गणेश मूर्तिकारांना परवानगीसाठी द्यावी लागणारी अनामत रक्कम आता 1 हजार वरुन अवघ्या 100 रुपयांवर

गणेश मूर्तिकारांना परवानगीसाठी द्यावी लागणारी अनामत रक्कम आता 1 हजार वरुन अवघ्या 100 रुपयांवर
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई : महानगरपालिका मुख्यालयात मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठक मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई शहराचे पालकमंत्री  दीपक केसरकर, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, आमदार ॲड.आशिष शेलार, माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली.  या बैठकीस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.  या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

            गणेश मूर्तीकार / मूर्ती साठवणूकदार यांना परवानगीसाठी असलेली १००० रुपये असलेली  अनामत रक्कम कमी करून ती. १०० रुपये करण्याचा महत्वाचा निर्णय आज घेण्यात आला. त्याचबरोबर गणेशोत्सवाच्या १५ दिवस आधी विसर्जन मार्गाचा आढावा घेऊन योग्य ती खबरदारी घेणे, विसर्जनाचे सर्व मार्ग व त्यावरील सर्व रस्ते खड्डेमुक्त करणे, शहरात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची संख्या वाढवणे, पीओपी मूर्ती विसर्जन झाल्यानंतर त्यांचे योग्य पद्धतीने विघटन केले जाईल याची काळजी घेण्याबाबत देखील निर्देश देण्यात आले. चिनी बनावटीच्या मूर्तींवर आळा तसेच प्रतिबंध घालण्यासाठी सुद्धा पाऊले उचलली जातील. या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी आरोग्य शिबिरे भरविण्यात येतील. प्रत्येक गणेश मंडळाकडे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी दिवसातून ३ वेळेस महानगरपालिकेच्या वतीने साफसफाई  केली जाईल.

            गणेशमूर्ती विसर्जनावेळी काही अडथळे येऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री लोढा यांनी अधिकाऱ्यांना दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही