सर्वोच्च न्यायालयाचा राहुल गांधीना दिलासा, गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती, खासदारकी मिळण्याचा मार्ग मोकळा

 सर्वोच्च न्यायालयाचा राहुल गांधीना दिलासा, गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती,

खासदारकी मिळण्याचा मार्ग मोकळा 

लोकमानस प्रतिनिधी,

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात गांधी यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. गुजरात उच्च न्यायालयाने याबाबत दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचा लोकसभेत परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

गांधी यांना मोदी आडनावाची बदनामी केल्याच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाने रद्द केली होती. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्याने आता त्यांना खासदार म्हणून लोकसभेत परतणे शक्य होणार आहे. कॉंग्रेसने या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

राहुल गांधी यांना या प्रकरणी कमाल शिक्षा ठोठावणे अयोग्य असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. त्याच वेळी सार्वजनिक जीवनात वावरताना भान बाळगण्याचा सल्ला देखील न्यायालयाने दिला आहे. गांधी यांची खासदारकी रद्द करण्यासाठी दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली का असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. दोन वर्षांपेक्षा एक दिवस देखील कमी शिक्षा झाली असती तर त्यांची खासदारकी रद्द झाली नसती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

गांधी यांच्यावतीने डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही