माजी मंत्री नवाब मलिक यांना जामीन मंजूर

माजी मंत्री नवाब मलिक यांना जामीन मंजूर 
लोकमानस प्रतिनिधी - माजी मंत्री नवाब मलिक यांमा जामीन मंजूर झाला आहे.  सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणांमुळे मलिक यांना जामीन दिला.  
मलिक यांना दोन महिन्यांचा अंतरीम जामीन मंजूर करण्यात आला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गेल्या सतरा महिन्यांपासून मलिक अटकेत आहेत. मलिक न्यायालयीन कोठडीत असताना त्यांच्यावरील उपचारांसाठी त्यांना खासगी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.  फेब्रुवारी 2022 पासून ते अटकेत आहेत. वैद्यकीय कारणांवर मागितलेला जामीन मुंबई उच्च न्यायालयाने जुलै महिन्यात नाकारला होता त्यानंतर मलिक यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब