नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या

नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या

लोकमानस प्रतिनिधी 

मुंबई - प्रसिध्द कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी त्यांच्या कर्जतच्या एनडी स्टुडिओ मध्ये आत्महत्या केली. देसाई यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस त्याबाबत अधिक तपास करत आहेत. 

रात्री उशिरा देसाई यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. याबाबत तपास सुरु असल्याची माहिती रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. 

 देसाई यांना कला दिग्दर्शनासाठी तीन वेळा  फिल्मफेअर पुरस्कार व राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी कर्जतला 2005 मध्ये  एनडी स्टुडिओ सुरू केला होता.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रद्धांजली 

 ख्यातनाम कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा अकस्मात मृत्यू वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने एक व्यापक कलादृष्टी असलेला संवेदनशील प्रतिभावंत आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

'कला क्षेत्रात नितीन यांनी स्वतःच्या हिंमतीवर ओळख निर्माण केली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी सर्जनशीलतेची छाप उमटवणाऱ्या नितीन यांची अशी एक्झिट अपेक्षित नव्हती. त्यांच्या जाण्याने देसाई कुटुंबींयावर आघात झाला आहे. त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी. कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे ही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही