चांद्रयान-3 चंद्रावर उतरले, भारताची मोहिम यशस्वी


चांद्रयान-3 चंद्रावर उतरले, भारताची मोहिम यशस्वी
लोकमानस प्रतिनिधी -
चंद्रावर चांद्रयान उतरवण्यात भारताला यश आले आहे. भारताचे चांद्रयान-3 आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरले. विक्रम लँडरने चंद्रावर सॉप्ट लँडिंग केले. या यशाबाबत भारतात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. यापूर्वीच्या चांद्रयान -2 मोहिमेला अपयश आल्याने यावेळी भारतीयांच्या मनात या मोहिमेच्या यशस्वीततेबाबत धाकधूक होती. मात्र इस्त्रोने यावेळी यशस्वी होण्याचा विश्वास व्यक्त केला होता.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान पोचवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. पंतप्रधानांसहित देशातील राजकीय नेत्यांनी याबाबत आनंद व्यक्त करुन मोहिम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्यांचे कौतुक केले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब