कोकणकर सामाजिक संस्थेतर्फे कोकण बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष आसिफ दादन यांच्यासहित इतरांचा सत्कार, नजीब मुल्ला यांनी डागली विरोधकांवर तोफ


कोकणकर सामाजिक संस्थेतर्फे कोकण बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष आसिफ दादन यांच्यासहित इतरांचा सत्कार, 
नजीब मुल्ला यांनी डागली विरोधकांवर तोफ
मुंब्रा - 
कोकणकर सामाजिक संस्थेतर्फे कोकण बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष आसिफ दादन, उपाध्यक्ष अकबर डबीर, संचालक अल्ताफ काझी यांच्यासहित मुंब्रा कौसा परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कोकण बँकेचे माजी अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी भाषणात  विरोधकांवर विविध आरोप करुन तोफ डागली.  
 
यावेळी राज्य किमान वेतन सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष सय्यद अली अश्रफ, माजी महापौर नईम खान, अंजुमन इस्लामचे उपाध्यक्ष मुश्ताक अंतुले, अब्दुल अजीज महाते उपस्थित होते.  
कोकणकर संस्थेचे अध्यक्ष दाऊद चौगुले,  गुलाम  चरफरे, आशिक गारदी, मन्सूर डोंगरे एजाज मापारी आदींनी इतर संस्थांच्या सहयोगाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  
सत्काराला उत्तर देताना आसिफ दादन म्हणाले,  
सत्कारामुळे जबाबदारीत वाढ झाली आहे. घरच्या माणसांनी केलेला हा सत्कार भावस्पर्शी आहे. कोकण बँकेच्या इतिहासात माजी अध्यक्षांनी विद्यमान अध्यक्षांचा पहिल्यांदाच  सत्कार केला आहे. 

कोकण बँकेचे माजी अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीचे स्पष्ट संकेत दिले.  2009 मध्ये सेक्युलर नेता म्हणुन आम्ही मुंब्रा मध्ये नेत्याला आणले,  मात्र त्यांनी मुंब्रावासीयांना केवळ आश्नासने दिली, मात्र आता माझे डोळे उघडले आहेत. आता मला पश्चाताप होत आहे. मागील  कालावधीत सर्व कंत्राटे मुंब्राच्या बाहेर दिली गेली. स्थानिकांना डावलले गेले, मला परमार प्रकरण, राबोडीतील हत्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला, असे आरोप त्यांनी केले. मनसेच्या भडकाऊ भाषणे करणाऱ्यांसोबत हेच नेतृत्व हातात हात घालून असते, त्यांच्या तथाकथित सेक्युलर नेतृत्वाचा पडदा दूर होणे गरजेचे आहे, असे मुल्ला म्हणाले. 
सेक्युलर पणावर आम्ही तडजोड केलेली नाही. अजित दादा देखील सेक्युलरपणावर कायम आहेत. अल्पसंख्याकांचे तारणहार बनवणाऱ्यांचे खरे रुप समोर येण्याची गरज आहे. मुंब्रा कौसा मध्ये भविष्यात निश्चित बदल घडेल असा विश्वास मुल्ला यांनी व्यक्त केला. 

 मुंब्रा मध्ये मशीदीच्या भोंग्याच्या प्रकरणात दोन्ही बाजूंनी अंडरस्टँडिंग होऊन आंदोलन करण्यात आले. तुम्ही आंदोलन करा मग दाढी टोपी वाले आपल्या मागे येतील, असा खेळ खेळला गेल्याची टीका त्यांनी केली.  हज हाऊस येणार, गार्डन येणार,  अशी अनेक आश्वासने दिली गेली. मात्र आम्ही मुंब्रामध्ये लवकरच नवीन कब्रस्तान आणू,  त्याबाबत कार्यवाही सुरु असून लवकरच निर्णय होईल,  असे त्यांनी स्पष्ट केले. 

आम्ही भाषणात, पत्रकार परिषदेत रडत बसत नाही,  रडण्याचे प्रकार म्हणजे जनतेसमोर केलेले नाटक आहे, असा टोला त्यांनी लगावला.  
हा सत्काराचा कार्यक्रम पूर्व नियोजित होता. माझ्या बँकेच्या मतदारसंघात सत्कार करण्याचे निश्चित केले होते. मात्र काहींनी त्याचा राजकीय अर्थ काढला, या कार्यक्रमाला जावू नये यासाठी फोन केले गेले, आमच्या ऐक्यामुळे त्यांना त्रास होत आहे. 2009 मध्ये विधानसभेसाठी मत मागायला मीच आलो होतो, आता आमचे डोळे उघडले आहेत. आम्हाला नेहमी अल्पसंख्याक म्हणवून खेळवले गेले,  अशी टीका त्यांनी केली.   
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही