मुंबईतील अतिरिक्त ऊर्दू शिक्षकांचे समायोजन ठाणे महापालिकेच्या ऊर्दू शाळांमध्ये करा, सय्यद अली अश्रफ यांची मागणी

मुंबईतील अतिरिक्त ऊर्दू  शिक्षकांचे समायोजन ठाणे महापालिकेच्या ऊर्दू शाळांमध्ये करा, 

सय्यद अली अश्रफ यांची मागणी 


लोकमानस प्रतिनिधी 

मुंबई -  मुंबई महापालिकेच्या ऊर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षक जास्त व विद्यार्थी कमी अशी परिस्थिती आहे तर ठाणे महापालिकेच्या ऊर्दू शाळांमध्ये शिक्षक कमी व विद्यार्थी जास्त अशी उलट परिस्थिती आहे. त्यामुळे या दोन्ही मुद्द्यांचा विचार करुन मुंबई मधील अतिरिक्त शिक्षकांचे ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये समाजोयन करुन  शिक्षक व विद्यार्थी दोन्ही घटकांना न्याय द्यावा, अशी मागणी राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सय्यद अली अश्रफ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी शिक्षण विभागाच्या उपसंचालकांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. 

सय्यद अली अश्रफ यांनी पत्रात लिहिले आहे की, ठाणे महापालिकेच्या ऊर्दू शाळांना भेट दिल्यानंतर या शाळांमध्ये कमी शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी मुंबईतील ऊर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. त्यामुळे या दोन्ही बाबींचा विचार करुन मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ठाण्यातील ऊर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये करण्याची मागणी त्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व शिक्षकांना देखील न्याय मिळण्यासाठी याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी सय्यद अली अश्रफ यांनी केली आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही