माजी आमदार रमेश कदम यांची जामीनावर सुटका, कार्यकर्त्यांनी जल्लोषात केले स्वागत

माजी आमदार रमेश कदम यांची जामीनावर सुटका,  कार्यकर्त्यांनी जल्लोषात केले स्वागत
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांची जामीनावर सुटका झाली आहे.  गेल्या आठ वर्षांपासून ते तुरुंगात होते.  कदम यांच्या सोलापूर,  मुंबईतील कार्यकर्त्यांनी ठाणे मध्यवर्ती कारागृहाबाहेर त्यांचे जल्लोषात स्वागत केले.  
अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता तेव्हापासून ते तुरुंगात होते. 
सुरुवातीला ते ऑर्थर रोड तुरुंगात होते व नंतर त्यांना ठाणे कारागृहात ठेवण्यात आले होते. 
2014 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघातून ते राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आमदार म्हणून निवडून आले होते.  2019 मध्ये त्यांनी मोहोळमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. 
रमेश कदम यांच्या आगामी राजकीय वाटचालीकडे आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही