प्रा. वामन केंद्रे यांच्या मॅजिक ॲाफ ॲक्टींग'-निशुल्क कार्यशाळेचे आयोजन

प्रा. वामन केंद्रे यांच्या  मॅजिक ॲाफ ॲक्टींग'-निशुल्क कार्यशाळेचे आयोजन
   लोकमानस प्रतिनिधी
मुंबई -            
रंगपीठ थिएटर-मुंबई ने ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंदिर ट्रस्ट- मुंबई'च्या सहकार्याने ; तीन दिवस चालणार्या कार्यशाळेचे आयोजन, 'श्री शिवाजी मंदिर' नाट्यगृह इमारतीतील 'राजर्षी शाहू सभागृह' येथे केले आहे. या तीनही दिवशी आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त व भारतातील एक सर्वोत्तम नाट्य दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक, एन. एस. डी. चे माजी संचालक व बहुप्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार 'पद्मश्री' ने सन्मानित प्रा.वामन केंद्रे यांचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना मिळेल.
 प्रा. वामन केंद्रे यांच्या ह्या "मॅजिक ॲाफ ॲक्टींग कार्यशाळा"चे अर्थात "अभिनयाची जादू" या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन 'राजर्षी शाहू सभागृह-दादर' येथे  ८ व ९ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६.३० ते ९.३० आणि रविवार १० सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा १६ ते ६० वर्ष या वयोगटातील कलांवत- प्रशिक्षणार्थींसाठी असणार आहे.
      ह्या कार्यशाळेचे मार्गदर्शक प्रा. वामन केंद्रे यांचे अभिनय व नाट्य प्रशिक्षण क्षेत्रातील योगदान हे अमूल्य आहे. त्यांच्याकडे शिकलेले आणि नावारूपाला आलेले शेकडों कलावंत आज नाटक, चित्रपट, मालिका, जाहिरात, वेबसिरीज, रेडिओ, नाट्य-चित्रपट शिक्षण इत्यादी माध्यमात अग्रेसर आहेत. ते देशात-विदेशात दबदबा निर्माण करून कार्यरत आहेत. प्रा. केंद्रे यांनी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, चीन, जापान, सिंगापूर , मॉरीशस इत्यादी देशांबरोबरच भारतभर ४०० पेक्षा अधिक कार्यशाळा घेऊन, राष्ट्रीय- आंतरीष्ट्रीय किर्तीचे कलाकार घडवले आहेत.
    प्रा. वामन केंद्रे यांना आत्तापर्यंत  'संगीत नाटक अकादमी-दिल्ली', 'राष्ट्रीय कालीदास सन्मान' (मध्य प्रदेश), 'ब. व. कारंत पुरस्कार', 'मनोहर सिंग स्मृती पुरस्कार' (नॅशनल स्कूल ऑफ ड्रॉमा ), 'राष्ट्रीय अभिनव रंग सन्मान' (उज्जैन), 'रमेश सिंग राष्ट्रीय सन्मान'( पटना ) व 'पद्मश्री पुरस्कार' (भारत सरकार) अशा ७ 'राष्ट्रीय पुरस्कार'ने सन्मानित करण्यात आले आहे.
    या कार्यशाळेत 'अभिनयाची जादू' काय असते, ती समजुन कशी घ्यायची असते व प्रत्यक्षात कशी उतरवायची असते तसेच अभिनय या क्षेत्रात भविष्य घडविण्यासाठी काय करावे लागते, या विषयीचे प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. नाटक,चित्रपट, दूरदर्शन, जाहिरात, वेब सिरिज, नाट्य व अभिनय प्रशिक्षण, अभिनय संशोधन आदि माध्यमांमध्ये करिअर करण्यासाठी काय करावे, याचे तपशीलवार दिग्दर्शन केले जाईल.
     या निःशुल्क कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी व अभिनय या क्षेत्रात करिअर करू इच्छिणा-या कलावंतानी सदर कार्यशाळेत प्रवेश घेण्यासाठी  9820868628 या नंबरवर संपर्क साधून आपले नाव नोंदवावे अथवा rangpeeththeatremumbai@gmail.com येथे संपर्क साधावा असे आवाहन 'श्री छत्रपती शिवाजी मंदिर ट्रस्ट'चे अध्यक्ष ब्रिगे. सुधीर सावंत व 'रंगपीठ थिएटर-मुंबई'च्या संचालिका  गौरी केंद्रे यांनी केले आहे.प्रथम येणा-यास प्रथम या तत्वावर प्रवेश दिला जाईल याची नोंद घ्यावी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही