खैरख्वाही फाउंडेशनतर्फे मोफत वैद्यकीय शिबिर संपन्न, वृक्षारोपण करुन पर्यावरण रक्षणाचा संदेश, आशुरा निमित्त सामाजिक कार्य

खैरख्वाही फाउंडेशनतर्फे मोफत वैद्यकीय शिबिर संपन्न, वृक्षारोपण करुन पर्यावरण रक्षणाचा संदेश,  
आशुरा निमित्त सामाजिक कार्य
लोकमानस प्रतिनिधी
ठाणे - 
खैरख्वाही फाउंडेशनतर्फे आशूराच्या दिवशी मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
सुमारे 150 जणांनी या शिबिराचा लाभ घेतला. 
याशिवाय वृक्षारोपण करुन पर्यावरण रक्षणाचा संदेश देखील देण्यात आला. मुंब्रा येथील इंडियन इस्लामिक स्कूल जवळ वृक्षारोपण करण्यात आले.  
खैरख्वाही फाउंडेशनच्या पुढाकाराने विविध स्वयंसेवी संस्था एकत्र येऊन मुंब्रा मध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य करतात. आगामी ईद मिलादच्या दिवशी मुंब्रा कौसा परिसरात 12 ठिकाणी एकाच वेळी मोफत वैद्यकीय शिबिरे आयोजित करुन सर्वसामान्यांना वैद्यकीय सेवेचा लाभ देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.  

गरजूंना मोफत रेशन, औषधे व शिक्षणासोबत
अवघ्या 30 रुपयांत चँरिटेबल क्लिनिक द्वारे वैद्यकीय सेवा पुरवणे यासाठी ही संस्था ओळखली जात आहे. 
2023 च्या वर्ष अखेरी पर्यंत मुंब्रा कौसा मध्ये गरजूंना दवाखाना, वैद्यकीय औषधे, रक्त तपासणी या सर्व सुविधा पुरवण्याचा संस्थेचा मानस आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही