चांद्रयान-३ मोहिमेवरील गीतांचे प्रकाशन

चांद्रयान-३ मोहिमेवरील गीतांचे प्रकाशन

लोकमानस प्रतिनिधी 

मुंबई - 

भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार अतुल शाह यांनी चांद्रयान-३ मोहिमेवर बनविलेल्या मराठी व हिंदी गीतांचे प्रकाशन मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आ. आशीष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक,प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन,प्रदेश प्रवक्त्या राणी द्विवेदी आदी उपस्थित होते.

 

चांद्रयान-३ अभियानाविषयी समस्त भारतीय जनतेच्या मनात असलेल्या अभिमानाच्या भावना या गीतांमधून व्यक्त झाल्या आहेतअसे श्री. शेलार यांनी यावेळी सांगितले.  शेलार यांच्या हस्ते या गीताचे मराठी गीतकार मोहन सामंत,हिंदी गीतकार मयांक वैद्यसंगीतकार दत्ता थिटेगायक आशीष देशमुखराहुल जोशी आदींचा सत्कार करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब