण्यासाठी उल्लेखनीय शौर्यासाठी दिले जाते. विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’  पोलीस सेवेतील खास उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाते. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक’ संसाधन आणि कर्तव्यनिष्ठेने बजावलेल्या अमूल्य सेवेसाठी प्रदान केले जाते. वर्ष 2023 च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील एकूण 954 पोलिसांना ‘पोलीस पदके’ जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रात

वच्छलाबाई अपंग सेवा संस्थेचा आमरण उपोषणाचा इशारा

वच्छलाबाई अपंग सेवा संस्थेचा आमरण उपोषणाचा इशारा,   शासनाकडे वारंवार विनंती करूनही मागणी पूर्ण न झाल्यामुळे उचलले पाऊल लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -   वच्छलाबाई अपंग सेवा संस्थेच्या सभांसदांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत 12 ऑगस्टला आमरण उपोषण करण्याचा इशारा संस्थेचे अध्यक्ष अरुण गव्हाणे यांनी दिला आहे.  वच्छलाबाई अपंग सेवा संस्था ही दिव्यांग व्यक्तिंच्या पुनर्वसनाचे कार्य करते.  शासनाच्या जीआरनुसार 2009 पासून उपनगर जिल्हा अधिकारी यांच्याकडे दिव्यांगांकरिता भूखंडाची मागणी शासनाकडे करण्यात येत आहे. या मागणीला शासनाने आश्वासन देऊन अनेक वर्षे झाली. भूखंडासंबंधित सातबारा नकाशा, प्रॉपर्टी कार्ड आणि सर्व प्रकारची कागदपत्रे शासनाकडे सादर करून भूखंडाबाबत मागणी केली होती. शासनाने याबाबत संबंधित विभागाकडे आदेश दिले होते, मात्र सतत पाठपुरावा आणि सर्व कागदपत्रे शासनाकडे सादर करूनही संस्थेची मागणी पूर्ण झाली नाही.  अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर वच्छलाबाई अपंग सेवा संस्थेची भूखंडाची मागणी पूर्ण होईल, असे संस्थेला वाटले होते, मात्र पाठपुरावा करूनही शासनाकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे वच्छलाबाई अपंग सेवा संस्थेच

माजी मंत्री नवाब मलिक यांना जामीन मंजूर

माजी मंत्री नवाब मलिक यांना जामीन मंजूर  लोकमानस प्रतिनिधी - माजी मंत्री नवाब मलिक यांमा जामीन मंजूर झाला आहे.  सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणांमुळे मलिक यांना जामीन दिला.   मलिक यांना दोन महिन्यांचा अंतरीम जामीन मंजूर करण्यात आला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गेल्या सतरा महिन्यांपासून मलिक अटकेत आहेत. मलिक न्यायालयीन कोठडीत असताना त्यांच्यावरील उपचारांसाठी त्यांना खासगी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.  फेब्रुवारी 2022 पासून ते अटकेत आहेत. वैद्यकीय कारणांवर मागितलेला जामीन मुंबई उच्च न्यायालयाने जुलै महिन्यात नाकारला होता त्यानंतर मलिक यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता. 

कोकणातील पायाभूत विकासाला प्राधान्य - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोकणातील पायाभूत विकासाला प्राधान्य                        - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकमानस प्रतिनिधी              मुंबई :- राज्यातील जनतेला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य  असून त्यामध्ये रस्त्यांची जोडणी ही महत्त्वपूर्ण बाब आहे. त्या पार्श्भूमीवर कोकणाच्या गतीमान विकासासाठी त्या ठिकाणी दळणवळण सुविधांमध्ये वाढ करण्यास आणि पायाभूत सुविधा उभारण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले.             रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण 12 रेल्वे स्थानकांचे रस्ते काँक्रिटीकरण व सुशोभिकरण करणे या कामांचा दूरदृष्यप्रणालीद्वारे भूमिपूजन शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मंत्रालयात आयोजित या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे तर संबंधति बारा रेल्वे स्थानकांवर केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्य

विरोधीपक्षाच्या प्रस्तावाची सत्ताधाऱ्यांकडून थट्टा, सरकार जनतेच्या प्रश्नावर गंभीर नाही :- नाना पटोले, पावसाळी अधिवेशन जनतेच्या तोंडाला पाने पुसणारेच ठरले.

विरोधीपक्षाच्या प्रस्तावाची सत्ताधाऱ्यांकडून थट्टा, सरकार जनतेच्या प्रश्नावर गंभीर नाही :- नाना पटोले,  पावसाळी अधिवेशन जनतेच्या तोंडाला पाने पुसणारेच ठरले. लोकमानस प्रतिनिधी  मुंबई,  पावसाळी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षाकडून अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात येतो, हा प्रस्ताव राज्यातील जनतेचे प्रश्न मांडणारा असतो पण विरोधी पक्षाच्या या प्रस्तावाची सत्ताधारी पक्षाकडून थट्टा करण्यात आली. भाजपाप्रणित सरकार जनतेच्या प्रश्नांवर गंभीर नाही. महागाई कमी करण्यासाठी या सरकारकडे कोणतेही धोरण नाही. सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. १०-१५ हजार रुपयांच्या पगारात शहरातील कुटुंबाला खर्च परवडत नाही. नुकसानभरपाई अजून मिळालेली नाही. हे शेतकरीविरोधी सरकार असून केवळ घोषणा केल्या जात आहेत. अधिवेशनात सरकारने जनतेच्या तोंडाला पानं पुसली आहेत, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. विधानसभेत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, महागाई दिवसेंदिवस वाढत असून लोकांचे जगणे महाग झाले आहे, याचा सत्ताधारी आंनद व्यक्त करत आहेत का? म

अधिवेशनात राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न-- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अधिवेशनात राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न-- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकमानस प्रतिनिधी             मुंबई :- पावसाळी अधिवेशन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले असून राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न या पावसाळी अधिवेशनात करण्यात आला. अधिवेशनात 41 हजार 243 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.              पुरवणी मागण्यांद्वारे प्राप्त निधी शेतकऱ्यांसाठी नमो सन्मान योजना, नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत, आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, अशा सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या विविध योजनांसाठी उपलब्ध करून दिला जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.              विधानभवनात पावसाळी  अधिवेशनाच्या समारोपानंतर मुख्यमंत्र्यांनी  पत्रकारांशी संवाद साधला.  यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार प्रवीण दरेकर, आमदार मनीषा कायंदे उपस्थित होत्या.  महाराष्ट्र विधिमंडळाचे सन 2023 च्या पावसाळी अधिवेशन विधेयकांची माहिती पूर्वीची प्रलंबित विधेयके :  0

सर्वोच्च न्यायालयाचा राहुल गांधीना दिलासा, गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती, खासदारकी मिळण्याचा मार्ग मोकळा

  सर्वोच्च न्यायालयाचा राहुल गांधीना दिलासा, गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती, खासदारकी मिळण्याचा मार्ग मोकळा  लोकमानस प्रतिनिधी, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात गांधी यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. गुजरात उच्च न्यायालयाने याबाबत दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचा लोकसभेत परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  गांधी यांना मोदी आडनावाची बदनामी केल्याच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाने रद्द केली होती. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्याने आता त्यांना खासदार म्हणून लोकसभेत परतणे शक्य होणार आहे. कॉंग्रेसने या निर्णयाचे स्वागत केले आहे.  राहुल गांधी यांना या प्रकरणी कमाल शिक्षा ठोठावणे अयोग्य असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. त्याच वेळी सार्वजनिक जीवनात वावरताना भान बाळगण्याचा सल्ला देखील न्यायालयाने दिला आहे. गांधी यांची खासदारकी रद्द करण्यास

मनोरा आमदार निवास बांधकामाचा शुभारंभ

  मनोरा आमदार निवास बांधकामाचा शुभारंभ लोकमानस प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील नरिमन पॉइंट येथे मनोरा आमदार निवास इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला.  या बांधकाम शुभारंभ आणि भूमिपूजनप्रसंगी विधानपरिषद उपाध्यक्ष डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, कृषी मंत्री धनंजय मुंडे, कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती होती. भूमिपूजन आणि शुभारंभ झाल्यानंतर कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.  मनोरा आमदार निवासाच्या १३४२९.१७ चौ.मी. भूखंड क्षेत्र असलेल्या या जागेवर ५.४ एफ.एस.आय. (FSI) च्या अनुषंगाने ७२१५६.०६ चौ.मी. प्रस्तावित प्रत्यक्ष बांधकाम आहे. आधुनिक स्थापत्यशैलीनुसार काळाच्या गरजा आणि वास्तूकलेचा वारसा यांचा संगम साधणाऱ्या मनोरा आमदार निवासाच्या ४० मजली व २८ मजली अशा दोन भव्य इमारती उभारण्यात येणार आहेत. *असे असेल नवीन आमदार निवास* :  या नवीन मनोरा आमदार नि

विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी विजय वडेट्टीवार यांच्या नियुक्तीची घोषणा

इमेज
विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी विजय वडेट्टीवार यांच्या नियुक्तीची घोषणा  लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - पावसाळी अधिवेशन संपण्याच्या एक दिवस अगोदर गुरुवारी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडेट्टीवार यांच्या नियुक्तीचे स्वागत करुन त्यांचे अभिनंदन केले.  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केली. कॉंग्रेसने वडेट्टीवार यांच्या नियुक्तीबाबत अध्यक्षांना पत्र दिले होते. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त होते. पवार यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असलेले हे पद कॉंग्रेसकडे आले.  विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. विरोधी पक्षनेते म्हणून सभागृहाची परंपरा उत्कृष्टपणे चालवतील - विधानसभा अध्यक्ष     राहुल नार्वेकर सभागृहाला विरोधी पक्षनेते पदाची मोठी परंपरा लाभलेली आहे. या पदावर विराजमान व्यक्तीची जबाबदारी अधिक आहे. विरोधी पक्षनेत

राज्यातील सर्व रस्ते तत्काळ दुरुस्त करावेत - सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांचे निर्देश

राज्यातील सर्व रस्ते तत्काळ दुरुस्त करावेत - सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांचे निर्देश लोकमानस प्रतिनिधी  मुंबई : अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करीत ते सुस्थितीत आणावेत. अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.  भुसे यांच्या दालनात राज्यातील सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणअंतर्गत येणाऱ्या रस्त्यावरील पथकर नाका, महामार्गावरील खड्डे, मार्गिकेची शिस्त, वेग याबाबत चर्चा, उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, अपर पोलीस महासंचालक रवींद्र सिंघल (वाहतूक), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक संजय यादव, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुंबई विभागाचे प्रादेशिक अधिकारी ए. श्रीवास्तव यांच्यासह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्

खैरख्वाही फाउंडेशनतर्फे मोफत वैद्यकीय शिबिर संपन्न, वृक्षारोपण करुन पर्यावरण रक्षणाचा संदेश, आशुरा निमित्त सामाजिक कार्य

इमेज
खैरख्वाही फाउंडेशनतर्फे मोफत वैद्यकीय शिबिर संपन्न, वृक्षारोपण करुन पर्यावरण रक्षणाचा संदेश,   आशुरा निमित्त सामाजिक कार्य लोकमानस प्रतिनिधी ठाणे -  खैरख्वाही फाउंडेशनतर्फे आशूराच्या दिवशी मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  सुमारे 150 जणांनी या शिबिराचा लाभ घेतला.  याशिवाय वृक्षारोपण करुन पर्यावरण रक्षणाचा संदेश देखील देण्यात आला. मुंब्रा येथील इंडियन इस्लामिक स्कूल जवळ वृक्षारोपण करण्यात आले.   खैरख्वाही फाउंडेशनच्या पुढाकाराने विविध स्वयंसेवी संस्था एकत्र येऊन मुंब्रा मध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य करतात. आगामी ईद मिलादच्या दिवशी मुंब्रा कौसा परिसरात 12 ठिकाणी एकाच वेळी मोफत वैद्यकीय शिबिरे आयोजित करुन सर्वसामान्यांना वैद्यकीय सेवेचा लाभ देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.   गरजूंना मोफत रेशन, औषधे व शिक्षणासोबत अवघ्या 30 रुपयांत चँरिटेबल क्लिनिक द्वारे वैद्यकीय सेवा पुरवणे यासाठी ही संस्था ओळखली जात आहे.  2023 च्या वर्ष अखेरी पर्यंत मुंब्रा कौसा मध्ये गरजूंना दवाखाना, वैद्यकीय औषधे, रक्त तपासणी या सर्व सुविधा पुरवण्याचा संस्थेचा मानस आहे. 

विकृत भिडेला बेड्या घालून जेलमध्ये टाका, संतप्त बाळासाहेब थोरात यांची सभागृहात मागणी

विकृत भिडेला बेड्या घालून जेलमध्ये टाका,  संतप्त बाळासाहेब थोरात यांची सभागृहात मागणी लोकमानस प्रतिनिधी मुंबई : ‘संभाजी भिडे नामक विकृत इसमाने महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले आणि महापुरुषांचा ज्या भाषेत अपमान केला आहे, ती भाषा सुद्धा सभागृहात मांडणे शक्य नाही. भिडे वारंवार असे बोलतोय आणि सरकार काहीही करायला तयार नाही. याउलट पोलिसांच्या दिमतीत तो फिरतो आहे, याचा अर्थ महापुरुषांच्या बदनामीचा जो कार्यक्रम सुरू आहे तो सरकारच्या आशीर्वादाने सुरू आहे का? अशी शंका येऊन जाते, सरकारने भिडे आणि त्याच्या सारख्या इतर विकृतांना बेड्या घालून जेलमध्ये टाकावे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात केली. विरोधी पक्षांच्या प्रस्तावावर बोलताना थोरात यांनी कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत सरकारवर सडकून टीका केली. थोरात म्हणाले, ‘राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत, महिला व मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. तीन महिन्यात पाच हजार सहाशे मुली बेपत्ता झाल्या आहेत. हुंडाबळी आणि महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये देखील वाढ झालेली आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील

मनोहर भिडेंवर प्रतिबंधात्मक कारवाई का नाही?: अशोक चव्हाण

मनोहर भिडेंवर प्रतिबंधात्मक कारवाई का नाही?: अशोक चव्हाण लोकमानस प्रतिनिधी  मुंबई मनोहर भिडे पोलीस संरक्षणात एकापाठोपाठ वादग्रस्त विधाने करून महापुरूषांचा, साईबाबांचा व देशाचा अवमान करत आहेत, सामाजिक- धार्मिक भावना दुखावत आहेत, राज्यात आग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरीही त्यांच्याविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई का होत नाही, अशी संतप्त विचारणा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.  विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, मनोहर भिडे यांनी अमरावती, यवतमाळ, पिंपरी-चिंचवड अशा अनेक ठिकाणी आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. आज विरोधी पक्षांनी याबाबत विधानसभेत दाद मागण्याचा प्रयत्न केला. पण विरोधकांना बोलण्याची पुरेशी संधी दिली गेली नाही. पोलिसांनी गुन्हे दाखल केले. पण त्यानंतर त्यांच्यावर कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई झाली नाही. ते अजूनही मोकाट फिरत आहेत आणि भाषणे देत आहेत. त्यांच्या माध्यमातून सामाजिक वाद निर्माण करायचे, दंगली घडवायच्या आणि त्याचा राजकीय फायदा मिळवायचा, हे राज्य सरकारचे धोरण आहे का, असाही प्रश्न अशोक चव्हाण यांनी केला.

नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या

नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - प्रसिध्द कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी त्यांच्या कर्जतच्या एनडी स्टुडिओ मध्ये आत्महत्या केली. देसाई यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस त्याबाबत अधिक तपास करत आहेत.  रात्री उशिरा देसाई यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. याबाबत तपास सुरु असल्याची माहिती रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.   देसाई यांना कला दिग्दर्शनासाठी तीन वेळा  फिल्मफेअर पुरस्कार व राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी कर्जतला 2005 मध्ये  एनडी स्टुडिओ सुरू केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रद्धांजली   ख्यातनाम कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा अकस्मात मृत्यू वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने एक व्यापक कलादृष्टी असलेला संवेदनशील प्रतिभावंत आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. 'कला क्षेत्रात नितीन यांनी स्वतःच्या हिंमतीवर ओळख निर्माण केली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी सर्जनशीलतेची छाप उमटवणाऱ्या नितीन यांची अशी एक्झिट अपेक्षित

माथाडी कायद्यातील सुधारणांना कामगार संघटनांचा विरोध, सरकारकडे चर्चेची मागणी

माथाडी कायद्यातील सुधारणांना कामगार संघटनांचा विरोध, सरकारकडे चर्चेची मागणी लोकमानस प्रतिनिधी मुंबई : माथाडी कायद्यात सुधारणा करण्याच्या निमित्ताने राज्य सरकारने विधिमंडळात मांडलेले विधेयक कामगारांच्या हिताच्या विरोधात असून भविष्यात कामगारांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे कामगार संघटनांशी चर्चा केल्याशिवाय विधिमंडळात हे विधेयक मंजूर करू नये, अशी मागणी अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने केली आहे.  माथाडी कायद्यात सुधारणा करण्यासाठी म्हणून राज्य सरकारने विधानसभेत विधेयक मांडले आहे. येत्या आठवड्यात हे विधेयक मंजूर करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, कायद्यात नेमक्या कोणत्या सुधारणा करण्यात येणार आहेत, त्याचे माथाडी कामगारांवर कोणते परिणाम होणार आहेत, याबाबत राज्य सरकारने कामगार संघटनांना विश्वासात घेतलेले नाही.  माथाडी कायदे व्यवसाय करायला जाचक ठरत असल्याच्या कारणाखाली गेली काही वर्षे कायद्यात सुधारणा करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. मात्र यामध्ये कामगारांना गेली पन्नास वर्षे मिळालेले संरक्षण काढून घेण्याचा डाव असल्याचा कामगार संघटनांचा

गणेश मूर्तिकारांना परवानगीसाठी द्यावी लागणारी अनामत रक्कम आता 1 हजार वरुन अवघ्या 100 रुपयांवर

गणेश मूर्तिकारांना परवानगीसाठी द्यावी लागणारी अनामत रक्कम आता 1 हजार वरुन अवघ्या 100 रुपयांवर लोकमानस प्रतिनिधी  मुंबई : महानगरपालिका मुख्यालयात मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठक मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई शहराचे पालकमंत्री  दीपक केसरकर, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, आमदार ॲड.आशिष शेलार, माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली.  या बैठकीस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.  या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.             गणेश मूर्तीकार / मूर्ती साठवणूकदार यांना परवानगीसाठी असलेली १००० रुपये असलेली  अनामत रक्कम कमी करून ती. १०० रुपये करण्याचा महत्वाचा निर्णय आज घेण्यात आला. त्याचबरोबर गणेशोत्सवाच्या १५ दिवस आधी विसर्जन मार्गाचा आढावा घेऊन योग्य ती खबरदारी घेणे, विसर्जनाचे सर्व मार्ग व त्यावरील सर्व रस्ते खड्डेमुक्त करणे, शहरात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची संख्या वाढवणे, पीओपी मूर्ती विसर्जन झाल्यानंतर त्यांचे योग्य पद्धतीने विघटन केले जाईल याची काळजी घेण्

तुमचे मोठे प्रकल्प नको; आधी आमच्या सफाई कामगारांचे रखडलेले वेतन द्या - मर्जिया पठाण

तुमचे मोठे प्रकल्प नको; आधी आमच्या सफाई कामगारांचे रखडलेले वेतन द्या - मर्जिया पठाण  लोकमानस प्रतिनिधी ठाणे - शहरात जमा झालेला कचरा, पाणीसमस्या आणि मलमूत्र याची विल्हेवाट लावण्याचे काम गोरगरीब सफाई कामगार करीत आहेत.  मात्र, त्यांचे वेतन गेले तीन महिन्यांपासून अशोक इंटरप्रायजेस आणि अभिषेक इंटरप्रायजेस यांनी दिलेले नाही. त्यामुळे आम्हाला तुमचे मोठमोठे प्रकल्प नको; आधी आमच्या गोरगरीब सफाई कामगारांचे पगार द्या. अन्यथा, 2024 नंतर ठाणे पालिकेच्या सभागृहात आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया पठाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.  मर्जिया शानू पठाण यांनी आज मुंब्रा , कौसा भागातील सफाई कामांची पाहणी केली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. या पाहणीदरम्यान शहराच्या विविध भागात कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून आले. तसेच, अनेक जलवाहिन्या नाल्यातून जात असून त्या फुटलेल्या अवस्थेत असल्याचेही दिसले.  या वेळी मर्जिया पठाण यांनी ठाणे महानगर पालिकेच्या कारभारावर चांगलीच आगपाखड केली. त्या म्हणाल्या की, शहरात साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे रोगराई वाढली आहे. दूषित पाणीप