वच्छलाबाई अपंग सेवा संस्थेचा आमरण उपोषणाचा इशारा


वच्छलाबाई अपंग सेवा संस्थेचा आमरण उपोषणाचा इशारा,  
शासनाकडे वारंवार विनंती करूनही मागणी पूर्ण न झाल्यामुळे उचलले पाऊल
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई - 
 वच्छलाबाई अपंग सेवा संस्थेच्या सभांसदांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत 12 ऑगस्टला आमरण उपोषण करण्याचा इशारा संस्थेचे अध्यक्ष अरुण गव्हाणे यांनी दिला आहे. 

वच्छलाबाई अपंग सेवा संस्था ही दिव्यांग व्यक्तिंच्या पुनर्वसनाचे कार्य करते.  शासनाच्या जीआरनुसार 2009 पासून उपनगर जिल्हा अधिकारी यांच्याकडे दिव्यांगांकरिता भूखंडाची मागणी शासनाकडे करण्यात येत आहे. या मागणीला शासनाने आश्वासन देऊन अनेक वर्षे झाली. भूखंडासंबंधित सातबारा नकाशा, प्रॉपर्टी कार्ड आणि सर्व प्रकारची कागदपत्रे शासनाकडे सादर करून भूखंडाबाबत मागणी केली होती. शासनाने याबाबत संबंधित विभागाकडे आदेश दिले होते, मात्र सतत पाठपुरावा आणि सर्व कागदपत्रे शासनाकडे सादर करूनही संस्थेची मागणी पूर्ण झाली नाही. 

अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर वच्छलाबाई अपंग सेवा संस्थेची भूखंडाची मागणी पूर्ण होईल, असे संस्थेला वाटले होते, मात्र पाठपुरावा करूनही शासनाकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे वच्छलाबाई अपंग सेवा संस्थेच्या सभासदांवर अत्याचार असून दिव्यांगांना शासनाच्या कायद्यानुसार न्याय मिळत नसेल, तर 12 ऑगस्ट 2023 रोजी संस्थेचे सभासद वांद्रे येथील
 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 12:30 वाजता आमरण उपोषण करणार आहेत.वारंवार विनंती करूनही मागणी पूर्ण न झाल्यामुळे  हे उपोषण करण्यात आहे, असे शासनाला कळवण्यात आले आहे तसेच या उपोषणावेळी दिव्यांगांबाबत काही विचित्र प्रकार घडल्यास त्याला संबंधित ऑन ड्युटी अधिकारी व शासन जबाबदार राहील,असा इशारा संस्थेने दिला आहे. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही